मुंबई, 04 जुलै: कोणत्या क्षेत्रात करिअर करायचं आणि कोणत्या क्षेत्रात अधिक स्कोप (Career Scope after 12th) आहे हे आजकाल मुलांना सांगण्याची गरज पडत नाही. मुलं आपल्या आवडीच्या क्षेत्रात करिअर (How to do career) करतात. मात्र असेही काही मुलं असतात जे बारावीनंतर किंवा ग्रॅज्युएशननंतर (Career after graduation) नक्की कोणत्या क्षेत्रात करिअर करायचं हे ठरवू शकत नाही. यामुळे पालक मात्र चिंतेत असतात. अनेकदा पालकही मुलांना त्यांच्या आवडीच्या नसलेल्या क्षेत्रात Career करण्याचा सल्ला देतात. त्यामुळे मुलं टेन्शन घेतात. पण आता चिंता करू नका. आज आम्ही तुम्हाला अशा काही टिप्स (Career Tips in Marathi) देणार आहोत ज्यामुळे तुम्ही आपल्या पाल्यांना योग्य करिअर (How to help children to select right career option) निवडण्यात नक्कीच मदत करू शकाल. तसंच त्यांना यशस्वी (Success tips for children) होताना बघाल. चला तर जाणून घेऊया यासाठीच्या काही टिप्स.
नुकतीच राज्यात बारावीची परीक्षा संपली आहे. यानंतर लाखो विद्यार्थी महाविद्यालयात (Career Tips) प्रवेशासाठी अर्ज करतील. पालकांची इच्छा असल्यास, ते आपल्या मुलांना सर्वोत्तम करिअर पर्याय (career options for 12th students) निवडण्यात मदत करू शकतात. म्हणूनच आज पालकांसाठी काही टिप्स जाणून घेऊया.
10-12 वीत नापास झालात? हरकत नाही, DBRT कोर्स पूर्ण करा; लाखोंचे उत्पन्न कमवा
प्रत्येक मूल दुसऱ्यापेक्षा वेगळे असते. तुमच्या मुलाची आवड आणि व्यक्तिमत्व समजून घेऊन करिअरचे अनेक पर्याय त्याच्यासमोर ठेवा. हे त्याला सर्वोत्तम निर्णय घेण्यास मदत करू शकते.
जर तुमच्या मुलाला करिअरचा पर्याय निवडताना जास्त त्रास होत असेल, तर तुम्ही त्याला करिअर कौन्सिलरकडे घेऊन जा. यातून त्याला तज्ज्ञांचे मार्गदर्शन मिळेल.
पुण्यात तब्बल 22 लाख रुपये पॅकेजची नोकरी; CDAC करणार इंजिनिअर्सचं स्वप्न पूर्ण
`
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Career, Career opportunities, Job, Job alert