नवी दिल्ली, 29 जुलै: महाराष्ट्र स्टेट बोर्डाचा दहावीचा (SSC board results) निकाल जाहीर झाला आहे. मात्र आता CBSE च्या विद्यार्थ्यांना निकालाची प्रतीक्षा आहे. नेहमी लवकर जाहीर होणारा CBSE चा निकाल (CBSE 10th 12th Result 2021) यंदा उशिरा जाहीर होत आहे. मात्र आता लवकरच CBSE कडून निकाल जाहीर करण्यात येणार आहे. यासाठी विद्यार्थ्यांना रोल नंबर बघण्यासाठी (CBSE Roll Numbers website) वेबसाईट जारी केली आहे. या माध्यमातून विद्यार्थी आपला रोल नंबर (How to check CBSE Roll Number) बघू शकणार आहेत.
CBSE दहावीचे विद्यार्थी cbseresults.nic.in या वेबसाईटवर जाऊन आपला दहावीचा निकाल बघू शकणार आहेत. त्यासाठी त्यांना त्यांचा रोल नंबर एंटर करावा लागणार आहे. मात्र यंदा कोरोनामुळे प्रवेशपत्र (Admit Card) मिळण्याच्या आधीच परीक्षा रद्द करण्याची वेळ आली त्यामुळे विद्यार्थ्यांना त्यांचे रोल नंबर अजूनही देण्यात आले नव्हते म्हणूनच आता CBSE कडून रोल नंबर देण्यात आले आहेत.
रोल नंबर विंडो सक्रिय झाल्यानंतर असा अंदाज वर्तविला जात आहे की सीबीएसई लवकरच दहावी आणि बारावीचा निकालही जाहीर करेल. रोल नंबर तपासण्यासाठी विद्यार्थ्यांनी cbse.gov.in/cbsenew/cbse.html पोर्टलवर लॉग इन करणं आणि लॉगिन क्रेडेन्शियल्स भरणं आवश्यक असणार आहे.
हे वाचा -मेडिकल प्रवेशामध्ये OBC 27% तर EWSसाठी 10% आरक्षण; मोदी सरकारचा मोठा निर्णय
असा चेक करा रोल नंबर
cbse.gov.in/cbsenew/cbse.html या वेबसाईटवर जा.
खाली स्क्रोल करा आणि दिलेल्या लिंक रोल नंबर फाइंडरवर क्लिक करा
पुढील विंडोवर Continue बटणावर क्लिक करा
वर्ग निवडा. जर आपण दहावीचे विद्यार्थी असाल तर दहावीची निवड करा आणि जर तुम्ही बारावीचे विद्यार्थी असाल तर वर्ग बारावीवर क्लिक करा.
विद्यार्थ्याचं नाव, आई आणि वडिलांचं नाव आणि विद्यार्थ्यांची जन्म तारीख एंटर करा
यानंतर रोल नंबर सबमिट करा आणि एंटर करा.
रोल नंबरशिवाय बघता येणार निकाल
आता CBSE दहावीचा निकाल विद्यार्थ्यांना रोल नंबरशिवायही (CBSE Result without Roll Number) बघता येणार आहे. दहावीचा निकाल वेबसाईटवर जाहीर होणार आहेच मात्र त्यासोबत Digilocker वरही दिसणार आहे. म्हणूनच डिजिलॉकरमध्ये निकाल बघताना विद्यार्थी रोल नंबर नसेल तर आधार कार्डचा नंबर (Aadhar Card Number) किंवा रजिस्टर्ड मोबाइल नंबर (Registered Mobile Number) एंटर करूनही निकाल बघू शकणार आहेत. तसंच विद्यार्थ्यांकडे आधार कार्ड नाहीये अशा विद्यार्थ्यांना फेशिअल रेकॉग्नेशन सिस्टिमचा (Facial Recognition System) वापर करून निकाल बघता येणार आहे. अजूनही बऱ्याच पद्धतीनीं निकाल बघता येण्याची सोय बोर्ड करेल अशी माहिती मिळतेय.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: CBSE, Exam result