मराठी बातम्या /बातम्या /करिअर /Career After 12th: आर्ट्स म्हणजे लहान फिल्ड नाही; 'या' विषयांत ग्रॅज्युएशन करा अन् व्हा मालामाल

Career After 12th: आर्ट्स म्हणजे लहान फिल्ड नाही; 'या' विषयांत ग्रॅज्युएशन करा अन् व्हा मालामाल

आर्ट्समधील करिअरच्या संधी

आर्ट्समधील करिअरच्या संधी

बारावीनंतर आर्ट्समध्ये करिअरच्या अनेक संधी आहेत. तसंच चांगल्या गलेलठ्ठ पगाराची नोकरी मिळण्याची शक्यता आहे. चला तर मग जाणून घेऊया आर्ट्समधील करिअरच्या संधींबद्दल.

मुंबई, 25 मे: महाराष्ट्र स्टेट बोर्डाचा बारावीचा निकाल अखेर ऑनलाईन पद्धतीनं जाहीर करण्यात आला आहे. यंदा स्टेट बोर्डाचा बारावीचा निकाल हा 91.25 टक्के लागला आहे. विद्यार्थ्यांना आता आपले मार्क्स ऑनलाईन बघता येत आहेत. विद्यार्थ्यांचं निकालाचं टेन्शन गेलं मात्र आता खरी परीक्षा सुरु होणार आहे. ती परीक्षा म्हणजे करिअरची निवड.

बारावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांकडे आता बारावीतील स्ट्रीमशी निगडित करिअर निवडणं हाच एक पर्याय बाकी आहे. त्यात आर्ट्समध्ये असलेले विद्यार्थी अभ्यासात 'ढ' असा समज आहे. पण असं अजिबात नाही. बारावीनंतर आर्ट्समध्ये करिअरच्या अनेक संधी आहेत. तसंच चांगल्या गलेलठ्ठ पगाराची नोकरी मिळण्याची शक्यता आहे. चला तर मग जाणून घेऊया आर्ट्समधील करिअरच्या संधींबद्दल.

4थी पास आहात ना? मग सरकारी नोकरीची ही सुवर्णसंधी सोडूच नका; या पत्त्यावर लगेच पाठवून द्या अर्ज

आर्ट्स या स्ट्रीममध्ये विद्यार्थ्यांना इतिहास, भाषा, संस्कृती, तत्वज्ञान आणि सामाजिक ज्ञान या सर्व बाबींबद्दल ज्ञान मिळतं. तसंच विद्यार्थ्यांना कला क्षेत्रात आपले छंद जोपासण्याचंही ज्ञान मिळतं. त्यामुळे हे विद्यार्थी सर्वगुणसंपन्न असतात.

ना IIT मधून शिक्षण घेतलं ना IIM मधून; तरीही Google नं दिलं तब्बल 1 कोटींपेक्षा जास्त पॅकेज; मुलीनं केली कमाल

या क्षेत्रात करू शकता ग्रॅज्युएशन (graduation)

बॅचलर ऑफ आर्ट्स (Bachelor of Arts B.A.)

बॅचलर ऑफ फाईन आर्ट्स (Bachelor of Fine Arts B.F.A.)

बॅचलर ऑफ बिझिनेस अॅडमिनिस्ट्रेशन (Bachelor of Business Administration B.B.A.)

लॉ (कायद्याचं) शिक्षण (B.A + L.L.B)

बॅचलर ऑफ फॅशन डिझायनिंग (Bachelor of Fashion Design B.F.D.)

बॅचलर ऑफ हॉटेल मॅनेजमेंट (Bachelor of Hotel Management B.H.M.)

बॅचलर इन जर्नलीजम अँड मास कम्युनिकेशन (पत्रकारिता) (Bachelor of Journalism and Mass Communication)

असे एक ना अनेक कोर्सेस बारावी आर्ट्सनंतर उप्लब्ध आहेत, त्यामुळे तुमची आवड कोणत्या क्षेत्रात आहे ठरवूनच प्रवेश घ्या.

First published:
top videos

    Tags: Career, Career opportunities, Career Tips, Education