नवी दिल्ली, 11 जानेवारी : CBSE बोर्डानं आपल्या संलग्न शाळांना 1 मार्चपासून प्रॅक्टिकल परीक्षा घेण्याचे आदेश दिले आहेत. यंदा कोरोनामुळे शाळा-महाविद्यालंय, प्रॅक्टीकलचे वर्ग झाले नाहीत मात्र आता 1 मार्चपासून प्रॅक्टीकल परीक्षा घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. 31 डिसेंबरला CBSE बोर्डानं परीक्षांच्या तारखा जाहीर केल्या होत्या. त्यानंतर आता परीक्षेच्या दृष्टीनं मुलांसाठी Question बँक तयार करण्याचं काम सुरू आहे.
सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन (CBSE) ने प्रश्न बँक तयार करण्यास सुरुवात केली आहे, जे शिक्षकांना खूप उपयुक्त ठरणार आहे. या आधीदेखील बोर्डाकडून नमुनपत्र जारी करण्यात आली आहे. लवकरच बोर्डाकडून सर्व विषयांच्या प्रश्न बँकाही उपलब्ध होतील असा विश्वास व्यक्त केला आहे. या प्रश्नपत्रिकांचा फायदा विद्यार्थ्यांना देखील होणार आहे.
ज्या राज्यांमध्ये अथवा जिल्ह्यांमध्ये शाळा-महाविद्यालयं अद्यापही सुरू कऱण्यात आली नाहीत आणि वर्गात प्रॅक्टीकल परीक्षा घेणं ज्यांना शक्य नाही त्यांनी इंटरनेटद्वारे असेसमेंट करता येणार आहे. त्याद्वारे परीक्षा घेऊन मूल्यांकन करण्याचा सूचना देखील बोर्डानं दिल्या आहेत.
हे वाचा-JEE Mains आणि NEET परीक्षा कधी होणार? या वर्षातील परीक्षांचे महत्त्वाचे अपडे्स
CBSE परीक्षा कधी आणि कशी होणार?
दहावीची परीक्षा (CBSE Board class 10th exam date) आणि बारावीची (cbse board class 12th exam date) परीक्षा 4 मे ते 15 जुलै या दरम्यान होईल. केंद्रीय शिक्षण खात्याचे मंत्री रमेश पोखरियाल निशांक यांनी परीक्षांच्या तारखांची घोषणा केली. Covid-19मुळे यंदाचं शैक्षणिक वर्षं लांबलं. त्यामुळे बोर्डाच्या परीक्षाही उशीरा घेण्यात येत आहेत. दहावी-बारावीच्या बोर्डाच्या परीक्षांचे निकाल 15 जुलैदरम्यान लागतील अशी माहिती शिक्षणमंत्र्यांनी 31 डिसेंबर रोजी पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली होती. परीक्षा नेहमीप्रमाणे पेन आणि पेपरवर होईल. ऑनलाइन स्वरूपाची नसेल, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: CBSE