मराठी बातम्या /बातम्या /करिअर /

Career Tips: खाण्याची आणि खाऊ घालण्याची आवड असेल तर असे व्हा शेफ; लाखोंमध्ये असतो पगार

Career Tips: खाण्याची आणि खाऊ घालण्याची आवड असेल तर असे व्हा शेफ; लाखोंमध्ये असतो पगार

Chef म्हणून करिअर घडवू शकता. शेफ होण्यासाठी तुम्हाला कामी येणारे कोर्सेस आणि टॉप कॉलेजेस याबद्दल आज आम्ही माहिती देणार आहोत.

Chef म्हणून करिअर घडवू शकता. शेफ होण्यासाठी तुम्हाला कामी येणारे कोर्सेस आणि टॉप कॉलेजेस याबद्दल आज आम्ही माहिती देणार आहोत.

Chef म्हणून करिअर घडवू शकता. शेफ होण्यासाठी तुम्हाला कामी येणारे कोर्सेस आणि टॉप कॉलेजेस याबद्दल आज आम्ही माहिती देणार आहोत.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Atharva Mahankal

मुंबई, 21 नोव्हेंबर: भारतात अन्नपदार्थ आणि ते बनवण्याच्या विविध पद्धती आहेत. घरी आलेल्या पाहुण्यांना कधीही उपाशी न पाठवण्याची पद्धत आपल्या देशात आहेत. त्यात एकापेक्षा एक मोठे खवैय्येही आपल्या देशात आहेत. अगदी वरण-भात ते मटणाच्या भाजीपर्यंत सर्व पदार्थांचे चाहते इथे आहेत. मात्र भारतातील लोकांना जितकी खाण्याची आवड आहे तितकीच आवड जेवण बनवण्याचीही आहे. तुम्हीही यातीलच एक असाल आणि तुम्हालाही जेवण बनवण्याची प्रचंड आवड असेल तर तुम्ही तुमची आवड करिअर बनवू शकता. Chef म्हणून करिअर घडवू शकता. शेफ होण्यासाठी तुम्हाला कामी येणारे कोर्सेस आणि टॉप कॉलेजेस याबद्दल आज आम्ही माहिती देणार आहोत.

डिप्लोमा कोर्सेस

डिप्लोमा – कलिनरी आर्ट्स/ फ़ूड प्रोडक्शन/ कैटरिंग टेक्नोलॉजी/ फ़ूड एंड बेवरीज सायन्स/ बेकरी अँड कन्फेक्शनरी

Maharashtra Police Bharti: 90 मिनिटांत ठरणार तरुणांचं भविष्य; 18,000 पदांसाठी असं असेल परीक्षेचं पॅटर्न

सर्टिफिकेशन कोर्सेस

सर्टिफिकेट – फ़ूड प्रोडक्शन/ कैटरिंग टेक्नॉलॉजी/ फ़ूड बेवरेजेज.

क्राफ्ट्समैनशिप कोर्स – फ़ूड अँड बेवरीज सर्विस/ फ़ूड प्रोडक्शन/ फ़ूड प्रोडक्शन अँड पेस्ट्री

डिग्री कोर्सेस

BA कलिनरी आर्ट्स/ होटल मॅनेजमेंट/ कैटरिंग टेक्नॉलॉजी अँड कलिनरी आर्ट्स.

BSc कैटरिंग अँड कलिनरी आर्ट्स, होटल मॅनेजमेंट अँड कैटरिंग टेक्नोलॉजी.

बॅचलर ऑफ़ होटल मॅनेजमेंट (BHM).

महिन्याचा तब्बल 75,000 रुपये पगार आणि पात्रता ग्रॅज्युएशन; 'या' महापालिकेत बंपर भरती

इतका असतो पगार

आपल्या देशात, सुरुवातीला इंटर्न शेफला सुमारे 10 हजार रुपये मासिक मिळतात आणि नवीन व्यावसायिक शेफला सरासरी 18 - 20 हजार रुपये मासिक मिळतात. या क्षेत्रातील काही वर्षांच्या कामाच्या अनुभवानंतर या व्यावसायिकांना सरासरी 50-60 हजारांचे मासिक वेतन पॅकेज मिळते. एखाद्या सुप्रसिद्ध हॉटेल किंवा मेजवानीत तज्ञ आणि अनुभवी शेफला महिन्याला सरासरी 1 लाख रुपयांपर्यंत पगाराचं पॅकेज मिळतं.

First published: