• Home
 • »
 • News
 • »
 • career
 • »
 • Career in Exhibition Design: एक्झिबिशन डिझाईनर व्हा आणि कमवा भरघोस पैसे; बघा कोर्सबद्दल संपूर्ण माहिती

Career in Exhibition Design: एक्झिबिशन डिझाईनर व्हा आणि कमवा भरघोस पैसे; बघा कोर्सबद्दल संपूर्ण माहिती

एक्झिबिशन डिझायनिंगमधील काही कोर्सेस आणि करिअरच्या संधींबाबत माहिती

एक्झिबिशन डिझायनिंगमधील काही कोर्सेस आणि करिअरच्या संधींबाबत माहिती

आज आम्ही तुम्हाला एक्झिबिशन डिझायनिंगमधील काही कोर्सेस आणि करिअरच्या संधींबाबत सांगणार आहोत.

 • Share this:
  मुंबई, 24 नोव्हेंबर: आता देशात ऑफबीट करिअर ऑप्शन्सचा (Offbeat Career Options) ट्रेंड वाढला आहे. बहुतेक विद्यार्थी शाळा-कॉलेज संपताच कौशल्यावर आधारित नोकरी शोधू लागतात किंवा काही काम करतात ज्यात त्यांची आवड देखील समाविष्ट असते. जर तुम्हाला डिझायनिंगशी संबंधित कोर्स (Courses related to design) करायचा असेल पण फॅशन डिझायनिंग कोर्स, शू डिझायनिंग कोर्स किंवा इव्हेंट मॅनेजमेंट कोर्स (Event Management Course) व्यतिरिक्त काहीतरी करण्याच्या मूडमध्ये असाल, तर एक्झिबिशन डिझायनिंग (How to become Exhibition Designer) हा एक चांगला पर्याय ठरू शकतो. आज आम्ही तुम्हाला एक्झिबिशन डिझायनिंगमधील काही कोर्सेस (Courses in Exhibition Design) आणि करिअरच्या संधींबाबत सांगणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया. देशातील सर्व लहान-मोठ्या शहरांमध्ये दर महिन्याला विविध प्रकारची प्रदर्शने आयोजित केली जातात. सणांच्या काळात ही प्रदर्शने वाढतात. आता त्यांच्यातही करिअरचे पर्याय उपलब्ध होऊ लागले आहेत. मोठे हॉटेल किंवा ब्रँड त्यांचे प्रदर्शन आयोजित करण्यासाठी प्रोजेक्ट्सच्या आधारावर तज्ञांना नियुक्त करतात. अशा तज्ज्ञांना मोठी सॅलरीही मिळते. त्यामुळे तुम्ही एक्झिबिशन डिझाईन कोर्स (Exhibition Design Course). करू शकता. नक्की काय असतं एक्झिबिशन डिझायनरचं काम? आर्ट गॅलरी, मार्केट प्लेस, मेळे, एक्स्पो इत्यादी ठिकाणी भरवल्या जाणाऱ्या प्रदर्शनांची रचना करण्याचे काम एक्झिबिशन डिझायनर (Work Profile of Exhibition Designer) करतात. डिझायनरचे काम प्रदर्शनापूर्वी संघांशी नियोजन, बजेट आणि समन्वय साधणे असते. स्टॉल लावण्यापासून ते प्रदर्शनाच्या वेळेची निवड, प्रसिद्धी, कंपन्यांना निमंत्रण, पत्रकार परिषदा आयोजित करणे आदी जबाबदारीही प्रदर्शन व्यवस्थापनाची असते. क्लायंटच्या गरजा समजून घेतल्यानंतर, प्रदर्शन डिझायनर संगणक-सहाय्यित रेखाचित्रे आणि स्केल मॉडेल वापरून डिझाइन तयार करतो. तुम्हालाही जेवण बनवण्याची प्रचंड आवड असेल Chef म्हणून घडवा करिअर; वाचा सविस्तर इथे मिळू शकेल नोकरी इव्हेंट मॅनेजमेंट कंपन्या आणि इंटिरियर डिझायनिंग कंपन्या एक्झिबिशन डिझायनर्सना (Exhibition Designer Jobs) रोजगाराच्या संधी देतात. यामध्ये त्यांना भरपूर पगार दिला जातो. इतका मिळू शकतो पगार अनुभवी आणि सर्जनशील एक्झिबिशन डिझायनरला (Exhibition Designer salary) वार्षिक 10 लाख ते 15 लाख रुपये पगार मिळू शकतो. तसेच अनेक इंटिरियर डिझायनर्स आहेत जे स्वतःची खाजगी कंपनी चालवतात.
  Published by:Atharva Mahankal
  First published: