मराठी बातम्या /बातम्या /करिअर /Blockchain क्षेत्रात करिअरच्या अनेक मोठ्या संधी; जाणून घ्या सविस्तर

Blockchain क्षेत्रात करिअरच्या अनेक मोठ्या संधी; जाणून घ्या सविस्तर

सध्या जग ज्या वेगाने सगळ्या गोष्टींचं डिजिटायझेशन करत आहे ते पाहता ब्लॉकचेन तंत्रज्ञानात भविष्यात करिअरच्या (Career in Blockchain) अनेक संधी उपलब्ध होणार आहेत.

सध्या जग ज्या वेगाने सगळ्या गोष्टींचं डिजिटायझेशन करत आहे ते पाहता ब्लॉकचेन तंत्रज्ञानात भविष्यात करिअरच्या (Career in Blockchain) अनेक संधी उपलब्ध होणार आहेत.

सध्या जग ज्या वेगाने सगळ्या गोष्टींचं डिजिटायझेशन करत आहे ते पाहता ब्लॉकचेन तंत्रज्ञानात भविष्यात करिअरच्या (Career in Blockchain) अनेक संधी उपलब्ध होणार आहेत.

  नवी दिल्ली 27 नोव्हेंबर : क्रिप्टोकरन्सीमुळे सध्या ब्लॉकचेन (Blockchain) हा शब्द आपण सर्व वारंवार ऐकत आहोत. जगभरातल्या आर्थिक व्यवहारांचा आणि अर्थव्यवस्थेचा चेहरामोहराच या तंत्रज्ञानामुळे बदलला आहे. सध्या जग ज्या वेगाने सगळ्या गोष्टींचं डिजिटायझेशन करत आहे ते पाहता ब्लॉकचेन तंत्रज्ञानात भविष्यात करिअरच्या (Career in Blockchain) अनेक संधी उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांनी यामध्ये करिअर करण्याच्या दृष्टीने आतापासूनच विचार करणं गरजेचं आहे.

  ब्लॉकचेन तंत्रज्ञान काय करतं?

  ब्लॉकचेन हे मालमत्ता व्यवस्थापन आणि देयकांशी संबंधित सर्व कार्य सुव्यवस्थित करतं. यामुळे अशा व्यवहारांमध्ये मध्यस्थ किंवा दलालांची गरज नाहीशी होते. यासोबतच ब्लॉकचेन व्यवहारात्मक डेटाचं प्रभावी व्यवस्थापन सुनिश्चित करतं. विशेष म्हणजे, ब्लॉकचेन केवळ बँकांमध्येच (Fields where blockchain is used) नाही, तर विमा, हॉस्पिटॅलिटी, रिटेल, आरोग्य आणि औषध उद्योग अशा अनेक व्यवसायांमध्ये उपयोगी आहे. ब्लॉकचेन्समुळे अनेक थर्ड पार्टीजची (नोटरीज, बँकिंग ट्रेड्स आणि जमीन नोंदणी) जागा कम्प्युटर घेतो.

  कोणत्या क्षेत्रांमध्ये असते करिअरची संधी

  ब्लॉकचेनशी संबंधित क्षेत्रांमध्ये ब्लॉकचेन डेव्हलपर, ब्लॉकचेन सोल्युशन आर्किटेक्ट, ब्लॉकचेन क्वालिटी इंजिनिअर, ब्लॉकचेन यूएक्स डिझायनर, क्रिप्टोकरन्सी कम्युनिटी मॅनेजर यांचा समावेश होतो. यातल्या प्रत्येक करिअर ऑप्शनबाबत आपण सविस्तर जाणून घेणार आहोत. 'दी ट्रिब्युन'ने याबाबतचा लेख प्रसिद्ध केला आहे.

  ब्लॉकचेनची मागणी बाजारात वाढत असल्यामुळे, अनुभवी ब्लॉकचेन डेव्हलपर्सची (Blockchain developers) मागणीही मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे प्रोग्रामिंग लँग्वेजमध्ये (Programming languages) कुशल असलेल्या व्यक्तींसाठी या क्षेत्रात चांगल्या संधी उपलब्ध होणार आहेत. केवळ ब्लॉकचेन तयार करणं गरजेचं नाही, तर त्याचं योग्य डिझायनिंग आणि त्याचं पूर्ण सोल्यूशन तयार करणंही गरजेचं आहे. ब्लॉकचेन सोल्यूशन आर्किटेक्ट (Blockchain Solution Architect) हेच काम करतात. प्रोग्रॅमर्स, नेटवर्क अॅडमिन्स आणि यूआय डिझायनर्सच्या टीमचं नेतृत्व करणं हे ब्लॉकचेन सोल्यूशन आर्किटेक्टचं काम असतं.

  सोल्यूशन आर्किटेक्ट व्यतिरिक्त आणखी एका डिझायनरची ब्लॉकचेनला गरज भासते, तो म्हणजे यूएक्स डिझायनर. याचं काम ब्लॉकचेनचा यूझर एक्सपिरिअन्स अधिकाधिक चांगला करणं आणि त्यासाठी सुलभ असा इंटरफेस तयार करणं असं असतं. जेवढा चांगला यूझर इंटरफेस, तेवढे वापरकर्ते अधिक. त्यामुळेच ब्लॉकचेन यूएक्स डिझायनरचीही (Blockchain UX designer) मागणी मोठ्या प्रमाणात आहे. ब्लॉकचेन क्वालिटी इंजिनिअर (Blockchain quality engineer) हादेखील एक चांगला करिअर ऑप्शन आहे. रिसर्च, स्ट्रॅटेजी प्लॅनिंग आणि क्वालिटी मॅनेजमेंट या कामांमध्ये निपुण असलेल्या व्यक्तींना यात बरीच संधी असणार आहे. त्यामुळे इंजिनीअरिंगसोबत मॅनेजमेंटचा अभ्यास असणाऱ्यांना या क्षेत्रात नक्कीच प्राधान्य मिळेल.

  क्रिप्टोकरन्सीचं भविष्य पाहता सध्या क्रिप्टोकरन्सी कम्युनिटी मॅनेजरची (Cryptocurrency community manager) मागणीही मोठ्या प्रमाणात वाढली आहे. मार्केट आणि क्लायंट्समधले संबंध चांगले आणि कायम ठेवण्याचं काम क्रिप्टोकरन्सी कम्युनिटी मॅनेजर करतो.

  या सगळ्यात आर्थिक व्यवहारांचा सहभाग मोठ्या प्रमाणात असल्यामुळे लीगल कन्सल्टन्टचीही मागणी मोठ्या प्रमाणात वाढणार आहे. त्यामुळे क्रिप्टो, फायनान्स आणि इतर तांत्रिक गोष्टींची माहिती असणाऱ्या ब्लॉकचेन लीगल कन्सल्टन्टची (Blockchain legal consultant) मागणी वाढली आहे.

  जगभरातले व्यवहार वेगाने बदलत आहेत. त्यामुळे त्यांच्याशी संबंधित कामंही बदलत आहेत. म्हणूनच शिक्षण संस्थांनीही आता भविष्यातल्या नोकऱ्यांशी संबंधित शिक्षण देणं सुरू करणं गरजेचं आहे. यासोबतच विद्यार्थ्यांनीही भविष्यातल्या या संधी ओळखून वेळोवेळी गरजेनुसार आपली स्किल्स अपग्रेड करत राहणं गरजेचं आहे.

  First published:
  top videos

   Tags: Career, Cryptocurrency