टक्केवारी कितीही मिळवा; यशस्वी होण्यासाठी 'ही' कौशल्ये तुमच्यात असायलाच हवी

टक्केवारी कितीही मिळवा; यशस्वी होण्यासाठी 'ही' कौशल्ये तुमच्यात असायलाच हवी

'या' स्किल्स तुमच्यात असतील तरच तुम्ही मोठी मजल मारू शकाल

  • Share this:

मुंबई, 22 जून : अनेकजण उत्तम गुणांनी पदवी मिळवतात. मात्र, करिअर करताना ते फारशी मजल मारू शकत नहीत. यावरून तुमच्या लक्षात आलं असेल की, करिअर करताना फक्त गुणांची टक्केवारी असून चालत नाही. तर त्यासोबत आणखी काही गोष्टी तुमच्यात असाला हव्यात. या गोष्टी म्हणजे तुमच्या सॉफ्ट स्किल्स. या स्किल्स जर तुमच्यात असतील, तर कोणत्याही क्षेत्रात तुम्ही मोठी मजल मारू शकता.

बॉडी लॅग्वेज - कोणत्याही व्यक्तीवर किंवा समुहावर सगळ्यात पहिले तुमची तुमची बॉडी लॅग्वेज प्रभाव टाकते. त्यामुळे याबाबत तुम्ही नेहमीच अलर्ट रहायला हवं. जर तुमची बॉडी लॅग्वेज प्रभावी असेल तरच तुम्ही इतरांवर प्रभाव टाकू शकाल.

उत्तम व्यवस्थापक व्हायचं असेल तर 'हे' गुण तुमच्या अंगी असायलाच हवेत

वेळेचं महत्त्व - ठरलेलं काम हे तुम्ही वेळेतच करायला हवं. हा गुण जर तुमच्या अंगी असेल तरच तुच्या यशाचा आलेख उंच जातो.

राहणीमान - धावपळीच्या या युगात कुणालाच स्वतःकडे लक्ष द्याला वेळ नसतो. पण वेळात वेळ काढून तुम्ही राहणीमानला महत्त्व देत असाल तर त्याचा प्रभाव तुमच्या व्यक्तीमत्वावर पडतो. मात्र काळ, वेळ आणि स्थळ याचं भान ठेऊन तुम्ही हा गुण जोपासला तरच त्याचा प्रभाव इतरांवर पडतो.

हजरजबाबीपणा - बोलताना हजरजबाबीपणा आणि समयसूचकता ही अत्यंत महत्त्वाची बाब आहे. कुठे, केव्हा आणि काय बोलायचं याकडे तुमचं पूर्ण भान असायला हवं. नको त्या ठिकाणी तुम्ही उगाच बोलत राहिलात तर लोकं तुमची चेष्टा करतील आणि योग्यवेळी योग्य वेळी  योग्य शब्दात तुम्ही तुमचं म्हणणं प्रभावीपणे मांडलं तर लोकं तुम्हाला डोक्यावर घेतील.

विचारांची पातळी वाढवा; कारण त्यावरच अवलंबून असतो तुमचा आत्मविश्वास

संवाद कौशल्य - संवाद कौशल्यावर तुमचं प्रभुत्व असयला हवं. इतरांचं लक्ष वेधून घेण्याची शक्ती तुमच्या संवादात असायला हवी. जर तुम्हाला कुणी प्रतिप्रश्न विचारत असेल तर त्याचं उत्तर तुम्ही अतिशय सभ्यतेने द्यायला हवं. अनेकदा विचारलेला प्रश्न तुम्हाला कळत नाही किंवा त्याचं उत्तर तुम्ही देऊ शकतर नाही अशावेळी प्रश्न विचारणाऱ्या व्यक्तीला तुम्हाला हाताळता यायला हवं.

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 22, 2019 03:46 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading