मराठी बातम्या /बातम्या /करिअर /JEE Mains: दुसऱ्या सत्राची तयारी करताय? मग हा घ्या परीक्षा क्रॅक करण्याचा भन्नाट फॉर्म्युला

JEE Mains: दुसऱ्या सत्राची तयारी करताय? मग हा घ्या परीक्षा क्रॅक करण्याचा भन्नाट फॉर्म्युला

परीक्षा क्रॅक करण्याचा भन्नाट फॉर्म्युला

परीक्षा क्रॅक करण्याचा भन्नाट फॉर्म्युला

जेईई मेन 2023 परीक्षेच्या दुसऱ्या सत्रासाठी आता काही आठवडे शिल्लक राहिले आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांनी चांगली तयारी करणं आणि उपलब्ध वेळेचा पुरेपूर उपयोग करणं आवश्यक आहे

  • Local18
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 16 मार्च:  इयत्ता बारावी हा प्रत्येक विद्यार्थ्याच्या शैक्षणिक जीवनातील महत्त्वाचा आणि निर्णायक टप्पा असतो. बारावी पूर्ण झाल्यानंतर आपण शिक्षणासाठी कुठला पर्याय निवडतो त्यावर आपलं उच्च शिक्षण अवलंबून असतं. ज्या विद्यार्थ्यांना तंत्रज्ञानाची आवड आहे, अशा विद्यार्थ्यांचा इंजिनीअरिंगकडे कल असतो. इंजिनीअरिंग संस्थेमध्ये प्रवेश घेण्यासाठी संयुक्त प्रवेश परीक्षा (जेईई) द्यावी लागते. जेईई मेन ही भारतातील सर्वात स्पर्धात्मक इंजिनीअरिंग प्रवेश परीक्षांपैकी एक आहे. ती वर्षातून दोनदा घेतली जाते. या वर्षी, जेईई मेनचं पहिलं सत्र 24, 25, 28, 29, 30, 31 जानेवारी आणि 1 फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात आलं होतं. आठ लाखांहून अधिक विद्यार्थी परीक्षेला बसले होते. परीक्षेच्या पहिल्या सत्राला मोठ्या प्रमाणात सकारात्मक प्रतिसाद मिळाला. विद्यार्थी आता 6 ते 12 एप्रिल 2023 या कालावधीत होणाऱ्या परीक्षेच्या दुसऱ्या सत्रासाठी तयारी करत आहेत. 'इंडिया टुडे'नं याबाबत वृत्त प्रसिद्ध केलं आहे.

जेईई मेन 2023 परीक्षेच्या दुसऱ्या सत्रासाठी आता काही आठवडे शिल्लक राहिले आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांनी चांगली तयारी करणं आणि उपलब्ध वेळेचा पुरेपूर उपयोग करणं आवश्यक आहे. एफआयआयटीजेईईचे तज्ज्ञ रमेश बाटलीश यांनी विद्यार्थ्यांसाठी काही महत्त्वाच्या टिप्स शेअर केल्या आहेत. या टिप्सचा उपयोग करून विद्यार्थी यश मिळवण्याचा मार्ग सोपा करू शकतात.

Navy Recruitment: भारतीय नौदलात अधिकारी पदावर बंपर भरतीची घोषणा; पात्र असाल तर करा अप्लाय

सामान्य टिप्स:

1. वेळेचं नियोजन: जेईई मेन परीक्षेची तयारी करण्यासाठी सुनियोजित वेळापत्रक तयार करणं आणि त्याचे काटेकोरपणे पालन करणं महत्त्वाचं आहे. प्रत्येक विषयासाठी पुरेसा वेळ देऊन नियमितपणे उजळणी केली पाहिजे.

2. लक्ष केंद्रित करा: लक्ष विचलित झाल्यास परीक्षेच्या तयारीत अडथळा येऊ शकतो. त्यामुळे लक्ष विचलित होऊ देऊ नका. सहज साध्य होतील अशी छोटी-छोटी उद्दिष्टे सेट केल्यास लक्ष केंद्रित करण्यात आणि प्रेरित राहण्यास मदत होऊ शकते.

3. सकारात्मक राहा: जेईई मेन परीक्षेत यशस्वी होण्यासाठी स्वतःवर विश्वास ठेवणं आणि सकारात्मक मानसिकता राखणं गरजेचं आहे. यासाठी सकारात्मक लोकांच्या सानिध्यात राहिलं पाहिजे. जेणेकरून ते तुमचा आत्मविश्वास वाढवण्यास मदत करतील आणि तुम्हाला प्रोत्साहन देतील.

4. पुरेसा सराव करा: सातत्यपूर्ण सराव ही जेईई मेन परीक्षेत यश मिळवण्याची गुरुकिल्ली आहे. वास्तविक परीक्षेचा अनुभव घेण्यासाठी शक्य तितकी उदाहरणं आणि मॉक टेस्ट सोडवा. नियमित सराव केल्यास तुमचा वेग, अचूकता आणि उदाहरणं सोडवण्याची कौशल्यं सुधारण्यात मदत होऊ शकते.

