मुंबई, 06 नोव्हेंबर: DM म्हणजेच जिल्हा दंडाधिकारी (District Magistrate) संपूर्ण जिल्हा (DM jobs) हाताळतात. त्या जिल्ह्यातील पोलीस देखील डीएमच्या अधिपत्याखाली काम करतात. जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी ठोस पावले उचलणे हे डीएमचे मुख्य काम आहे. हे जिल्ह्यातील अत्यंत प्रतिष्ठेचे पद मानले जाते. DM होण्यासाठी उमेदवार हा पदवीधर असला पाहिजे (DM ).
तुम्हाला सरकारी नोकरी (Career in DM) करून लोकांची सेवा करायची असेल, तर तुम्ही UPSC परीक्षेची तयारी सुरू करू शकता. DM होण्यासाठी उमेदवाराला UPSC अंतर्गत होणारी नागरी सेवा परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. यानंतर तुम्ही आयएएस अधिकारी होऊ शकता. मग प्रमोशनसोबत डीएम होण्याचा मार्ग सोपा होतो.
Job Alert: केंद्रीय विद्यालय कामठी इथे शिक्षक पदांसाठी होणार भरती; 27,000 पगार
डीएम होण्यासाठी आवश्यक पात्रता
डीएम होण्यासाठी उमेदवाराने पदवी (DM eligibility) उत्तीर्ण केलेली असावी. 10वी, 12वी आणि ग्रॅज्युएशनमध्ये तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणताही विषय घेऊ शकता. पण प्रत्येक विषय खूप खोलवर वाचा कारण डीएमच्या मुलाखतीत या विषयांशी संबंधित प्रश्नच विचारले जातात. डीएम होण्यासाठी 12वी आणि ग्रॅज्युएशनमध्ये इंग्रजी, गणित, हिंदी, चालू घडामोडी, सामान्य अध्ययन आणि तर्क या विषयांची तयारी करावी लागते.
डीएम होण्यासाठी वयोमर्यादा
डीएम होण्यासाठी उमेदवाराचे वय 21 ते 32 वर्षांच्या दरम्यान असावे. OBC प्रवर्गातील उमेदवारांना 3 वर्षे आणि एससी/एसटी प्रवर्गातील उमेदवारांसाठी 5 वर्षांची सूट आहे. सामान्य श्रेणीतील उमेदवार या परीक्षेसाठी 6 वेळा, तर OBC उमेदवार 9 वेळा उपस्थित राहू शकतात आणि SC/ST उमेदवारांसाठी (IAS अधिकारी वयोमर्यादा) कोणतीही मर्यादा नाही.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Career opportunities