मराठी बातम्या /बातम्या /करिअर /12वीनंतर BTech किंवा MBBS करायचं नाहीये? मग 'या' क्षेत्रांमध्ये करिअर करा ना; लाखोंमध्ये कमवाल

12वीनंतर BTech किंवा MBBS करायचं नाहीये? मग 'या' क्षेत्रांमध्ये करिअर करा ना; लाखोंमध्ये कमवाल

'या' क्षेत्रांमध्ये करिअर करा

'या' क्षेत्रांमध्ये करिअर करा

इच्छुक विद्यार्थ्यांची संख्या आणि या शाखांमध्ये उपलब्ध असलेल्या जागा यांचं प्रमाण विषम आहे. अशा विद्यार्थ्यांसाठी करिअरचे आणखीही काही मार्ग आहेत.

  • Trending Desk
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 18 मार्च:  सध्या इंजिनीअरिंग आणि मेडिकल या दोन क्षेत्रांकडे विद्यार्थ्यांचा कल अधिक आहे. इच्छुक विद्यार्थ्यांची संख्या आणि या शाखांमध्ये उपलब्ध असलेल्या जागा यांचं प्रमाण विषम आहे. अशा विद्यार्थ्यांसाठी करिअरचे आणखीही काही मार्ग आहेत. त्याविषयी जाणून घेऊ या. `टीव्ही नाइन हिंदी`ने याविषयी माहिती देणारं वृत्त प्रसिद्ध केलं आहे.

ज्यांना इंजिनीअरिंगला प्रवेश घ्यायचा आहे, त्यांनी जेईई मेन्स दिली आहे, तसंच दुसऱ्या राउंडसाठी नोंदणीही केली आहे. मेडिकलला जाऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांची प्रवेश परीक्षा सात मे रोजी होणार आहे. या दोन्ही परीक्षांसाठी 25 लाखांहून जास्त विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असली, तरी दोन ते अडीच लाख विद्यार्थ्यांनाच प्रवेश मिळू शकणार आहे. ज्यांना आवडत्या शाखेला प्रवेश मिळणार नाही अशांसाठी अन्य पर्यायांची माहिती घेऊया.

Career Tips: शेअर मार्केटचे बॉस होऊन घरबसल्या कमवा लाखो रुपये; असे व्हा स्टॉक ब्रोकर

सीए आणि सीएस हे करिअरसाठी चांगले आणि सध्याचे लोकप्रिय पर्याय आहेत. चांगले परिश्रम घेतले हे दोन्ही कोर्स पाच वर्षात पूर्ण होऊ शकतात. हे कोर्स पूर्ण केल्यानंतर प्रॅक्टिस सुरू करू शकता किंवा कॉर्पोरेट सेक्टरमध्ये नोकरी करू शकता. एखाद्या सीनियर सीएच्या फर्ममध्ये प्रॅक्टिसही करता येते. यात नवीन गोष्टी शिकायला मिळतात. केंद्र सरकारने जीएसटी लागू केल्यापासून कंपन्यांसाठी सीएस अनिवार्य केलं. त्यामुळे या प्रोफेशनसाठी अनेक संधी निर्माण झाल्या आहेत. या प्रोफेशनमध्ये पैसा आणि काम या दोन्ही गोष्टींची कमतरता नाही.

बीए-एलएलबी किंवा बीबीए-एलएलबी हा पाच वर्षांचा अभ्यासक्रम अलीकडे खूप लोकप्रिय झाला आहे. बारावीनंतर अनेक संस्था हा कोर्स ऑफर करत आहेत. संस्था प्रतिष्ठित असेल, तर चार वर्षं पूर्ण झाल्यावर कॅम्पस सिलेक्शन सुरू होते. हा अभ्यासक्रम पूर्ण केल्यावर सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालय, लोअर कोर्टमध्ये प्रॅक्टिस करू शकता किंवा स्वतःची लॉ फर्म सुरू करू शकता. कॉर्पोरेट क्षेत्रातही लॉ ग्रॅज्युएटसाठी अनेक संधी उपलब्ध आहेत. आवड आणि मार्केटमधली गरज ओळखून पदव्युत्तर पदवीदेखील मिळू शकता. यामुळे कायद्याशी संबंधित करिअरचे अनेक मार्ग खुले होतात.

