मुंबई, 03मार्च : CBSE Accountancy Sample Paper: वाणिज्य शाखेचा सर्वात चांगले मार्क मिळवून देणारा किंवा नापास होण्याची भीती असणारा पेपर म्हणजे Accountancy. सीबीएसीच्या दहावी-बारावीच्या परीक्षा सुरू आहेत तर महाराष्ट्र SSC बोर्डाचे पेपर मंगळवारपासून सुरू होत आहेत. CBSEचा बारावीचा Accountancy या विषयाचा पेपर 5 मार्च रोजी होणार आहे. या विषयाची तयारी करताना विशेष काळजी घ्यावी लागते. यासाठी प्रश्नाचं स्वरूप समजून घेण्यासाठी मागील वर्षांचे काही पेपर पाहाणं आवश्यक असतं. ऐनवेळी पेपर मागील वर्षांचे पेपर मिळतातच असं नाही म्हणूनच आम्ही आपल्यासाठी खास CBSE Accountancy विषयाचा सॅम्पल पेपर आणला आहे. हा पेपर आपण डाऊनलोडही करू शकता किंवा पीडीएफ डाऊनलोड करून प्रिंटही घेऊ शकता.
या पेपरच्या मदतीनं आपल्याला चांगले मार्क मिळवण्यासाठी मदत होणार आहे. या विषयात चांगले मार्क मिळवण्यासाठी खास टिप्स आज आम्ही आपल्याला सांगणार आहोत.
1. Accountacyचे बेसिक्स क्लीअर असणं फार महत्त्वाचं आहे. ते नसतील तर तुम्हाला पेपर सोडवताच येणार नाही. त्यामुळे त्या आपल्या मित्र मैत्रिणींकडून आधी क्लिअर करून घ्या.
2. बॅलन्स शीटचा आराखडा योग्य पद्धतीनं तयार करा. जिथे आवश्यकतेनुसार नोट लिहावी. अथवा माहिती द्यावी.
3. लेजर, जनरल आणि व्यवहारांची आकडेमोड करताना खाडाखोड किंवा ओव्हरराईट करू नका, त्यामुळे मार्क जातात.
4. प्रश्न क्रमांक चुकवू नका, नवा प्रश्न नवीन पानावर घ्या. लेजर किंवा जरनलचे प्रश्न किंवा अकाऊंट मांडायचे प्रश्न असतील तर ते दोन पानांवर मिळून सोडवा. म्हणजे जागाही पुरेल आणि सुटसुटीत दिसेल.
5. पेपर पूर्ण सोडवण्यावर भर द्या. अकाऊंटचा पेपर एकतर वेळेत होतो किंवा बराचसा पेपर राहातो. टॅली लागत नसेल तर त्यावर तासभर वेळ वाया घालवू नका. पुढचे प्रश्न सोडवायला घ्या. प्रत्येक स्टेपला मार्क आहेत. त्यामुळे त्या गाळू नका. तिथे मार्क मिळण्याची संधी असते.