मुंबई, 04 डिसेंबर: देशातील प्रतिष्ठित मॅनेजमेंट महाविद्यालयांमध्ये प्रवेशासाठी सामाईक प्रवेश परीक्षा म्हणजेच CAT 2022 परीक्षा पूर्ण झाली आहे. CAT 2022 परीक्षा 27 नोव्हेंबर रोजी घेण्यात आली. कॅट परीक्षेत बसलेले उमेदवार आन्सर की आणि निकालाच्या प्रतीक्षेत आहेत. असे मानले जाते की CAT मध्ये तुमचा स्कोअर 99 टक्के असेल तर IIM मध्ये प्रवेश मिळण्याची शक्यता जास्त आहे. मात्र अनेक विद्यार्थी गोंधळून जातात की स्कोर म्हणजे नक्की काय? पर्सेंटेज की पर्सेंटाईल? तर या दोन वेगळ्या गोष्टी आहेत. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला यांमधील फरक आणि पर्सेंटाइल मोजण्याचा फॉर्मुला सांगणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया.
क्या बात है! लाखो रुपये पॅकेज त्यात वर्क फ्रॉम होम जॉब्स; Wipro मध्ये बंपर ओपनिंग्स
परसेंटेज म्हणजे नक्की काय?
टक्केवारीचा सरळ अर्थ असा आहे की तुम्हाला एकूण गुणांपैकी किती मिळाले. जसे एकूण स्कोअर 100 असेल आणि त्यापैकी तुम्हाला 80 गुण मिळाले तर ते 80% असेल. टक्केवारी काढण्यासाठी सूत्र आहे – प्राप्त संख्या / पूर्णांक × 100.
पर्सेंटाइल म्हणजे काय?
पर्सेंटाइल म्हणजे तुम्हाला किती विद्यार्थ्यांना जास्त गुण मिळाले आहेत. उदाहरणार्थ, जर तुमची टक्केवारी 60 टक्के असेल, तर याचा अर्थ तुम्ही 60 टक्क्यांपेक्षा जास्त उमेदवार मिळवले आहेत.
नरकाहूनही वाईट होईल तुमचं करिअर; 'या' सवयी तुम्हाला तर नाहीत ना? आताच बदला; अन्यथा...
100× गटात सर्वाधिक गुण मिळविणाऱ्या उमेदवारांपेक्षा कमी गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांची एकूण संख्या / गटातील एकूण उमेदवारांची संख्या.
उदाहरणार्थ, एका विद्यार्थ्याला गटात जास्तीत जास्त 100 गुण मिळाले आहेत. 100 पेक्षा कमी गुण मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या 15000 आहे. गटातील एकूण विद्यार्थी संख्या 18000 असताना, टक्केवारी खालीलप्रमाणे काढली जाईल-
100×15000/18000=83.33%.
सर्वात मोठी बातमी! राज्याच्या पोलीस भरतीचा अर्ज करण्यासाठी मुदतवाढ; 'या' तारखेपर्यंत करता येईल अर्ज
सहसा MBA एंट्रन्स म्हणे CAT परीक्षेच्या निकालानंतर विद्यार्थ्यांच्या पर्सेन्टाइल प्रमाणे त्यांना कॉलेजया प्रवेश मिळतो. त्यामुळे विद्यार्थ्यांना त्यांचे पर्सेन्टाइल कॅल्क्युलेट करणं आवश्यक असतं
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Career, Career opportunities, Education, Exam result