जॉब करताना उच्च शिक्षण घ्यायचंय? टेन्शन नको; ही आहेत राज्यातील टॉप Distance Learning विद्यापीठं

इंजिनीअरिंगसह इतर विषयातला डिप्लोमा हादेखील चांगला पर्याय आहे. शासकीय पॉलिटेक्निक कॉलेजमध्ये डिप्लोमा तीन वर्षांचा असतो आणि या अभ्यासक्रमाची फीदेखील कमी असते. बीटेक झालेल्या उमेदवारांप्रमाणे नोकरीही पटकन मिळू शकते. शासकीय विभागांमध्ये ज्युनिअर इंजिनीअर्स म्हणून डिप्लोमाहोल्डर्सना मोठ्या संधी आहेत. पुढे शिक्षण घ्यायचं असेल तर बाहेरून बीटेकला प्रवेश घेऊ शकता. पॉलिटेक्निकमध्ये फार्मसी, पब्लिक रिलेशन, जाहिरात, फॅशन डिझायनिंग, हॉटेल मॅनेजमेंट आदी कोर्सेस उपलब्ध आहेत.

कम्प्युटर इंजिनीअरिंगची आवड असेल तर बीसीएला प्रवेश घेऊन कम्प्युटर क्षेत्रात पदार्पण करू शकता. कोणत्याही शाखेतून 12वी उत्तीर्ण झालेला विद्यार्थी बीसीएला प्रवेश घेऊ शकतो. काही शिक्षण संस्थांमध्ये यासाठी गणित विषय अनिवार्य आहे. हा अभ्यासक्रम सर्व विद्यापीठांमध्ये उपलब्ध आहे. चांगल्या कॉलेजमध्ये प्रवेश मिळाला तर कॅम्पस सिलेक्शन होऊ शकतं. बीसीएनंतर एमसीए करू शकता. बीसीए आणि एमसीए हा एकत्रित अभ्यासक्रम काही संस्थांमध्ये उपलब्ध आहे.

महिन्याचा तब्बल 1,00,000 रुपये पगार आणि बऱ्याच सुविधा; मुंबई महापालिकेत ओपनिंग्स; करा अप्लाय

वैद्यकीय अभ्यासक्रमाला प्रवेश न मिळालेले विद्यार्थी नीट परीक्षेच्या माध्यमातून बीव्हीएससीला प्रवेश घेऊन पशुचिकित्सक होऊ शकतात. बीएससी नर्सिंगसह डझनभर पॅरा मेडिकल अभ्यासक्रमांकरिता ही परीक्षा घेतली जाते. देशभरातील केंद्रीय मेडिकल कॉलेजेसमध्ये हे अभ्यासक्रम उपलब्ध आहेत.

बी. फार्म. हा चार वर्षांचा अभ्यासक्रम रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र हे विषय घेऊन इयत्ता 12वी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांसाठी आहे. हा कोर्स पूर्ण केल्यावर शासकीय किंवा खासगी संस्थांमध्ये नोकरी मिळू शकते. औषधनिर्मिती क्षेत्रात भारताचे स्थान प्रमुख देशांमध्ये आहे. त्यामुळे हा अभ्यासक्रमाकडे कल वाढत आहे. पदव्युत्तर पदवी, पीएचडी करून औषध क्षेत्रात संशोधनही करू शकता. या क्षेत्रात चांगला पैसा आणि नाव मिळू शकतं.

यापैकी कोणत्याही अभ्यासक्रमासाठी खासगी शिक्षणसंस्थेत प्रवेश घेणार असाल तर तिथल्या पायाभूत सुविधा, लॅब, शिक्षक, प्लेसमेंटचा तपशील प्रवेश घेण्यापूर्वी तपासा. या संस्थांमधल्या माजी विद्यार्थ्यांशी संवाद साधा. यातून तुम्हाला निश्चित फायदा होईल.

First published:

Tags: Career, Career opportunities, Education, Jobs Exams