मराठी बातम्या /बातम्या /करिअर /बाबो! आयआयटी प्लेसमेंटमध्ये पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना मिळाली कोट्यवधींची ऑफर, वाचा डिटेल्स

बाबो! आयआयटी प्लेसमेंटमध्ये पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना मिळाली कोट्यवधींची ऑफर, वाचा डिटेल्स

चांगल्या पगाराच्या नोकऱ्या मिळत नसल्याची तरुणांमध्ये ओरड आहे. गुणवत्तेपेक्षा फारच कमी पगारामध्ये काम करावं लागतं, असं अनेक उच्चशिक्षित तरुणांचं म्हणणं आहे; मात्र नोकरी आणि पगाराच्या गणितापासून आयआयटीचे   (IIT)   विद्यार्थी कायमच दूर असतात. कारण त्यांना अपेक्षेप्रमाणे नोकरी   (Job)   मिळतेच ही गोष्ट जगजाहीर आहे.

चांगल्या पगाराच्या नोकऱ्या मिळत नसल्याची तरुणांमध्ये ओरड आहे. गुणवत्तेपेक्षा फारच कमी पगारामध्ये काम करावं लागतं, असं अनेक उच्चशिक्षित तरुणांचं म्हणणं आहे; मात्र नोकरी आणि पगाराच्या गणितापासून आयआयटीचे (IIT) विद्यार्थी कायमच दूर असतात. कारण त्यांना अपेक्षेप्रमाणे नोकरी (Job) मिळतेच ही गोष्ट जगजाहीर आहे.

चांगल्या पगाराच्या नोकऱ्या मिळत नसल्याची तरुणांमध्ये ओरड आहे. गुणवत्तेपेक्षा फारच कमी पगारामध्ये काम करावं लागतं, असं अनेक उच्चशिक्षित तरुणांचं म्हणणं आहे; मात्र नोकरी आणि पगाराच्या गणितापासून आयआयटीचे (IIT) विद्यार्थी कायमच दूर असतात. कारण त्यांना अपेक्षेप्रमाणे नोकरी (Job) मिळतेच ही गोष्ट जगजाहीर आहे.

पुढे वाचा ...

    मुंबई,2 डिसेंबर-   चांगल्या पगाराच्या नोकऱ्या मिळत नसल्याची तरुणांमध्ये ओरड आहे. गुणवत्तेपेक्षा फारच कमी पगारामध्ये काम करावं लागतं, असं अनेक उच्चशिक्षित तरुणांचं म्हणणं आहे; मात्र नोकरी आणि पगाराच्या गणितापासून आयआयटीचे   (IIT)   विद्यार्थी कायमच दूर असतात. कारण त्यांना अपेक्षेप्रमाणे नोकरी   (Job)   मिळतेच ही गोष्ट जगजाहीर आहे. 1 डिसेंबर 2021 पासून देशभरातल्या आयआयटी कॅम्पसमधल्या प्लेसमेंटचा   (IIT campus placements)   हंगाम मोठ्या उत्साहात सुरू झाला. बहुतांश आयआयटी कॅम्पसमध्ये 1 डिसेंबरपासून सुरू होणारा प्लेसमेंटचा पहिला टप्पा 7 ते 14 दिवस चालतो. पहिल्या दिवसाचा आढावा घेतला असता बहुतेक आयआयटी संस्थांमध्ये मागच्या शैक्षणिक वर्षाच्या तुलनेत या वर्षी ऑफर्सची  (Job Offers)  संख्या जास्त आहे. पहिल्याच दिवशी काही विद्यार्थ्यांना कोट्यवधी रुपयांची वार्षिक पॅकेजेस  (per annum)   मिळाली आहेत. आयआयटी रूरकीच्या एका विद्यार्थ्याला वार्षिक 2.15 कोटी रुपये, तर आयआयटी मुंबईच्या एका विद्यार्थ्याला 2.05 कोटी रुपयांचं पॅकेज मिळालं आहे. 'हिंदुस्तान टाइम्स'नं याबाबत वृत्त प्रसिद्ध केलं आहे.

    आयआयटी-मुंबईचे माजी विद्यार्थी असलेले पराग अग्रवाल यांची दोन दिवसांपूर्वीच ट्विटरच्या सीईओपदी निवड झाली. त्यामुळे सध्या आयआयटीच्या विद्यार्थ्यांची सर्वत्र जोरदार चर्चा सुरू आहे. या पार्श्वभूमीवर देशातल्या सर्व आयआयटी कॅम्पसमध्ये प्लेसमेंट्स सुरू झाल्या आहेत. 'प्लेसमेंटच्या पहिल्या दिवशी पहिल्या सत्रात 28 कंपन्यांनी सहभाग घेतला. उर्वरित सत्रांसाठीदेखील अनेक कंपन्यांनी चांगला प्रतिसाद दिला. नियमितपणे आयआयटीमधून भरती करणाऱ्या कंपन्यांनी या वर्षीदेखील संस्थेच्या गुणवत्तेवर विश्वास दाखवला आहे, अशी माहिती आयआयटी-मुंबईच्या प्रवक्त्यांनी दिली.

