CBSE EXAM 2021: दहावी-बरावीच्या बोर्ड परीक्षांबाबत आज तारखा जाहीर होणार

CBSE EXAM 2021: दहावी-बरावीच्या बोर्ड परीक्षांबाबत आज तारखा जाहीर होणार

परीक्षेचं वेळापत्रक cbse.nic.in या अधिकृत संकेतस्थळावर विद्यार्थ्यांना उपलब्ध होणार आहे. तिथून विद्यार्थ्यांना हे वेळापत्रक डाऊनलोड करता येणार आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 31 डिसेंबर : कोरोनामुळे लॉकडाऊन आणि त्यानंतर कोरोना संसर्गाचा धोका लक्षात घेऊन ऑनलाइन पद्धतीनं सुरू केलेलं शिक्षण या सगळ्यात परीक्षा कधी आणि कशी होणार याबाबतच्या सर्व प्रश्नांना आज पूर्णविराम लागणार आहे. गुरुवारी 31 डिसेंबरला संध्याकाळी दहावी आणि बारावीच्या बोर्ड परीक्षांच्या तारखा जाहीर होणार आहेत. तसेच यंदा कोरोनाचं सावट असलं तरी देखील या परीक्षा ऑनलाइन नाही तर ऑफलाइन म्हणजेच लेखी स्वरूपात होणार आहेत.

सीबीएसई इयत्ता 10 आणि वर्ग 12 च्या बोर्ड परीक्षेची तारीखपत्रक आज जाहीर करण्यात येणार आहे. केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल 'निशंक' केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (CBSE) दहावी आणि बारावीच्या परीक्षेच्या तारखेची घोषणा आज संध्याकाळी 6 वाजता करणार आहेत.

हे वाचा-गोठ्यात अभ्यास करून ती पोहोचली न्यायाधीशाच्या खुर्चीपर्यंत

CBSE बोर्डाच्या विद्यार्थी आणि पालकांचा यामुळे संभ्रम होणार नाही. तर यंदाची परीक्षा लेखी होणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी त्या अनुशंगानं तयारीला लागणं गरजेचं आहे. केंद्रीय शिक्षणमंत्री पोखरियाल यांनी नुकतीच बोर्डाच्या परीक्षांवर सोशल मीडियाच्या माध्यमातून पालक, शिक्षक आणि विद्यार्थ्यांशी चर्चा केली होती. त्यानंतर आता ते परीक्षेच्या तारखा जाहीर करणार आहेत.

शिक्षणमंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार 'त्यांच्या सूचना आणि भविष्यातील परिस्थिती लक्षात घेऊन सीबीएसई बोर्ड नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला परीक्षेच्या तारखांची घोषणा करण्यात येणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी नव्या जोमानं अभ्यासाला सुरुवात करायला हवी. परीक्षेचं वेळापत्रक cbse.nic.in या अधिकृत संकेतस्थळावर विद्यार्थ्यांना उपलब्ध होणार आहे. तिथून विद्यार्थ्यांना हे वेळापत्रक डाऊनलोड करता येणार आहे.

Published by: Kranti Kanetkar
First published: December 31, 2020, 9:22 AM IST
Tags: CBSE

ताज्या बातम्या