मराठी बातम्या /बातम्या /करिअर /

CBSE Board 12th Exams: कोणत्या आधारे लागणार 12वीचा रिझल्ट, वाचा डिटेल्स

CBSE Board 12th Exams: कोणत्या आधारे लागणार 12वीचा रिझल्ट, वाचा डिटेल्स

कुठलातरी एकच निकष गृहित धरून विद्यार्थ्यांचे गुण ठरवले जाणार नसून ते ठरवताना 3 ते 4 वेगवेगळे निकष (Parameters) लक्षात घेतले जातील असं शिक्षणतज्ज्ञांचं मत आहे.

कुठलातरी एकच निकष गृहित धरून विद्यार्थ्यांचे गुण ठरवले जाणार नसून ते ठरवताना 3 ते 4 वेगवेगळे निकष (Parameters) लक्षात घेतले जातील असं शिक्षणतज्ज्ञांचं मत आहे.

कुठलातरी एकच निकष गृहित धरून विद्यार्थ्यांचे गुण ठरवले जाणार नसून ते ठरवताना 3 ते 4 वेगवेगळे निकष (Parameters) लक्षात घेतले जातील असं शिक्षणतज्ज्ञांचं मत आहे.

नवी दिल्ली, 2 जून: सीबीएसईच्या 12 वीच्या बोर्डाच्या परीक्षा (CBSE board 12th Exams) रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानंतर पालकांना ही चिंता आहे की प्रिलीम परीक्षा, वर्गातील वर्तन, इंटर्नल असेसमेंट यापैकी कशाच्या आधारे आता 12 वीचा निकाल लागणार आहे. जर प्रिलिममधील गुणांच्या (Prelim exam) आधारे निकाल लागला, तर विद्यार्थ्यांना कमी टक्के, गुण मिळतील. कारण विद्यार्थ्यांनी बोर्डाच्या परीक्षेसाठी आणखी कसून अभ्यास करावा म्हणून शाळेतील शिक्षक प्रिलिमचे पेपर कडक तपासतात. पण कुठलातरी एकच निकष गृहित धरून विद्यार्थ्यांचे गुण ठरवले जाणार नसून ते ठरवताना 3 ते 4 वेगवेगळे निकष (Parameters) लक्षात घेतले जातील असं शिक्षणतज्ज्ञांचं मत आहे. एल्कॉन ग्रुप ऑफ स्कूलचे संचालक आणि शिक्षणतज्ज्ञ (Educationalist) अशोक पांडेय म्हणाले, ‘सरकारचा हा निर्णय स्वागतार्ह आहे. विद्यार्थ्यांच्या भविष्याबद्दलची संदिग्धता कमी झाल्यामुळे मुलं आणि पालकांवरील ताण कमी होईल. या निर्णयामुळे विद्यार्थ्यांच्या करिअरवर (Career) मोठा परिणाम होईल अशा अफवा पसरायला नकोत. जरी परीक्षा रद्द झाली असली तरीही विद्यार्थ्यांना गुण कसे द्यायचे याबद्दल निर्णय घेण्यासाठी सीबीएसईला थोडा वेळ द्यायला हवा जेणेकरून ते तज्ज्ञांच्या सल्ल्यानं योग्य निर्णय घेऊ शकतील.’ आता अशी शक्यता व्यक्त होत आहे, की 3 ते 4 पॅरॅमीटर्सवर हा निकाल लावला जाईल. कुठल्याही एका पॅरॅमीटरचं वेटेज एकूण निकालाच्या 10 ते 15 टक्के असू शकतं. या प्रिलिमचे मार्क गृहित धरले जाऊ शकतात. शाळेत बोर्डाच्या नावाने केलेल्या असाइनमेंट (Assignment) किंवा प्रोजेक्ट (Project) तसंच प्रॅक्टिकलला (Practical exam) मिळालेले मार्कही एक पॅरॅमीटर असू शकतो.

(वाचा - CBSE 12वी परीक्षा रद्द, निकाल मान्य नसल्यास विद्यार्थ्यांसमोर 'हा' पर्याय)

त्याचबरोबर विद्यार्थ्याने मागच्या तीन वर्षांत मिळवलेल्या गुणांच्या आधारेही त्यांचे मार्क ठरवले जाऊ शकतात. एखादी शॉर्ट असेसमेंट टेस्टही घेतली जाऊ शकते अर्थात ऑनलाइनच (online). अशाप्रकारे तीन ते चार असेसमेंटचा विचार करून विद्यार्थ्यांचा निकाल लावला जाऊ शकतो. विद्या बाल भवनचे संचालक डॉ. सतवीर शर्मा म्हणाले, ‘प्रिलिममधील गुणांचा समावेश निकालाच्या निकषांमध्ये केला जाणारच आहे. तसंच इंटर्नल असेसमेंटच्या आधारे पण रिझल्ट तयार केला जाऊ शकतो.’

(वाचा - ISC 12 Exams: आयसीएसई बोर्डाच्या 12वीच्या परीक्षा रद्द)

महाराष्ट्रात मात्र राज्य बोर्डाच्या 12 वीच्या परीक्षांबदद्ल अद्याप निर्णय झालेला नाही. तो एक-दोन दिवसांत होईल अशी आशा आहे. सीबीएसईच्या धर्तीवर महाराष्ट्रातही 12 वीची परीक्षा रद्द केली जावी अशी पालकांची मागणी आहे. सरकार काय निर्णय घेतं याकडे सगळ्यांच लक्ष लागलं आहे.
Published by:Karishma Bhurke
First published:

Tags: Board Exam, CBSE

पुढील बातम्या