मराठी बातम्या /बातम्या /करिअर /

CBSE Board Result: 10वी 12वीचे सर्व विद्यार्थी होणार Pass; लवकरच जाहीर होणार निकाल

CBSE Board Result: 10वी 12वीचे सर्व विद्यार्थी होणार Pass; लवकरच जाहीर होणार निकाल

लवकरच जाहीर होणार निकाल

लवकरच जाहीर होणार निकाल

या परीक्षा नियमांनुसार घेण्यात आल्या असून आता निकालही (CBSE Result 2021) लवकरच जाहीर केले जाणार आहेत.

  • Published by:  Atharva Mahankal
मुंबई, 22 डिसेंबर: 2020 आणि 2021 मध्ये, CBSE बोर्डाच्या 10वी आणि 12वीच्या परीक्षा रद्द (CBSE 10trh 12th exams) करण्यात आल्या. देशभरात पसरलेल्या कोरोना व्हायरसच्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला. अशा परिस्थितीत पर्यायी पद्धतीने परीक्षांचे निकाल (CBSE Result 2020) जाहीर करण्यात आले. मात्र, मागील परिस्थितीतून धडा घेत यंदा बोर्डाने (CBSE Board exams) दोनदा परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला होता. अशा प्रकारे इयत्ता 10वी आणि 12वी टर्म 1 च्या परीक्षा डिसेंबरमध्ये घेतल्या जात आहेत. या परीक्षा नियमांनुसार घेण्यात आल्या असून आता निकालही (CBSE Result 2021) लवकरच जाहीर केले जाणार आहेत. CBSE बोर्डाच्या इयत्ता 10वी टर्म 1 च्या परीक्षा संपल्या आहेत, तर इयत्ता 12वीच्या परीक्षा (CBSE Term 1 exams) सध्या सुरू आहेत. यावेळी परीक्षा ओएमआर शीटवर वस्तुनिष्ठ स्वरूपात घेण्यात आल्या. इयत्ता 10वीचे विद्यार्थी त्यांच्या निकालाची (CBSE Term 1 exams Result) आतुरतेने वाट पाहत आहेत. सीबीएसई बोर्डाच्या म्हणण्यानुसार, 12वीच्या परीक्षा संपल्यानंतर दोन्ही वर्गांचे बोर्ड निकाल जाहीर केले जातील. Career Tips: आता तुम्हीही होऊ शकता Cyber Security Expert; ही योग्यता असणं आवश्यक CBSE बोर्ड लवकरच 10वी आणि 12वी टर्म 1 परीक्षांचे निकाल जाहीर (CBSE Term 1 exams Result date) करेल. सध्या, असा अंदाज लावला जात आहे की दोन्ही वर्गांचे बोर्ड निकाल जानेवारी 2022 मध्ये जाहीर होतील. यानंतर लगेचच काही महिन्यांमध्ये टर्म 2 (CBSE Term 2 exams) परीक्षा घेतली जाणार आहे. सीबीएसई बोर्डाने स्पष्ट केले आहे की 10वी आणि 12वीच्या परीक्षांमध्ये कोणताही विद्यार्थी अनुत्तीर्ण होणार नाही. बोर्ड प्रत्येक विद्यार्थ्याला उत्तीर्ण करेल. तथापि, टर्म 2 परीक्षांसाठी बोर्ड काय निर्णय घेईल, अद्याप कोणतीही माहिती नाही (CBSE tern 2 exam date). वास्तविक, CBSE बोर्डाच्या 10वी, 12वी टर्म 2 च्या परीक्षा देशातील कोरोना विषाणू संसर्गाची परिस्थिती लक्षात घेऊन घेण्यात येतील अशी माहिती बोर्डाकडून देण्यात आली आहे.
First published:

Tags: Career, CBSE, Exam result

पुढील बातम्या