मराठी बातम्या /बातम्या /करिअर /

CBSE 10th Result 2022: दहावीचा निकाल आज जाहीर होण्याची शक्यता, कुठे चेक कराल

CBSE 10th Result 2022: दहावीचा निकाल आज जाहीर होण्याची शक्यता, कुठे चेक कराल

बारावीच्या टर्म 1 परीक्षांचा निकाल

बारावीच्या टर्म 1 परीक्षांचा निकाल

सीबीएसईच्या अधिकृत वेबसाइटवर विद्यार्थ्यांना निकाल पाहता येणार आहे. Cbse.gov.in आणि cbresults.nic.in या वेबसाइटवर गेल्यानंतर होमपेजवर CBSE Class 10 Result या लिंकवर क्लिक करायचे.

नवी दिल्ली, 4 जुलै : विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक जीवनातील अतिशय महत्त्वाचा टप्पा असणाऱ्या राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा (SSC Board) दहावी परीक्षेचा निकाल काही दिवसांपूर्वीच लागला. यात राज्यातील विद्यार्थ्यांनी देदीप्यमान यश मिळवलं. आता 4 जुलै 22 म्हणजे आज केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाकडून (CBSE) दहावीचा निकाल घोषित केला जाण्याची शक्यता आहे. 24 मे रोजी सीबीएसईकडून दहावीची परीक्षा घेण्यात आली होत्या. त्यानंतर विद्यार्थ्यांना निकालाची प्रतीक्षा होती. आता ही प्रतीक्षा संपली असून 21 लाख विद्यार्थ्यांना त्यांचा निकाल पाहता येणार आहे. या संदर्भात ‘टीव्ही नाइन हिंदी’ने वृत्त दिलं आहे. सीबीएसईच्या दहावी परीक्षेचा निकाल मंडळाच्या अधिकृत वेबसाइटवर (Official Website) cbseresults.nic.in आणि cbse.gov.in वर पाहता येणार आहे. देशभरामध्ये लाखो विद्यार्थी दरवर्षी सीबीएसईतून दहावीची परीक्षा देत असतात. परीक्षा संपल्यानंतर विद्यार्थ्यांमध्ये निकालाची प्रचंड उत्सुकता असते. यंदा देशभरातील 21 लाख विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली असून, आता निकाल लावण्याची मंडळाकडून तयारी पूर्ण करण्यात आली आहे. क्या बात है! 'या' क्षेत्रांमध्ये करिअर केलंत तर तुमची लाईफ सेट; प्रत्येक महिन्याला मिळेल लाखो रुपये पगार यंदा निकालासाठी का लागला उशीर सीबीएसईच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, शाळांनी विद्यार्थ्यांचे अंतर्गत मूल्यांकन गुण (Internal Assessment Marks) वेळेत अपलोड करणं अत्यावश्यक होतं. परंतु, अनेक शाळांनी इंटर्नल गुण अपलोड केले नाहीत. तसंच काही शाळांनी विद्यार्थ्यांना मिळालेल्या गुणांमध्ये त्रुटी असल्याचं म्हटलं होतं. या सर्व तक्रारींचा सीबीएसईकडून तपास करण्यात आला. या प्रक्रियेला वेळ लागल्याने त्याचा परिणाम निकालावर झाला असून यासाठी उशीर लागला आहे. पण आता 4 जुलै रोजी निकाल घोषित करण्यात येईल. याशिवाय सीबीएसई 12वीचा निकाल 10 जुलै रोजी जाहीर करण्यात येणार आहे. नोकरीची मोठी सुवर्णसंधी! कोणतीही परीक्षा न देता तब्बल 80,000 रुपये पगाराची नोकरी सीबीएसई निकालाचं प्रमाण 30:70 असणार यंदाच्या वर्षी दोन्ही सत्रांचा निकाल 50:50 मार्किंग स्किमच्या (Marking Scheme) आधारावर होणार असल्याचे जाहीर करण्यात आले होते. पहिल्या सत्राची परीक्षा होम सेंटरवर झाली होती. त्यामुळे तिथे विद्यार्थ्यांनी गुणांमध्ये फेरफार केल्याच्या अनेक तक्रारी प्राप्त झाल्या. ही बाब लक्षात घेऊन सीबीएसईने होम सेंटरवर झालेल्या निकालाचं प्रमाण (Ratio) कमी करून 30 टक्के इतकंच केलं आहे. त्यामुळे या वर्षी पहिल्या सत्रातील 30 टक्के आणि दुसऱ्या सत्रातील 70 टक्के असे गुण गृहित धरले जाणार असल्याचं सीबीएसईने स्पष्ट केलं आहे. याच कारणामुळे यंदाच्या वर्षी निकाल लागण्यासाठी उशीर लागला आहे. निकालानंतर स्कोर कार्ड असे करता येईल डाउनलोड सीबीएसईच्या अधिकृत वेबसाइटवर विद्यार्थ्यांना निकाल पाहता येणार आहे. Cbse.gov.in आणि cbresults.nic.in या वेबसाइटवर गेल्यानंतर होमपेजवर CBSE Class 10 Result या लिंकवर क्लिक करायचे. इथे विद्यार्थ्याचा नोंदणी क्रमांक (Registration Number) व आसन क्रमांक (Roll Number) टाकायचा. त्यानंतर स्क्रीनवर स्कोअर कार्ड पाहता येणार आहे. भविष्यात याचा उपयोग व्हावा म्हणून स्कोअर कार्डची प्रिंट काढून घेता येईल. दरम्यान, दहावीच्या निकालानंतर विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक जीवनाला नवं वळण लागत असतं. आपल्या आवडत्या क्षेत्रात पदार्पण करण्यासाठी विद्यार्थी सज्ज होत असतात. त्यामुळे याचा निकाल पाहण्यासाठी विद्यार्थ्यांत प्रचंड उत्सुकता पाहायला मिळतं.
First published:

Tags: CBSE 10th, Exam result, Students

पुढील बातम्या