मराठी बातम्या /बातम्या /करिअर /

CBSE Exam Date: दहावी-बारावीच्या परीक्षांचं वेळापत्रक जाहीर; मेमध्ये सुरू होणार

CBSE Exam Date: दहावी-बारावीच्या परीक्षांचं वेळापत्रक जाहीर; मेमध्ये सुरू होणार

केंद्रीय शिक्षण खात्याचे मंत्री रमेश पोखरियाल निशांक यांनी दहावी बारावीच्या (CBSE Board class x exam) परीक्षांच्या तारखांची घोषणा केली.

केंद्रीय शिक्षण खात्याचे मंत्री रमेश पोखरियाल निशांक यांनी दहावी बारावीच्या (CBSE Board class x exam) परीक्षांच्या तारखांची घोषणा केली.

केंद्रीय शिक्षण खात्याचे मंत्री रमेश पोखरियाल निशांक यांनी दहावी बारावीच्या (CBSE Board class x exam) परीक्षांच्या तारखांची घोषणा केली.

  • Published by:  अरुंधती रानडे जोशी

नवी दिल्ली, 31 डिसेंबर : CBSE बोर्डाच्या दहावी आणि बारावीच्या परीक्षांच्या तारखा जाहीर झाल्या आहेत. दहावीची परीक्षा (CBSE Board class 10th exam date) आणि बारावीची (cbse board class 12th exam date) परीक्षा 4 मे ते 15 जुलै या दरम्यान होईल. केंद्रीय शिक्षण खात्याचे मंत्री रमेश पोखरियाल निशांक यांनी परीक्षांच्या तारखांची घोषणा केली.   Covid-19मुळे यंदाचं शैक्षणिक वर्षं लांबलं. त्यामुळे बोर्डाच्या परीक्षाही उशीरा घेण्यात येत आहेत. दहावी-बारावीच्या बोर्डाच्या परीक्षांचे निकाल 15 जुलैच्या आत लागतील, अशीही घोषणा शिक्षण मंत्र्यांनी केली.

या वर्षी Coronavirus च्या प्रादुर्भावामुळे अनेक शहरांमध्ये अजूनही शाळा सुरू होऊ शकलेल्या नाहीत. देशात अनेक ठिकाणी ऑनलाइन शिक्षण सुरू आहे. शालेय वर्षाची सुरुवातही Covid-19 मुळे उशीरा झाली. त्यामुळे यंदा दहावी-बारावीच्या परीक्षादेखील उशीरा होणार, असं गेल्या आठवड्यात जाहीर करण्यात आलं होतं. गेल्याच आठवड्यात पोखरियाल यांनी ट्वीट करून आपण 31 डिसेंबरला CBSE Board Exams 2021 ची घोषणा करू, असं सांगितलं होतं. या वर्षी परीक्षा फेब्रुवारीनंतरच होणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं होतं.

परीक्षा नेहमीप्रमाणे पेन आणि पेपरवर होईल. ऑनलाइन स्वरूपाची नसेल, असंही त्यांनी स्पष्ट केलं. देशात अनेक भागात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झालेला नाही. त्यातच नवीन कोरोनाव्हायरच्या नव्या अवताराने (New coronavirus strain) जगभरात पुन्हा खळबळ उडवली आहे.

या पार्श्वभूमीवर दिल्ली सरकारने दहावी-बारावीच्या परीक्षा मेमध्ये घेण्याची मागणी केली होती.

कमी अभ्यासक्रमाची परीक्षा

या वर्षीच्या दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी अभ्यासक्रमही कमी केलेला असेल. विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ नये, त्यांच्या पुढच्या शिक्षणात अडचणी निर्माण होऊ नयेत यासाठी अभ्यासक्रम वगळताना काळजी घेण्यात आली. शैक्षणिक वर्ष कोरोनामुळे उशीरा सुरू झालं. त्यामुळे नेहमीचा अभ्यासक्रम पूर्ण होणं अशक्य आहे. शिवाय ऑनलाइन वर्ग सुरू असल्याने विद्यार्थ्यांना अवघड संकल्पना समजण्यासही अडचणी येत आहेत. अशा परिस्थितीत CBSE ने अभ्यासक्रम कमी करण्याचा निर्णय घेतला होता.  एकूण सिलॅबसच्या 30 टक्के वजा करून बहुतेक राज्य बोर्डाची परीक्षा घेणार आहेत. प्रत्यक्ष परीक्षेतही मुलांना 33टक्के अंतर्गत पर्यायांचे प्रश्न विचारण्यात येतील. मुलांचं आकलन तपासलं जाईल, असं पोखरियाल यांनी सांगितलं होतं.

First published:

Tags: 10th class, CBSE