मराठी बातम्या /बातम्या /करिअर /

CBSE 12th Exam Pattarn : बारावी बोर्डाची परीक्षा ऑफलाइनच! असा असेल बदललेला पॅटर्न

CBSE 12th Exam Pattarn : बारावी बोर्डाची परीक्षा ऑफलाइनच! असा असेल बदललेला पॅटर्न

CBSE Board exam new pattern:  Coronavirus मुळे यंदाच्या परीक्षा नियमित प्रोटोकॉलनुसार घेण्यात येणार नाहीत. CBSE  ने फक्त काही विषयांची परीक्षा घेण्याचे सुचवले आहे.

CBSE Board exam new pattern: Coronavirus मुळे यंदाच्या परीक्षा नियमित प्रोटोकॉलनुसार घेण्यात येणार नाहीत. CBSE ने फक्त काही विषयांची परीक्षा घेण्याचे सुचवले आहे.

CBSE Board exam new pattern: Coronavirus मुळे यंदाच्या परीक्षा नियमित प्रोटोकॉलनुसार घेण्यात येणार नाहीत. CBSE ने फक्त काही विषयांची परीक्षा घेण्याचे सुचवले आहे.

  • Published by:  News18 Desk

नवी दिल्ली, 24 मे : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाद्वारे (CBSE) घेतल्या जाणाऱ्या 12 वीच्या बोर्ड परीक्षा 15 जुलै ते 26 ऑगस्ट या कालावधीत होण्याची शक्यता आहे. परीक्षेचे अंतिम वेळापत्रक 1 जूननंतर जाहीर होईल, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. यासाठी सध्या बोर्डाच्या बैठका सुरू आहेत. कोरोनाच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर परीक्षेची पद्धत (12th Exam Pattarn) बदलली जाण्याची शक्यता आहे. दरम्यान, विद्यार्थ्यांपैकी काही जण बारावीच्या ऑफलाइन परीक्षा रद्द करण्याच्या मागणीसाठी सोशल मीडियावर निषेध व्यक्त करत आहेत.

यंदाच्या परीक्षा नियमित प्रोटोकॉलनुसार घेण्यात येणार नाहीत. सीबीएसईने एकतर फक्त काही विषयांची परीक्षा घेण्याचे किंवा सर्व विषयांची परीक्षा तीन तासांऐवजी दीड तासांची घेण्याचे सुचवले होते. उच्च पदाधिकारी आणि राज्य शिक्षण सचिव यांच्यात काल झालेल्या बैठकीत बहुतेक राज्यांनी यातील दुसऱ्या प्रकाराला अनुमोदन दिले आहे. मात्र, काही मंत्र्यांनी या दोन्ही प्रकारांच्या मिश्रणाची मागणी केली होती. यातील दुसरा प्रकार स्वीकारल्यास परीक्षेची पद्धत बदलली जाईल. 1.5 तासांच्या परीक्षेसाठी, विद्यार्थ्यांना दिलेल्या वेळेत परीक्षा पूर्ण करता यावी यासाठी केवळ बहुपर्यायी प्रश्न (एमसीक्यू-MCQ) आणि अगदी लहान उत्तरे लिहिण्याचे प्रश्न असतील.

सुत्रांच्या माहितीनुसार केंद्राकडून राज्यांसमोर परीक्षेसंबधी दोन पर्याय ठेवण्यात आले व ही परीक्षा रद्द न करण्याचा निर्णय झाला असून, जुलै महिन्यात ही परीक्षा होण्याची शक्यता आहे.

हे वाचा - राहुल गांधींना ‘लोकशाहीचा राजा’ म्हणणारेच मोदींच्या विजयास कारणीभूत, जावेद अख्तरांनी सलमान खुर्शीदांना सुनावलं

याबाबत केंद्रीय शिक्षण मंत्री रमेश पोखरियाल यांनी माहिती देताना सांगितले आहे की,  बारावीच्या बोर्ड परीक्षांबाबत अन्य राज्यांसोबतची बैठक फलदायी ठरली. कारण, आम्हाला त्यांच्याशी अत्यंत महत्वपूर्ण सल्लामसलत करता आली. मी राज्य सरकारांना २५ मे पर्यंत आपल्या विस्तृत सूचना पाठवण्यास सांगितलं आहे. यामुळे आम्ही इय़त्ता बारावीच्या बोर्ड परीक्षेसंदर्भात एका निर्णयापर्यंत पोहचू आणि विद्यार्थी व पालकांमधील संभ्रम दूर करण्यासाठी त्यांना आपल्या निर्णयाबाबत लवकरच सूचित करू. विद्यार्थी व शिक्षक दोघांचीही सुरक्षा आमच्यासाठी अतिशय महत्वाची आहे.

First published:

Tags: Board Exam, CBSE