कौशल्यांच्या जोरावरच तुम्ही 'या' क्षेत्रात घडवू शकता करिअर

वरवर साधं, सोपं वाटत असलं तरी पॅकेजिंग हे क्षेत्र तसं मोठ आहे

News18 Lokmat | Updated On: Jun 22, 2019 02:55 PM IST

कौशल्यांच्या जोरावरच तुम्ही 'या' क्षेत्रात घडवू शकता करिअर

मुंबई, 22 जून - पॅकेजिंग हा शब्द आता प्रत्येकाच्या वापरात आला आहे. वरवर साधं, सोपं वाटत असलं तरी पॅकेजिंग हे क्षेत्र तसं मोठ आहे. इतर क्षेत्राप्रमाणे या क्षेत्रातसुद्धा करिअरच्या उत्तमोत्तम संधी उपलब्ध होत आहेत.

बाजाराती कोणत्याही वस्तूच्या भोवती गुंडाळलेलं वेष्टण किंवा आकर्षक आवरण म्हणजे पॅकेजिंग. साधारण 70 च्या दशकापर्यंत कोणत्याही वस्तूच्या विक्रीसाठी पॅकिंग म्हणून कोऱ्या कागदी पिशव्या किंवा वर्तमानपत्राचा वापर केला जात होता. त्यानंतर हळूहळू कागदाऐवजी प्लास्टिकचा वापर मोठ्या प्रमाणावर होऊ लागला. प्लास्टिक टिकाऊ आणि चमकदार असल्यामुळे त्याच्यावरच वस्तूचं नाव आणि कंपनीची जाहिरात करणं सुरू झालं. गेल्या पन्नास वर्षात याचा इतका प्रसार आणि प्रचार झाला की वस्तूच्या दर्जापेक्षा त्याचं बाहेरील आवरण किती आकर्षक आहे यावर त्याची विक्री किंवा मागणी ठरू लागली. सद्या उत्पादन कंपन्यांमध्ये या गोष्टीला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झालं आहे.

नव्या नोकरीचा पगार निश्चित करताना करू नका 'या' चुका

कोट्यवधींची उलाढाल - सद्या अनेक कंपन्यांमध्ये पॅकेजिंगसाठी कोट्वधींचं बजेट अंदाजपत्रकात मांडलं जातं. वस्तूच्या किमतीमध्ये आता पॅकेजिंगची किंमत त्याच्या गुणवत्तेनुसार वाढत चालली आहे.

करिअरची उत्तम संधी - स्पर्धेत टिकून राहण्यासाठी आणि त्यात सतत अग्रेसर राहण्यासाठी कंपन्यांमध्ये तशाच दर्जाच्या माणसांचा भरणा करावा लागतो. वस्तूचे डिझाइन करण्यासाठी कंपन्या जाहिरात एजन्सीबरोबर करार करतात. किंवा कंपन्या स्वतःच अशा कामासाठी डिझायनरची नेमणूक करतात. त्यामुळे चांगल्या आणि अनुभवी डिझायनरला भरघोस पगार मिळतो. कंपन्यांमध्ये पॅकेजिंग डेव्हलप्मेंट असा विभाग सुद्धा असतो. त्यात नवीन प्रयोग आणि संशोधन करून आपल्या उत्पादनाचा जर्जा वाढविण्यावर भर दिला जातो.

Loading...

असा आहे नवा ट्रेड - पूर्वी औषधांसाठी, फळांच्या रसासाठी, लोणच्यासाठी, सॉससाठी काचेच्या बाटल्या आणि त्यांच्या सुरक्षिततेसाठी बॉक्सचा वापर केला जायचा. आता काचेच्या बाटल्या जाऊ त्याऐवजी प्लास्टिकच्या बॉटल्सचा वापर केला जात आहे. प्लास्टिकच्या बाटल्या प्रवासात हाताळण्यासाठी टिकाऊ असल्याने बॉक्स वापरण्याची गरज भासत नाही.

खेळता-खेळता करा करिअर; क्रीडाविश्वात उपलब्ध आहेत 'या' सुवर्णसंधी

पॅकेजिंगमध्ये करिअर - उत्तम पॅकेजिंगसाठी उत्तम प्रिंटिंग आणि आकर्षक डिझायनिंग तसं फोटो वापरले जातात. म्हणून छायाचित्रण, छपाई या पॅकेजिंगला पूरक असलेल्या क्षेत्रातही करिअरच्या भरपूर संधी आहेत. प्लास्टिकचा वापर वाढल्याने प्लास्टिक टेक्नॉलॉजीचं शिक्षण घेतलं तर पॅकेजिंग क्षेत्रात त्याला खूप मागणी आहे. दुग्धजन्य पदार्थ, फूड प्रॉडक्टसाठी पॅकेजिंग महत्त्वाचं असल्याने डेअरी टेक्नॉलॉजीचा अभ्यासक्रम करणाऱ्यांना पॅकेजिंगमध्ये खूप संधी उपलब्ध आहेत. पॅकेजिंगचा कोर्स करून अनेक प्रकारच्या व्यवसायात नोकरी किंवा स्वतःचा व्यवसाय सुरू करता येतो.

यातसुद्धा करता येईल करिअर - छपाई म्हणजेच प्रिंटिंग इंडस्ट्री, औषध कंपन्या, ऑटोमोबाइल्स, खाद्यपदार्थ उत्पादन करणाऱ्या कंपन्या, फास्ट मुव्हिंग कन्झ्युमर गुड्स, निरनिराळे शॅम्पू, चहा पावडर, कॉफी, मसाले, सौदर्य प्रसाधनं अशा कंपन्यांमध्ये करिअर करण्याची उत्तम संधी आहे. तसंच ब्रँडेड कपड्यांच्या उद्योगात पॅकेजिंगसाठी मोठ्या प्रमाणात माणसं लागतात.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: career
First Published: Jun 22, 2019 02:55 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...