मराठी बातम्या /बातम्या /करिअर /

Career Tips: Professors होऊन घ्या महिन्याला लाखोंमध्ये पगार; शिक्षण आणि संधींबाबत इथे मिळेल माहिती

Career Tips: Professors होऊन घ्या महिन्याला लाखोंमध्ये पगार; शिक्षण आणि संधींबाबत इथे मिळेल माहिती

प्रातिनिधिक फोटो

प्रातिनिधिक फोटो

आज आम्ही तुम्हाला प्रोफेसर होण्यासाठी लागणारी पात्रता आणि प्रोफेसर्सना मिळणाऱ्या पगाराबद्दल तुम्हाला सांगणार आहोत. चला तर मग जाणून घेउया.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Atharva Mahankal

मुंबई, 15 सप्टेंबर: शालेय किंवा कॉलेजमध्ये शिक्षण घेताना आपल्या सर्वांनाच प्रोफेसर बनायची खूप इच्छा असते. कधीतरी आपणही प्रोफेसर होऊन विद्यार्थ्यांना शिकवावं असं स्वप्न अनेकांचं असतं. त्यात प्रोफेसर्सना मिळणाऱ्या सोयी सुविधाही अनेक असतात. सुट्याहे मिळतात. जर तुम्हालाही प्रोफेसर होण्याची इच्छा असेल तर ही बातमी फक्त तुमच्यासाठी आहे. आज आम्ही तुम्हाला प्रोफेसर होण्यासाठी लागणारी पात्रता आणि प्रोफेसर्सना मिळणाऱ्या पगाराबद्दल तुम्हाला सांगणार आहोत. चला तर मग जाणून घेउया.

ही पात्रता असणं आवश्यक

महाविद्यालयीन प्रोफेसर किंवा लेक्चरर होण्यासाठी तुम्हाला काही स्किल्स विकसित करणे आवश्यक आहे. जसे की शिकवण्याच्या कामाची आवड, संबंधित विषयातील आवड आणि ज्ञान, नवीन गोष्टी शिकण्याची इच्छा, योग्य संवाद, योग्य संशोधन, समस्या सोडवण्याची क्षमता, वेळेचे व्यवस्थापन आणि सकारात्मक आत्मविश्वास. या गोष्टी असतील तरच तुम्ही एक चांगले प्रोफेसर होऊ शकता. तसंच प्रोफेसर होण्यासाठी तुम्हाला संबंधित विषयांमध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण असणं आवश्यक आहे.

गोल्डन चान्स! कोणतीही परीक्षा नाही थेट 1,50,000 रुपये महिना पगार; 'या' महापालिकेत मोठी भरती

प्रोफेसर्सच्या जबाबदाऱ्या

प्रोफेसरची जबाबदारी वर्गात शिकवणे आणि व्याख्याने एवढी मर्यादित नाही. ते पर्यवेक्षण, मार्गदर्शन, संशोधन, देखरेख, रेकॉर्ड ठेवणे, विद्यार्थ्यांना समजून घेणे

इत्यादी असतात.

करिअरच्या संधी

प्रोफेसर हे सहाय्यक प्राध्यापक ते कुलपती पदापर्यंत जाऊ शकतात, जसे की – सहायक प्राध्यापक > वरिष्ठ प्राध्यापक > प्राध्यापकाची प्रतिष्ठित व्यक्ती > डीन / संचालक > प्र-कुलगुरू > कुलगुरू. तुम्हाला विविध सरकारी महाविद्यालये, खाजगी महाविद्यालये, विद्यापीठे आणि संशोधन संस्थांमध्ये संधी मिळू शकतात.

किती असतो पगार

आपल्या देशात प्राध्यापक किंवा व्याख्याते चांगले वेतन पॅकेज घेतात. प्राध्यापकांचा पगार अनेक बाबींवर अवलंबून असतो जसे की: स्थान, संस्थेचा प्रकार, अनुभव परंतु साधारणपणे, असिस्टंट प्रोफेसरचा सरासरी मासिक पगार 40000 - 90000 च्या दरम्यान असतो. साधारणपणे, सहाय्यक प्राध्यापक काही वर्षांचा अनुभव आणि विभागीय परीक्षा देऊन प्राध्यापक बनतात, ज्यांचे वेतन सुमारे 80,000 ते 1,50,000 रुपये महिना त्याहूनही अधिक असू शकते.

First published:

Tags: Career, Career opportunities