मुंबई, 1 जून: कोरोनाव्हायरची दुसरी लाट (Coronavirus second wave) देशाला महागात पडली. महाराष्ट्रासह अनेक राज्यांमध्ये रुग्णसंख्येने उच्चांक गाठला होता आणि मृत्यूचं थैमान पाहायला मिळालं. आता Lockdown सारख्या निर्बंधातून रुग्णसंख्या आटोक्यात येत असतानाच बोर्डाच्या परीक्षांचा हंगाम सुरू झाला. बारावीच्या बोर्डाची परीक्षा होणार का, याबाबत गेले काही दिवस भरपूर चर्चा आणि सर्वोच्च पातळीवर विचारमंथन सुरू होतं. याबाबत केंद्रीय पातळीवर CBSE ची परीक्षा घ्यायची की नाही यावर विचारविनिमय करण्यासाठी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक दिल्लीत झाली. त्यात मोदी सरकारने ही परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.
सुरुवातीला बारावीची परीक्षा होणारच, फक्त उशिराने होईल, असं सांगण्यात आलं होतं. वेळापत्रकही जाहीर झालं होतं. पण कोरोनाचा प्रकोप बघता अनेक राज्यांत परीक्षा घेण्यासारखी परिस्थिती नसल्याचं लक्षात आलं. त्यातच आता तिसऱ्या लाटेचा धोका असल्याचं तज्ज्ञांनी सांगितलं आहे. शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशंक याबाबत मंगळवारी मोठा निर्णय घेणार, असं सांगितलं जात होते. त्यांनाच Post Covid complications मुळे रुग्णालयात दाखल करण्यात आलं.
BREAKING: सीबीएसई बोर्डाची 12वीची परीक्षा रद्द
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली बोर्ड परीक्षांबाबतची बैठक झाली. CBSE चे अध्यक्ष उपस्थित होते. याशिवाय या बैठकीत संरक्षणमंत्री राजनाथ सिंह आणि माहिती प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकरही सहभागी होते. या महत्त्वपूर्ण बैठकीत बारावीच्या परीक्षेसंदर्भात चर्चा करण्यात आली. कोरोना संकटात परीक्षा कशा घेण्यात येतील, परीक्षा घेतली जाईल की नाही, यावर चर्चा करण्यात आली.
Government of India has decided to cancel the Class XII CBSE Board Exams. After extensive consultations, we have taken a decision that is student-friendly, one that safeguards the health as well as future of our youth. https://t.co/vzl6ahY1O2
— Narendra Modi (@narendramodi) June 1, 2021
शिक्षण मंत्रालयाला 03 जूनपर्यंत परीक्षांच्या निर्णयाबद्दल सर्वोच्च न्यायालयाला माहिती द्यावी लागणार असल्यानं आजची बैठक अतिशय महत्त्वाची होती. केंद्र सरकारने काल 31 मे रोजी परीक्षांविषयी निर्णय घेण्यासाठी 2 दिवस अवधी देण्याची विनंती सर्वोच्च न्यायालयाला केली होती. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली आजही बैठक झाली. त्यात परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला. आता CBSE प्रमाणे राज्यात HSC ची परीक्षाही होणार की नाही हे अद्याप स्पष्ट नाही.
नगरमध्ये मुलं कोरोनाच्या विळख्यात, आरोग्य विभाग म्हणतं लक्षणीय वाढ नाही
काँग्रेस सरचिटणीस प्रियांका गांधी यांनीही काल पंतप्रधान मोदींना पत्र लिहून बोर्ड परीक्षा रद्द करण्याची मागणी केली होती. त्यांनी पंतप्रधानांना लिहिलेल्या पत्रात म्हटलं होतं की, विद्यार्थी, पालक आणि शिक्षक सतत परीक्षा रद्द करण्याची मागणी करीत आहेत, त्यामुळे सरकारने त्यांच्या शब्दांकडेही लक्ष दिले पाहिजे. या साथीच्या काळात ऑफलाइन परीक्षांच्या माध्यमातून मुलांना संसर्ग होण्याचा धोका आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वीच परीक्षांचा निर्णय केंद्र पातळीवर एकच काय तो व्हावा, असं आवाहन केलं होतं. आता केंद्राने त्यांचा निर्णय दिला आहे. राज्यातही तोच निर्णय घेतला जातो का हे लवकरच स्पष्ट होईल. महाराष्ट्र बोर्डाने यंदा दहावीची परीक्षा (SSC Board exam) होणार नसल्याचं आधीच जाहीर केलं आहे. आता बारावीची (HSC board exam) परीक्षाही रद्द होण्याची चिन्हं आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Board Exam, CBSE, HSC