Home /News /career /

CBSE 10th Result: दहावीच्या निकालाची तारीख ठरली?; उद्याच जाहीर होणार निकाल?; असा बघा तुमचा Result

CBSE 10th Result: दहावीच्या निकालाची तारीख ठरली?; उद्याच जाहीर होणार निकाल?; असा बघा तुमचा Result

CBSE चा दहावीचा निकाल (CBSE Result 2022) हा उद्या म्हणजेच 04 जुलैला जाहीर होणार आहे. इतके दिवसांपासून विद्यार्थ्यांच्या मनात असलेल्या प्रश्नाचं उत्तर आता मिळालं आहे.

    मुंबई, 03 जुलै: राज्य मंडळाने 10 वी आणि 12वीच्या परीक्षांचे निकाल जाहीर केले आणि पुढच्या वर्गातल्या प्रवेश प्रक्रिया सुरू झाल्या आहेत. परंतु 'सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशन'ने (CBSE Term 2 result 2022) अद्याप निकाल जाहीर केले नाहीत. सीबीएसईकडून लवकरच इयत्ता 10वी आणि 12वीच्या निकालाच्या तारखा जाहीर केल्या जाणं अपेक्षित होतं. त्यानुसार आता CBSE चा दहावीचा निकाल (CBSE Result 2022) हा उद्या म्हणजेच 04 जुलैला जाहीर होण्याची शक्यता आहे. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने दोन्ही टर्मचा निकाल 50:50 मार्किंग योजनेच्या आधारे लावण्याचा निर्णय घेतला होता. पण नंतर त्याचे प्रमाण बदलून 30:70 झाले. वास्तविक, सीबीएसई बोर्डाची टर्म 1 परीक्षा होम सेंटरवर घेण्यात आली होती. यामध्ये परीक्षेदरम्यान अनेक शाळांनी विद्यार्थ्यांना अनैतिक कृत्यांमध्ये मदत केल्याच्या तक्रारी होत्या. अशा स्थितीत बोर्डाने टर्म 1 ची टक्केवारी कमी करण्याचा निर्णय घेतला. कागदपत्र हरवल्यास काय कराल सीबीएसई बोर्डाचे कोणतेही दस्तऐवज हरवल्यास, त्याची दुसरी प्रत मिळविण्यासाठी बोर्डाच्या www.cbse.gov.in या पोर्टलवर अर्ज करण्याची सुविधा आहे. जर कागदपत्र हरवले असेल तर तुम्ही सेंट्रल बोर्ड ऑफ सेकंडरी एज्युकेशनच्या वेबसाइटवर ऑनलाइन अर्ज करून तुमची समस्या नोंदवू शकता. CBSE बोर्ड स्वतः पडताळणी करेल आणि कागदपत्रांची एक प्रत तुमच्या पत्त्यावर पाठवेल. असं होईल मूल्यांकन CBSE बोर्डाकडून टर्म 1 च्या परीक्षेच्या निकालानंतर, यावेळी निकाल एकत्रित केला जाणार आहे, म्हणजे टर्म 1 आणि टर्म 2 च्या दोन्ही परीक्षांचे निकाल त्यात समाविष्ट केले जातील. CBSE बोर्ड टर्म 2 चा निकाल तपासण्यासाठी, विद्यार्थी अंतिम निकालातून टर्म 1 परीक्षेचा निकाल वजा करू शकतात. असा चेक करा निकाल CBSE बोर्डाचा 10वी 12वीचा निकाल पाहण्यासाठी, विद्यार्थ्यांना प्रथम CBSE बोर्डाच्या अधिकृत वेबसाइट cbseresults.nic.in ला भेट द्यावी लागेल. वेबसाइटच्या मुख्यपृष्ठावर, तुम्हाला 10वी 12वीचा निकाल पाहण्यासाठी लिंक सापडतील. आता तुम्हाला ज्या वर्गाचा निकाल पाहायचा आहे त्यावर क्लिक करा. क्लिक केल्यावर तुमच्या समोर एक नवीन पेज उघडेल. येथे तुम्हाला रोल नंबर आणि जन्मतारीख टाकून आवश्यक तपशील सबमिट करावा लागेल. तुम्ही सबमिट करताच तुमचा निकाल तुमच्या समोर स्क्रीनवर दिसेल.
    Published by:Atharva Mahankal
    First published:

    Tags: CBSE 10th, CBSE 12th, Exam Fever 2022, Exam result

    पुढील बातम्या