मराठी बातम्या /बातम्या /करिअर /

CBSE 12th Result Live: यंदाही मुलींनीच मारली बाजी; तब्बल 1.34 लाख विद्यार्थ्यांना 90%+ मार्क्स

CBSE 12th Result Live: यंदाही मुलींनीच मारली बाजी; तब्बल 1.34 लाख विद्यार्थ्यांना 90%+ मार्क्स

CBSE 12th Result Live

CBSE 12th Result Live

नेहमीप्रमाणे यंदाही मुलींनीच CBSE निकालात बाजी मारली आहे. यंदा मुलींच्या पास होण्याची आकडेवारी 94.54% इतकी आहे तर मुलांच्या पास होण्याची टक्केवारी 91.25% इतकी आहे.

  मुंबई, 22 जुलै: गेल्या कित्येक दिवसांपासून CBSEचे विद्यार्थी ज्या क्षणाची वाट बघत होते तो क्षण अखेर आला आहे. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ, CBSE ने इयत्ता 12वी साठी CBSE निकाल 2022 (CBSE 12th Result 2022) प्रसिद्ध केला आहे. CBSE 12वीचा निकाल 2022 आता results.cbse.nic.in, cbse.gov.in वर ऑनलाइन तपासता येईल. यासोबतच विद्यार्थ्यांना डिजिलॉकरवरही त्यांचा निकाल पाहता येणार आहे. CBSE बारावीचे निकाल सध्या परिक्षा संगमवर अपलोड केले आहेत. यंदा उत्तीर्ण होण्याचे प्रमाण 92.71 टक्के आहे.तर यंदाही मुलींनीच बाजी मारली आहे. नेहमीप्रमाणे यंदाही मुलींनीच CBSE निकालात बाजी मारली आहे. यंदा मुलींच्या पास होण्याची आकडेवारी 94.54% इतकी आहे तर मुलांच्या पास होण्याची टक्केवारी 91.25% इतकी आहे. त्यामुळे मुलींचा निकाल मुलांपेक्षा चांगला आहे. तसंच तृतीयपंथीयांचा निकाल 100% लागला आहे. CBSE 12th Result 2022: अखेर प्रतीक्षा संपली; CBSE12वीचा निकाल जाहीर; असा लगेच बघा तुमचा Result
  गेल्या वर्षीपेक्षा टक्केवारी कमी
  गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा बीएसई बारावीचा निकाल तुलनेने निस्तेज होता. कमी विद्यार्थ्यांना 90+% गुण मिळाले आहेत. 2021 च्या तुलनेत ही मोठी घसरण आहे. बोर्डाने मात्र गेल्या वर्षी महामारीमुळे कोणत्याही परीक्षा घेतल्या नाहीत आणि 2020 मध्येही काही परीक्षा मध्यमार्गी रद्द कराव्या लागल्या. एकूण 1,34,797 विद्यार्थ्यांना 90+ गुण मिळाले आहेत. गेल्या तीन वर्षांतील हा नीचांक आहे. 2020 मध्ये 1.57 लाख आणि 2021 मध्ये तब्बल 1.50 लाख विद्यार्थ्यांना 90+% मिळाले होते. CBSE Results Live: आज दुपारी 2 वाजता लागणार CBSE 10वीचा निकाल? समोर आली मोठी अपडेट असा मिळवा DigiLocker PIN cbse.digitallocker.gov.in वर जा LOC क्रेडेन्शियल वापरून लॉग इन करा आणि 'शाळा म्हणून लॉग इन करा' निवडा पिन फाइल डाउनलोड करा वर क्लिक करा वर्ग निवडा डाऊनलोड केल्यानंतर, शाळा सुरक्षिततेच्या उद्देशाने विद्यार्थ्यांसोबत पिन वैयक्तिकरित्या शेअर करू शकतात
  Published by:Atharva Mahankal
  First published:

  Tags: CBSE 10th, CBSE 12th, Exam Fever 2022, Exam result

  पुढील बातम्या