CBSE Class 10th Result: 'या' तारखेपर्यंत लागणार दहावीचा निकाल; समोर आली मोठी अपडेट

CBSE दहावीचा निकाल येत्या काही दिवसातच जाहीर होणार अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

CBSE दहावीचा निकाल येत्या काही दिवसातच जाहीर होणार अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

  • Share this:
    नवी दिल्ली, 21 जुलै: CBSE चा दहावी आणी बारावीचा (CBSE 10th Result 2021) निकाल कधी लागणार याकडे सर्व विद्यार्थ्यांचं आणि पालकांचं लक्ष लागलं आहे. गेल्याकाही दिवसापासून CBSE बोर्ड शाळांकडून विद्यार्थ्यांचा डेटा मागवत आहे. त्यानुसार 20 जुलै रोजी निकाल लागणार अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. मात्र आता काही कारणांमुळे दहावी CBSE चा निकाल (CBSE 10th Result date) काही काळ पुढे ढकलण्यात आला. मात्र आता CBSE दहावीचा निकाल येत्या काही दिवसातच जाहीर होणार अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. CBSE बोर्डानं शाळांना बारावीच्या निकालासंदर्भात (CBSE 10th & 12th Result 2021) काम पूर्ण करण्यासाठीची तारीख 22 जुलैवरून 25 जुलैपर्यंत वाढवून दिली आहे. त्यामुळे आता त्याआधी CBSE दहावीचा निकाल लागण्याची शक्यता आहे. म्हणूनच  CBSE दहावीचा निकाल येत्या 25 जुलैच्या आधीच लागणार अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. अजूनही बोर्डाकडून या यासंदर्भात अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही. हे वाचा - CBSE 12th Result: 12वीचा निकाल लांबणार? निकालाबाबत बोर्डानं शाळांना दिले निर्देश CBSE दहावीचे विद्यार्थी cbseresults.nic.in या वेबसाईटवर जाऊन आपला दहावीचा निकाल बघू शकणार आहेत. त्यासाठी त्यांना त्यांचा रोल नंबर एंटर करावा लागणार आहे. रोल नंबरशिवाय बघता येणार निकाल     आता CBSE दहावीचा निकाल विद्यार्थ्यांना रोल नंबरशिवायही (CBSE Result without Roll Number) बघता येणार आहे. दहावीचा निकाल वेबसाईटवर जाहीर होणार आहेच मात्र त्यासोबत Digilocker वरही दिसणार आहे. म्हणूनच डिजिलॉकरमध्ये निकाल बघताना विद्यार्थी रोल नंबर नसेल तर आधार कार्डचा नंबर (Aadhar Card Number) किंवा रजिस्टर्ड मोबाइल नंबर (Registered Mobile Number) एंटर करूनही निकाल बघू शकणार आहेत. तसंच  विद्यार्थ्यांकडे आधार कार्ड नाहीये अशा विद्यार्थ्यांना फेशिअल रेकॉग्नेशन सिस्टिमचा (Facial Recognition System) वापर करून निकाल बघता येणार आहे. अजूनही बऱ्याच पद्धतीनीं निकाल बघता येण्याची सोय बोर्ड करेल अशी माहिती मिळतेय.
    Published by:Atharva Mahankal
    First published: