मराठी बातम्या /बातम्या /करिअर /CBSE 10th 12th Result 2021: विद्यार्थ्यांनो. 'डिजिलॉकर'वर बघता येणार निकाल; असं करा रजिस्ट्रेशन

CBSE 10th 12th Result 2021: विद्यार्थ्यांनो. 'डिजिलॉकर'वर बघता येणार निकाल; असं करा रजिस्ट्रेशन

डिजीलॉकरमध्ये लॉग इन करून विद्यार्थ्यांना त्यांची महत्त्वपूर्ण कागदपत्रं मिळू शकतील.

डिजीलॉकरमध्ये लॉग इन करून विद्यार्थ्यांना त्यांची महत्त्वपूर्ण कागदपत्रं मिळू शकतील.

डिजीलॉकरमध्ये लॉग इन करून विद्यार्थ्यांना त्यांची महत्त्वपूर्ण कागदपत्रं मिळू शकतील.

नवी दिल्ली. 18 जुलै: महाराष्ट्र स्टेट बोर्डाचा दहावीचा (SSC board results) निकाल नुकताच जाहीर झाला आहे. मात्र आता CBSE च्या विद्यार्थ्यांना निकालाची प्रतीक्षा आहे. नेहमी लवकर जाहीर होणारा CBSE चा निकाल (CBSE 10th 12th Result 2021) यंदा उशिरा जाहीर होत आहे.विशेष म्हणजे आता CBSE च्या विद्यार्थ्यांचा निकाल डिजीलॉकरमध्ये (Digi locker) उपलब्ध होईल. डिजीलॉकरमध्ये लॉग इन करून विद्यार्थ्यांना त्यांची महत्त्वपूर्ण कागदपत्रं म्हणजेच मार्कशीट (Marksheet), माइग्रेशन प्रमाणपत्र (Migration Certificate) इत्यादी मिळू शकतील.

CBSE दहावीचा निकाल जुलैच्या या आठवड्यात आणि 12वी चा निकाल जुलैच्या शेवटच्या आठवड्यात जाहीर केला जाऊ शकतो. सध्या सीबीएसई संलग्न शाळांमध्ये मूल्यांकन करण्याचं काम सुरू आहे.  लवकरात लवकर हे मूल्यांकनाच काम पूर्ण करण्याचे आदश बोर्डानं शाळांना दिले आहेत.

कोणत्या वेबसाईटवर दिसणार निकाल

CBSE दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना https://cbse.gov.in आणि  https://cbseresults.nic.in या दोन वेबसाईटवर निकाल कळू शकणार आहे.

हे वाचा - महाराष्ट्र मानसिक आरोग्य संस्था पुणे इथे विविध पदांसाठी नोकरी; लगेच करा अप्लाय

डिजिलॉकरवर असं बनवा अकाउंट

सर्वप्रथम डिजीलॉकर वेबसाइट https://www.digilocker.gov.in वर जा. गुगल प्ले स्टोअर वरून डिजीलॉकर अ‍ॅप मोबाइलमध्ये डाउनलोड करता येईल. आता यौर शेल्फ रजिस्टर वर क्लिक करा

आता आधार कार्डनुसार आपले नाव, जन्म तारीख आणि लिंग एंटर करा

आता आपला मोबाइल नंबर एंटर करा

सहा अंकी पिन सेट करा

आपला ईमेल आयडी देखील एंटर करा

आता तपशील सबमिट केल्यानंतर आपला यूजर नंबर सेट करा.

यानंतर आपला बोर्ड रोल नंबर एंटर करा

First published:

Tags: CBSE, Exam result, HSC, Ssc board