IIM CAT चा निकाल जाहीर; 100 स्कोअर असणाऱ्या 10 टॉपर्सपैकी 4 महाराष्ट्रातले

IIM CAT चा निकाल जाहीर; 100 स्कोअर असणाऱ्या 10 टॉपर्सपैकी 4 महाराष्ट्रातले

देशातल्या अव्वल बिझनेस स्कूलमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी IIM ची प्रवेश परीक्षा अर्थात CAT महत्त्वाची ठरते. 100 पर्सेंटाइल स्कोअर मिळवणाऱ्या टॉप 10 विद्यार्थ्यांपैकी 4 महाराष्ट्रातले आहेत आणि सगळे इंजीनिअरिंगचे विद्यार्थी आहेत.

  • Share this:

मुंबई, 4 जानेवारी : इंडियन इन्स्‍टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट (IIM),कोझिकोडने शनिवारी कॉमन अॅडमिशन टेस्‍ट(CAT) 2019 चे रिझल्‍ट जाहीर केले आहेत. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट(IIM),कोझिकोड ने CAT च्या वेबसाइटवर (iimcat.ac.in) हे निकाल जाहीर केले आहेत. पैकीच्या पैकी गुण मिळवणारे देशभरातून यंदा 10 विद्यार्थी आहेत. त्यांना 100 पर्सेंटाइल मिळाले आहेत. हे सर्व टॉपर इंजिनीअरिंग आणि टेक्नॉलॉजी क्षेत्रातले पदवीधर आहेत. दहातले सर्वाधिक 4 टॉपर महाराष्ट्रातले आहेत.

देशातल्या अव्वल बिझनेस स्कूलमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी IIM ची प्रवेश परीक्षा अर्थात CAT महत्त्वाची ठरते. यावर्षी CAT देणाऱ्यांमध्ये 75004 मुली तर 134917 मुलं होती. टॉपर्स अर्थात 100 पर्सेंटाइल मिळवणारी सगळी इंजिनीअरिंगची मुलं आहेत. टॉप टेनमध्ये एकही मुलगी नाही.

साधारण 90 पर्सेंटाइल किंवा त्याहून अधिक स्कोअर असणाऱ्या विद्यार्थ्यांना देशातल्या टॉप मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट्समध्ये प्रवेश मिळवण्याची आशा असते. CAT 2019 चा स्कोअर IIM व्यतिरिक्त इतर मॅनेजमेंट स्कूल किंवा कॉलेजमध्ये प्रवेश घेण्यासाठीसुद्धा ग्राह्य धरला जातो.

100 पर्सेंटाइल स्कोअर मिळवणाऱ्या टॉप 10 विद्यार्थ्यांपैकी 6 IIT चे विद्यार्थी आहेत, 2 NIT चे तर 1 विद्यार्थी जाधवपूर युनिव्हर्सिटीचा आहे. या विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी दिलेल्या कायमचा पत्ता बघता यातले सर्वाधिक टॉपर महाराष्ट्रातले आहेत. 10 टॉपर्सपैकी 4 महाराष्ट्राचे आणि उरलेले झारखंड, कर्नाटक, तामिळनाडू आणि तेलंगणा या राज्यांतले आहेत. 99.99 स्कोअर असणारी 21 मुलं आहेत. त्यातलेही 19 इंजिनिअरिंगचेच विद्यार्थी आहेत.

अन्य बातम्या

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: catIIM
First Published: Jan 4, 2020 03:31 PM IST

ताज्या बातम्या