    आयआयटीमधल्या टॅलेंटवर मल्टीनॅशनल कंपन्यांच्या असलेल्या दृढ विश्वासाची प्रचीती पहिल्याच दिवशी या कंपन्यांनी काही विद्यार्थ्यांना दिलेल्या कोट्यवधी रुपयांच्या वार्षिक पॅकेजेसमधून आली. रुरकी इथल्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अर्थात आयआयटी-रुरकीच्या (IIT Roorkee) एका विद्यार्थ्याला एका आंतरराष्ट्रीय टेक फर्मनं वार्षिक 2.15 कोटी रुपयांची नोकरी देऊ केली आहे. आयआयटी-मुंबईच्या एका विद्यार्थ्याला उबरनं (Uber) 2.74 लाख अमेरिकन डॉलर्सचं (सुमारे 2.05 कोटी रुपये) वार्षिक पॅकेज दिलं आहे. आयआयटी गुवाहाटीच्या एका विद्यार्थ्यालादेखील 2 कोटी रुपयांची ऑफर मिळाली आहे. गेल्या वर्षी, आयआयटी-मुंबईच्या विद्यार्थ्याला कोहेसिटी या यूएसमधल्या आयटी फर्मने 1.54 कोटी रुपयांचं पॅकेज दिलं होतं. हे कॅम्पस प्लेसमेंटमधलं मागील वर्षीचं सर्वोच्च पॅकेज होतं.

    आयआयटी रुरकीच्या विद्यार्थ्यांनी आपला जलवा कायम ठेवला आहे. या वर्षी 11 विद्यार्थ्यांना 1 कोटी रुपयांपेक्षा अधिक पॅकेजच्या ऑफर्स मिळाल्या आहेत. यातल्या तीन विद्यार्थ्यांना 1.3 कोटी ते 1.8 कोटींच्या दरम्यान पॅकेज मिळालं आहे. 'सध्याचं जॉब मार्केट लक्षात घेऊन, आम्ही त्यानुसार नियोजन केलं होतं. आर्टिफिशियल इंटेलिजन्स, सॉफ्टवेअर, नेटवर्क आणि वित्तपुरवठा यांसह सर्व क्षेत्रांतल्या सर्वोत्तम कंपन्यांशी आम्ही करार केला आहे. आमच्या प्लेसमेंट प्रोफाइलमध्‍ये विविधता येईल, याची आम्ही पुरेपूर काळजी घेतली आहे. यामुळे विद्यार्थ्‍यांना त्‍यांच्‍या आवडीनुसार विविध कंपन्यांमध्‍ये जॉब ऑफर्स मिळत आहेत,' अशी माहिती आयआयटी-रुरकीतील प्लेसमेंट आणि इंटर्नशिप सेलचे प्रभारी प्राध्यापक विनय शर्मा यांनी दिली. आयआयटी मद्रासमध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी आलेल्या जॉब ऑफर्समध्ये 46 टक्क्यांनी वाढ झाली आहे. प्लेसमेंटच्या पहिल्या दिवसाच्या पहिल्या सेशनमध्ये एकूण 176 जॉब ऑफर्स देण्यात आल्या. त्याचप्रमाणे, आयआयटी गुवाहाटी येथे गेल्या वर्षीच्या तुलनेत (158 ऑफर्स) पहिल्या दिवशी जवळपास 200 जॉब ऑफर्स मिळाल्या.

    (हे वाचा:10वी उत्तीर्णांनो, Government Jobची 'ही' संधी सोडू नका; DRDO मध्ये बंपर Vacancy

    या वर्षीच्या टॉप रिक्रूटर्समध्ये मायक्रोसॉफ्ट (Microsoft), क्वालकॉम (Qualcomm), गुगल (Google), बोस्टन कन्सल्टिंग ग्रुप (Boston Consulting Group), एअरबस (Airbus), अॅमेझॉन (Amazon), अॅपल (Apple), एपीटी पोर्टफोलिओ प्रायव्हेट लिमिटेड (APT Portfolio Pvt.), बजाज ऑटो लिमिटेड या कंपन्यांचा समावेश आहे. या कंपन्यांनी डोमेस्टिक रोल्ससाठी नोकऱ्या देऊ केल्या आहेत. उबर (Uber) आणि रुब्रिक (Rubrik) या कंपन्यांनी आंतरराष्ट्रीय जबाबदाऱ्यांसाठी भरती सुरू केली आहे. प्रॉडक्शन इंजिनीअर, रिसर्च अँड डेव्हलपमेंट, सॉफ्टवेअर, हार्डवेअर, बिझनेस अॅनालिस्ट , फायनान्स अॅनालिस्ट, मार्केटिंग अॅनालिस्ट, जीईटी, कन्सल्टिंग, प्रॉडक्ट मॅनेजमेंट, डेटा सायन्स अशा किती तरी पदांसाठी विद्यार्थ्यांना निवडलं जात आहे.या वर्षी डोमेस्टिक रोल्साठी असलेल्या नोकऱ्यांमध्ये वाढ करण्यात आली आहे. आयआयटी गुवाहाटी येथे काही विद्यार्थ्यांना 1.1 कोटीपेक्षा जास्त पगाराच्या डोमेस्टिक ऑफर मिळाल्या आहेत. आयआयटी रुरकी येथे डोमेस्टिक रोलसाठी गेल्या वर्षी मिळालेल्या 80 लाखांच्या तुलनेत या वर्षी 1.8 कोटी रुपयांची ऑफर मिळाली आहे.

    First published:

    Tags: Career, IIT, Job alert