• Home
 • »
 • News
 • »
 • career
 • »
 • CBSE 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी, आज नाही तर 'या' तारखेला लागणार निकाल

CBSE 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी, आज नाही तर 'या' तारखेला लागणार निकाल

CBSE बोर्डाच्या प्रवक्त्यांनी दिलले्या माहितीनुसार, आज दहावीचा निकाल लागणार नाही आहे.

 • Share this:
  नवी दिल्ली, 14 जुलै : CBSE (Central Board of Secondary Education, CBSE) बोर्डाच्या इयत्ता बारावीचा निकाल सोमवारी (13 जुलै) रोजी जाहीर झाला. यामुळं आज 10वीचा निकाल लागणार असल्याच्या चर्चा आहे. मात्र CBSE बोर्डाच्या प्रवक्त्यांनी दिलले्या माहितीनुसार, आज दहावीचा निकाल लागणार नाही आहे. 15 जुलै रोजी निकाल लागण्याची शक्यता आहे. अद्याप अधिकृत घोषणा करण्यात आली नसली तरी, अशी शक्यता मात्र वर्तवण्यात आली आहे. CBSE चे निकाल पाहण्यासाठी आपण cbse.nic.in, www.results.nic.in किंवा www.cbseresults.nic.in यापैकी कोणत्याही संकेतस्थळावर भेट देऊ शकता. तिथे गेल्यानंतर आपल्याला लिंकवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर आपला सीट नंबर टाकून माहिती अपलोड केली की आपल्याला निकाल पाहता येणार आहे. हा निकाल ऑनलाइन स्वरुपात असेल. निकालाची प्रत येण्यासंदर्भात विद्यार्थ्यांना महाविद्यालयाकडून अधिकृत तारीख सांगण्यात येईल अशी माहिती मिळाली आहे. वाचा-आज नाही तर 'या' तारखेला लागणार 12वीचा निकाल, बोर्डानं केलं स्पष्ट यंदा देशभरात तब्बल 18 लाख विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. याआधी 13 जुलै रोजी 12वीचे निकाल जाहीर झाल्यानंतर विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम होता. मात्र दहावीचा निकाल आज लागणार नसल्याची माहिती हिंदुस्थान टाईम्स या वृत्तपत्रानं दिली आहे. या तारखेला लागणार HSC आणि SSCच्या विद्यार्थ्यांचे निकाल कोरोना व्हायरसमुळे महाराष्ट्र बोर्डाचे दहावी-बारावीच्या उर्वरित परीक्षा रद्द करण्यात आल्यानंतर लवकर निकाल लागेल अशी आशा विद्यार्थ्यांना आहे. दरम्यान 14 तारखेला निकाल लागण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. मात्र आज निकाल लागणार नसल्याचे महाराष्ट्र बोर्डानं जाहीर केले आहे. अद्याप निकाल कधी लागणार याची अंतिम तारखा जाहीर करण्यात आल्या नाही आहेत. शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी याआधी 10वी-12वीचे निकाल हे 15 ते 20 जुलै दरम्यान लागण्याची शक्यता असल्याचे जाहीर केले होते. त्यामुळं 12वीचे निकाल 20 जुलैच्या आधी लागण्याची शक्यता आहे. वाचा-सध्या अंतिम वर्षाची परीक्षा शक्य नाही, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत निर्णय
  Published by:Priyanka Gawde
  First published: