Home /News /career /

CBSE Results: निकालाचं काऊंटडाऊन सुरु; येत्या आठवड्यात जाहीर होणार CBSE बोर्डाचा निकाल?

CBSE Results: निकालाचं काऊंटडाऊन सुरु; येत्या आठवड्यात जाहीर होणार CBSE बोर्डाचा निकाल?

CBSE च्या निकालांच्या संदर्भात एक महत्त्वाची अपडेट

CBSE च्या निकालांच्या संदर्भात एक महत्त्वाची अपडेट

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (CBSE) या महिन्यात आणि जुलै महिन्यात इयत्ता 10वी टर्म 2 च्या परीक्षेचा निकाल जाहीर करू शकते,

  मुंबई, 02 जुलै: राज्य मंडळाने 10 वी आणि 12वीच्या परीक्षांचे निकाल जाहीर केले आणि पुढच्या वर्गातल्या प्रवेश प्रक्रिया सुरू झाल्या आहेत. परंतु 'सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन'ने (CBSE) अद्याप निकाल जाहीर केले नाहीत. सीबीएसईकडून लवकरच इयत्ता 10वी आणि 12वीच्या निकालाच्या तारखा जाहीर केल्या जाणं अपेक्षित आहे. सीबीएसई बोर्डाकडून 10वी आणि 12वीचे निकाल 15 जुलैपर्यंत जाहीर होण्याची शक्यता आहे. 35 लाखांहून अधिक विद्यार्थी त्यांच्या निकालाची आतुरतेने वाट पाहत आहेत. नुकत्याच आलेल्या अपडेटनुसार, CBSE इयत्ता 10वीचे निकाल (CBSE Board 10th Result 2022) 4 जुलैच्या आसपास आणि इयत्ता 12वीचे निकाल (CBSE Board 12th Results 2022) 10 जुलैच्या आसपास जाहीर करील अशी अपेक्षा आहे; मात्र बोर्डाने अजून कोणतीही तारीख (CBSE Term II Result date) जाहीर केलेली नाही. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (CBSE) या महिन्यात आणि जुलै महिन्यात इयत्ता 10वी टर्म 2 च्या परीक्षेचा निकाल जाहीर करू शकते, तर 12वीचा निकाल 2022 जुलैच्या दुसऱ्या आठवड्यात जाहीर केला जाईल. CBSE सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार इयत्ता 10वीचा निकाल जूनच्या अखेरीस किंवा जुलैच्या पहिल्या आठवड्यात जाहीर केला जाईल, पुढच्या महिन्यात 12वीचा निकाल 2022 ला अपेक्षित आहे. तब्बल 2500 कर्मचाऱ्यांना कामावरून का काढलं? Byju's नं अखेर सांगितलं मोठं कारण
  असं होईल मूल्यांकन
  CBSE बोर्डाकडून टर्म 1 च्या परीक्षेच्या निकालानंतर, यावेळी निकाल एकत्रित केला जाणार आहे, म्हणजे टर्म 1 आणि टर्म 2 च्या दोन्ही परीक्षांचे निकाल त्यात समाविष्ट केले जातील. CBSE बोर्ड टर्म 2 चा निकाल तपासण्यासाठी, विद्यार्थी अंतिम निकालातून टर्म 1 परीक्षेचा निकाल वजा करू शकतात. ठाकरे सरकार कोसळण्यापूर्वी TET परीक्षेबाबत झाला होता 'हा' महत्त्वाचा निर्णय असा चेक करा निकाल CBSE बोर्डाचा 10वी 12वीचा निकाल पाहण्यासाठी, विद्यार्थ्यांना प्रथम CBSE बोर्डाच्या अधिकृत वेबसाइट cbseresults.nic.in ला भेट द्यावी लागेल. वेबसाइटच्या मुख्यपृष्ठावर, तुम्हाला 10वी 12वीचा निकाल पाहण्यासाठी लिंक सापडतील. आता तुम्हाला ज्या वर्गाचा निकाल पाहायचा आहे त्यावर क्लिक करा. क्लिक केल्यावर तुमच्या समोर एक नवीन पेज उघडेल. येथे तुम्हाला रोल नंबर आणि जन्मतारीख टाकून आवश्यक तपशील सबमिट करावा लागेल. तुम्ही सबमिट करताच तुमचा निकाल तुमच्या समोर स्क्रीनवर दिसेल.
  Published by:Atharva Mahankal
  First published:

  Tags: Board Exam, CBSE 10th, CBSE 12th, Exam Fever 2022, Exam result

  पुढील बातम्या