Home /News /career /

Career Tips: भारतीय वायुसेनेत Class1 Officer म्हणून जॉब हवाय? मग 'या' परीक्षेची करा तयारी; वाचा सविस्तर

Career Tips: भारतीय वायुसेनेत Class1 Officer म्हणून जॉब हवाय? मग 'या' परीक्षेची करा तयारी; वाचा सविस्तर

AFCAT असं या परीक्षेचं (What is AFCAT Exam?) नाव आहे.

AFCAT असं या परीक्षेचं (What is AFCAT Exam?) नाव आहे.

आज आम्ही तुम्हाला अशी परीक्षा सांगणार आहोत ज्यामुळे तुम्ही सरकारी नोकरीचं स्वप्न पूर्ण करू शकता. चला तर जाणून घेऊया.

    मुंबई, 05 जानेवारी: आयुष्यात सरकारी नोकरी (Government Jobs in Maharashtra) मिळावी यासाठी हजारो तरुण-तरुणी अभ्यास करत असतात. त्यात जर सेंट्रल गर्व्हन्मेन्टमध्ये जॉब (Central Government Jobs) मिळाला तर पर्वणीच. काही तरुणांना भारतीय सेनेतही (Indian Army jobs) दाखल होण्याची इच्छा असते. यासाठी NDA सारख्या मोठ्या परीक्षांची तयारी अनेक जण करत असतात. सरकारी नोकरी मिळवण्यासाठी परीक्षा (How to crack Government Exams) देणं महत्त्वाचं असतं आणि यासाठी अभ्यास करावा लागतो. कोणत्याही सरकारी ऑफिसमध्ये क्लास वन ऑफिसर (How to get job as class one officer) म्हणून नोकरी करण्यासाठी प्रचंड अभ्यास आणि मेहनत करावी लागते. जर तुम्हालाही भारतीय वायुसेनेत Class1 Officer (Class 1 Officer hobs in IAF) म्हणून नोकरी हवी असेल तर आज आम्ही तुम्हाला अशी परीक्षा सांगणार आहोत ज्यामुळे तुम्ही सरकारी नोकरीचं स्वप्न पूर्ण करू शकता. चला तर जाणून घेऊया. AFCAT असं या परीक्षेचं (What is AFCAT Exam?) नाव आहे. ही परीक्षा देऊन तुम्ही भारतीय वायुसेनेत (Indian Air Force Jobs) Class1 Officer होऊ शकता. या परीक्षेसाठीची पात्रता काय? ही परीक्षा नेमकी (How to give AFCAT Exams) कशी असते? कोणते उमेदवार (Eligibility for AFCAT Exam) ही परीक्षा देऊ शकतात? या तुमच्या मनात असलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरं आज आम्ही तुम्हाला देणार आहोत. Government Jobs: रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया मुबंईत 'या' पदांसाठी करतेय भरती AFCAT म्हणजे नक्की काय? भारतीय वायुसेनेद्वारे घेण्यात येणारी ही परीक्षा हवाई दलातील वर्ग-I अधिकारी (फ्लाइंग आणि ग्राउंड ड्यूटी) उमेदवारांच्या निवडीसाठी घेतली जाते. ही परीक्षा साधारणपणे दरवर्षी फेब्रुवारी आणि ऑगस्टमध्ये घेतली जाते, या परीक्षेत उमेदवारांना उड्डाण शाखा, तांत्रिक शाखा आणि ग्राउंड ड्युटी शाखेसाठी नियुक्त केले जाते. या परीक्षेत, तांत्रिक आणि गैर-तांत्रिक अशा दोन्ही पदांसाठी उमेदवारांची निवड केली जाते, ज्यामध्ये शॉर्ट कमिशन आणि कायम कमिशनचा समावेश आहे जो पुरुष आणि महिला दोघांसाठी असतो. कोणत्या ब्रांचसाठी काय पात्रता आवश्यक फ्लाइंग ब्रांच - अभ्यासक्रम सुरू करताना उमेदवाराचं वय हे 18 ते 23 वर्षांच्या दरम्यान असावे. उमेदवार कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातील कोणत्याही विषयातील पदवीधर (किमान तीन वर्षांचा पदवी अभ्यासक्रम) सर्व पेपर्समध्ये एकूण किमान 60% गुणांसह आणि 10+2 स्तरावर गणित आणि भौतिकशास्त्र उत्तीर्ण किंवा BE/B.Tech केलं असणं आवश्यक आहे. टेक्निकल ब्रांच - अभ्यासक्रम सुरू करताना उमेदवाराचं वय हे 18 ते 26 वर्षांच्या दरम्यान असावे. उमेदवार कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातील कोणत्याही विषयातील पदवीधर (किमान तीन वर्षांचा पदवी अभ्यासक्रम) सर्व पेपर्समध्ये एकूण किमान 60% गुणांसह आणि 10+2 स्तरावर गणित आणि भौतिकशास्त्र उत्तीर्ण किंवा BE/B.Tech केलं असणं आवश्यक आहे. JOB ALERT: मुंबईच्या 'या' शिप बिल्डिंग कंपनीत तब्बल 86 जागांसाठी Vacancy कसा असतो AFCAT परीक्षेचा पॅटर्न (Exam pattern for AFCAT Exam) या परीक्षेत एकूण 100 प्रश्न असतात. जे सोडवण्यासाठी उमेदवारांना 2 तासांचा अवधी देण्यात येतो. हा पेपर 300 गुणांचा आहे, म्हणजे जर तुम्ही 1 प्रश्नाचे उत्तर बरोबर दिले तर तुम्हाला 3 गुण मिळतील. या परीक्षेत 1/3 निगेटिव्ह मार्किंग देखील असते, त्यामुळे ज्या प्रश्नांची उत्तरे तुम्हाला माहीत आहेत अशाच प्रश्नांची उत्तरे देण्याची विशेष काळजी घ्या आणि एलिमिनेशन पद्धत वापरा ज्याद्वारे तुम्ही योग्य उत्तर शोधू शकाल.
    Published by:Atharva Mahankal
    First published:

    Tags: Career opportunities, Exam, Jobs, Tips

    पुढील बातम्या