10वी पास आहात ना? मग ही सुवर्णसंधी सोडूच नका; भारतीय पोस्टात सरकारी नोकरी; करा अप्लाय

विषयांनुसार तयारी करण्याच्या टिप्स:

भौतिकशास्त्र (फिजिक्स):

1. मूलभूत माहिती आणि प्रत्येक संकल्पनेतील मूलभूत गोष्टी समजून घ्या.

2. सूत्रे तयार करण्यावर आणि सर्व प्रकारची न्यूमरिकल प्रॉब्लेम्स सोडवण्यावर लक्ष केंद्रित करा.

3. सर्व महत्त्वाच्या सूत्रांचं आणि संकल्पनांचं नियमितपणे पुन्हा-पुन्हा वाचन करा. प्रत्येक सूत्रामागील मूलभूत तत्त्वं तुमच्या लक्षात आल्याची खात्री करा.

4. मेकॅनिक्स, हीट अँड थर्मोडायनॅमिक्स आणि वेव्ह ऑप्टिक्सवर भर देऊन भौतिकशास्त्रातील सर्व प्रमुख चॅप्टरना समान महत्त्व द्या.

5. आधुनिक भौतिकशास्त्र, सेमीकंडक्टर्स आणि कम्युनिकेशन सिस्टम्सकडे दुर्लक्ष करू नका.

6. मागच्या वर्षीच्या प्रश्नपत्रिका, जेईई मेनच्या पहिल्या सत्रातील प्रश्नपत्रिका सोडवण्याचा सराव करा.

1-2 नव्हे 'या' गावातील सर्वच जण आहेत YouTuber; नोकरी नाही तर व्हिडीओ बनवून कमवतात पैसे

रसायनशास्त्र(केमिस्ट्री):

1. सर्व केमिकल रिअॅक्शन्सची उजळणी करा. इनऑरगॅनिक आणि ऑरगॅनिक केमिस्ट्रीतील सर्व महत्त्वाच्या घटकांचा अभ्यास करा.

2. मागील वर्षीच्या प्रश्नपत्रिका आणि मॉक टेस्टमधून न्युमरिकल प्रॉब्लेम्स सोडवण्याचा सराव करा.

3. प्रत्येक विषयातील अतिमहत्त्वाच्या संकल्पना आणि त्यांचा वापर समजून घेण्यावर लक्ष केंद्रित करा.

4. महत्त्वाच्या रासायनिक अभिक्रिया आणि समीकरणं लक्षात ठेवा. कारण, या दोन बाबी इनऑरगॅनिक आणि ऑरगॅनिक केमिस्ट्रीचा पाया आहेत.

5. सर्व महत्त्वाच्या अभिक्रिया, सूत्रे आणि संकल्पना असलेले फ्लॅशकार्ड बनवा आणि त्यांची नियमित उजळणी करा.

6. एनसीईआरटीच्या पुस्तकांमधून इनऑरगॅनिक केमिस्ट्रीचा अभ्यास करा. कारण, काही प्रश्न जसेच्या तसे येण्याची शक्यता असते.

तुम्हालाही परदेशात जॉब हवाय ना? 'या' महिलेनं आतापर्यंत 3000 लोकांना दिलीये नोकरी; तुम्हीही साधा संपर्क

गणित(मॅथेमॅटिक्स):

1. कोऑर्डिनेट जिओमेट्री, कॅल्क्युलस आणि अलजेब्रामधील महत्त्वाच्या विषयांची उजळणी करा. मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका सोडवण्याचा सराव केला पाहिजे.

2. अनेक सूत्रे आणि संकल्पनांचा वापर आवश्यक आहे अशा विविध उदाहरणांचा सराव केला पाहिजे.

3. त्रिकोणमिती, को-ऑर्डिनेट जिओमेट्री आणि कॅल्क्युलसमधील सर्व महत्त्वाची सूत्रे लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा.

4 . व्हेक्टर्स आणि 3D-जिओमेट्रीवर जास्त प्रश्न येऊ शकतात. त्यामुळे त्यांचा जास्त सराव करा.

सर्व प्रश्नांसाठी निगेटिव्ह मार्किंग असल्यानं, तुम्हाला उत्तराची खात्री नसल्यास त्या प्रश्नांची उत्तर देणं टाळा. सोपे, मध्यम आणि कठिण या क्रमानं प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करा. परीक्षा अवघ्या काही दिवसांवर आल्यामुळे अभ्यास करणं गरजेचं आहे. मात्र, अभ्यास करताना नियमित विश्रांती घेण्याचं लक्षात ठेवा. सकारात्मक आणि निरोगी राहण्यासाठी पुरेशी झोप घ्या आणि सकस आहार घ्या.

First published:

Tags: Career, Career opportunities, Entrance Exams