10-12वीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! Year end ला जाहीर होणार CBSE बोर्ड परीक्षेचा तारखा

10-12वीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी! Year end ला जाहीर होणार CBSE बोर्ड परीक्षेचा तारखा

यंदा या परीक्षा जानेवारी किंवा फेब्रुवारीत होणार नाहीत तसंच ही परीक्षा ऑनलाइन न घेता लेखी म्हणजेच ऑफलाइन घेतली जाणार आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 27 डिसेंबर : कोरोनाचं सावट असल्यानं यंदा शाळा आणि महाविद्यालयं बंद होती. वर्षा अखेरच्या टप्प्यात सुरू करण्यात आलेल्या महाविद्यालंय आणि शाळांच्या परीक्षा आणि अभ्यासक्रम कसा पूर्ण करायचा याबाबत अनेक प्रश्न आहेत. परीक्षा दरवर्षी होणारी दहवी आणि बारावीची बोर्ड परीक्षा कधी होणार? होणार की नाही अशा अनेक शंका मनात असलेल्या विद्यार्थ्यांच्या या प्रश्नांना आता पूर्णविराम लागला आहे. CBSE बोर्डाची परीक्षा ऑनलाइन नाही तर लेखी होणार असून वर्षा अखेरीस त्याच्या तारखा जाहीर करण्यात येणार आहेत.

कोरोना आजारामुळे 2020 या शैक्षणिक वर्षात मुलांचे खूपच नुकसान झाले. विद्यार्थ्यांचे आरोग्य लक्षात घेऊन विद्यार्थांना ऑनलाइन अभ्यासक्रमावर भर दिला जात आहे. दरम्यान, केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी दिलेल्या माहितीनुसार CBSE बोर्डाच्या दहावी आणि बारावीच्या परीक्षेच्या तारखा 31 डिसेंबर रोजी जाहीर करण्यात येणार आहेत. या संदर्भात त्यांनी ट्वीट करून माहिती दिली आहे.

शिक्षणमंत्र्यांनी केलेल्या ट्वीटमध्ये म्हटलं आहे की 31 डिसेंबर रोजी CBSE बोर्डाच्या दहावी आणि बारावीच्या परीक्षेच्या तारखा संध्याकाळी 6 वाजता जाहीर करण्यात येतील. यंदा या परीक्षा जानेवारी किंवा फेब्रुवारीत होणार नाहीत तसंच ही परीक्षा ऑनलाइन न घेता लेखी म्हणजेच ऑफलाइन घेतली जाणार आहे.

सीबीएसईच्या अधिकाऱ्यांनी स्पष्टीकरण दिले आहे की बोर्ड परीक्षा ऑनलाइन घेण्याचा कोणताही प्रस्ताव नाही. ज्याप्रमाणे आतापर्यंत लेखी परीक्षा घेण्यात आल्या तशाच पद्धतीनं यंदाही परीक्षा होणार आहेत. त्यामुळे वर्षाअखेरीस म्हणजे 31 डिसेंबरला संध्याकाळी 6 वाजता परीक्षांच्या तारखा जाहीर होणार आहेत. विद्यार्थ्यांनी खऱ्या अर्थानं अभ्यासाला लागायला हवं.

Published by: Kranti Kanetkar
First published: December 27, 2020, 9:15 AM IST
Tags: CBSE

ताज्या बातम्या