मराठी बातम्या /बातम्या /करिअर /

10वी आणि 12वीच्या निकालासंदर्भात CBSE बोर्डाचा मोठा निर्णय

10वी आणि 12वीच्या निकालासंदर्भात CBSE बोर्डाचा मोठा निर्णय

शाळांची तपासणी करण्याचे आदेश CBSE ने अधिकाऱ्यांना दिले आहेत. त्यावरून कुठल्या तारखेला जाहीर होणार दहावी-बारावीच्या बोर्डाच्या परीक्षांंचे निकाल?

शाळांची तपासणी करण्याचे आदेश CBSE ने अधिकाऱ्यांना दिले आहेत. त्यावरून कुठल्या तारखेला जाहीर होणार दहावी-बारावीच्या बोर्डाच्या परीक्षांंचे निकाल?

शाळांची तपासणी करण्याचे आदेश CBSE ने अधिकाऱ्यांना दिले आहेत. त्यावरून कुठल्या तारखेला जाहीर होणार दहावी-बारावीच्या बोर्डाच्या परीक्षांंचे निकाल?

नवी दिल्ली, 8 जुलै: केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ अर्थात सीबीएसईने (CBSE) यंदा घेतलेल्या इयत्ता 10 वी आणि 12 वीच्या बोर्डाच्या परीक्षांच्या निकालाची (Result) देशभरातले लाखो विद्यार्थी वाट पाहत आहेत. या पार्श्वभूमीवर केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. 10 वी आणि 12 वीचा निकाल तयार करण्यासाठी CBSE बोर्डाकडून शाळांना मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या आहेत. या मार्गदर्शक सूचनांचं पालन शाळांकडून होत आहे का, याची खात्री बोर्डाला करायची आहे. यासाठी CBSEने त्यांच्या प्रादेशिक अधिकाऱ्यांना CBSEशी संलग्न शाळांना अचानक भेट देण्याचे आदेश दिले आहेत.

CBSEने जारी केलेल्या अधिकृत नोटिफिकेशनमध्ये सांगण्यात आलं आहे, की शाळांकडून निकालासंदर्भात सुरू असलेल्या कामकाजाची वास्तव माहिती अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष भेटीतून मिळवावी. त्यामुळे या भेटीची कोणतीही पूर्वसूचना शाळांना दिली जाऊ नये. म्हणजेच बोर्डाचे अधिकारी शाळांना भेट देण्यास येणार आहेत, हे शाळांना माहीत असू नये. बोर्डाच्या अधिकाऱ्यांनी अचानक जाऊन तपासणी करावी, म्हणजे तिथे नेमकं काय चाललं आहे, याची खरी माहिती मिळू शकेल.

CBSEच्या नोटिफिकेशनमध्ये असंही म्हटलं आहे, की या तपासणीच्या कामात सहभागी असलेल्या CBSEच्या सर्व अधिकाऱ्यांनी जबाबदारी योग्यरीत्या पार पाडण्यासाठी बोर्डाच्या टॅब्युलेशन धोरणाबद्दल स्वतः सविस्तर जाणून घ्यावं.

खासगी, केंद्रीय विद्यालयं आणि नवोदय विद्यालयं अशा सर्व प्रकारच्या शाळांची तपासणी करण्याचे आदेश CBSEने अधिकाऱ्यांना दिले आहेत. तपासणी पूर्ण झाल्यानंतर अधिकाऱ्यांना आपला अहवाल 12 जुलै 2021 पूर्वी सादर करावा लागणार आहे. CBSE कडून इयत्ता 10वीचा निकाल 15 जुलै रोजी, तर 12वीचा निकाल 31 जुलैला जाहीर होण्याची शक्यता आहे.

10वी, 12वी विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी! CBSE बोर्डाच्या वर्षांत 2 परीक्षा

दहावी आणि बारावीचे निकाल तयार करण्यासाठी शाळा काम करत आहेत; मात्र त्यांनी CBSEने आखलेल्या धोरणांची प्रभावीपणे अंमलबजावणी करणं आवश्यक आहे. त्या दृष्टीने पहिलं पाऊल म्हणून प्रादेशिक कार्यालयांच्या अधिकाऱ्यांनी शाळांना भेटी द्याव्यात, असा निर्णय घेण्यात आला असल्याचं बोर्डाने नोटिफिकेशनमध्ये सांगितलं आहे.

परीक्षेत कमी मार्क्स आलेत तर आता नो टेन्शन; या क्षेत्रांमध्ये करा करिअर

CBSE ने सोमवारी (5 जुलै) दहावी व बारावी बोर्ड परीक्षांच्या नवीन पॅटर्नची घोषणाही केली आहे. यानुसार, 2021-22 या शैक्षणिक वर्षासाठी CBSE बोर्डाच्या परीक्षा वर्षातून दोन वेळा घेण्यात येणार आहेत. कोरोनाच्या साथीमुळे (Corona Pandemic) निर्माण झालेल्या परिस्थितीचा विचार करून प्रत्येक सत्रासाठीचा अभ्यासक्रम कमी करण्यात आला आहे. हा कमी केलेला अभ्यासक्रम जुलै 2021मध्ये प्रसिद्ध करण्यात येईल, असंही बोर्डाकडून सांगण्यात आलं आहे.

First published:

Tags: 10th class, Board Exam, CBSE, Exam result