• Home
 • »
 • News
 • »
 • career
 • »
 • Naukari Ki Baat : कोरोना महामारीनंतर घेताय नोकरीचा शोध? इथे आहेत संधी, जाणून घ्या डिटेल्स

Naukari Ki Baat : कोरोना महामारीनंतर घेताय नोकरीचा शोध? इथे आहेत संधी, जाणून घ्या डिटेल्स

कोरोनाचे रुग्ण कमी होत असताना तिसरी लाट येण्याची शक्यताही कमी झाली आहे. त्यामुळेच जगभरातली ठप्प झालेली अर्थव्यवस्था आता हळूहळू रुळावर येत आहे. कोरोना काळात अनेकांच्या नोकरीवर गदा आली होती. आता जवळपास सर्व जग अनलॉक होत असताना नोकरीच्या नव्या संधीही (New Job opportunities) उपलब्ध झाल्या आहेत.

 • Share this:
  मुंबई, 23 नोव्हेंबर- :   कोरोनाचे रुग्ण कमी होत असताना तिसरी लाट येण्याची शक्यताही कमी झाली आहे. त्यामुळेच जगभरातली ठप्प झालेली अर्थव्यवस्था आता हळूहळू रुळावर येत आहे. कोरोना काळात अनेकांच्या नोकरीवर गदा आली होती. आता जवळपास सर्व जग अनलॉक होत असताना नोकरीच्या नव्या संधीही  (New Job opportunities)  उपलब्ध झाल्या आहेत. याबाबत ‘नौकरी की बात’ (Naukri ki Baat) या सीरिजमध्ये न्यूज 18ने अनारॉक ग्रुपचे (ANAROCK Groups) चीफ पीपल ऑफिसर सुखदीप अरोरा (Sukhdeep Arora) यांच्याशी बातचीत केली. त्या वेळी अरोरा यांनी नोकरी शोधण्याच्या काही पद्धती (Job searching tips) शेअर केल्या. यासोबतच त्यांनी कोरोना काळात नोकरी गमावलेल्या व्यक्तींसाठीही विशेष टिप्स दिल्या आहेत. सध्या सॉफ्टवेअर कोडिंग किंवा सोशल मीडिया मार्केटिंग स्किल्स वाढवण्यावर भर द्यावा, असा सल्ला त्यांनी दिला आहे. या मुलाखतीतले काही ठळक मुद्दे पाहू या. - कोरोना काळात ज्यांनी आपली नोकरी गमावली आहे त्यांनी काय करावं? - सर्वांत महत्त्वाचं म्हणजे त्यांनी आपली उमेद न हारता, देशाच्या मजबूत अर्थव्यवस्थेवर विश्वास ठेवावा. कोरोना काळात बऱ्याच व्यवसायांमध्ये टेक्नॉलॉजीचं महत्त्व वाढलं आहे. त्यामुळे आता पुन्हा नोकरीसाठी अर्ज करण्यापूर्वी स्वतःला अपस्किल (Upskill before applying to new job) करून घेणं गरजेचं आहे. आपल्या कामामध्ये इंटरनेटचा वापर कसा करता येईल, त्यासंबंधी काही ऑनलाइन कोर्सेस आहेत का, आपल्या कामाशी संबंधित इतर स्किल्स वाढवण्यासाठी काही कोर्सेस आहेत का, हे पाहावं. असे कोर्स केल्यामुळे तुमच्या रेझ्युमेमध्ये अधिक स्किल्स (Online courses to add skills) जोडली जातात. तसंच, मधल्या काळात काही तरी नवीन शिकल्यामुळे तुम्ही अधिक आत्मविश्वासाने नवीन ठिकाणी अर्ज करू शकाल. - सध्या किती तरी ऑनलाइन कोर्सेस उपलब्ध आहेत. तरुणांनी त्यातले कोणते कोर्स करावेत? कंपन्या हे कोर्सेस स्वीकारतील? - कोणता कोर्स करायचा हे ठरवण्यासाठी सुरुवातीला आपलं वर्क स्किल (Know your work skill) ओळखणं गरजेचं आहे. तुमच्या कामाशी अधिकाधिक संबंधित असा कोर्स करणं फायद्याचं ठरतं. उदाहरण द्यायचं झाल्यास, तुम्ही सेल्समध्ये काम करत असाल, तर सोशल मीडिया मार्केटिंगचा (Social Media Marketing) एखादा कोर्स करणं फायद्याचं ठरणार आहे. तसंच, तुम्ही शिक्षक असाल, तर ई-लर्निंग (E Learning courses) संबंधित स्किल्स वाढवण्याच्या दृष्टीने तुम्ही प्रयत्न करू शकता. - नोकऱ्या उपलब्ध होत आहेत हे आपल्याला माहिती आहे; पण युवकांनी कशा प्रकारे नोकऱ्या शोधाव्यात? - यासाठी तुम्ही लिंक्डइन किंवा इतर ऑफिशिअल अशा नेटवर्किंग साइट्सवर आपलं प्रोफाइल तयार करू शकता. या ठिकाणी तुम्ही आपला रेझ्युमे पोस्ट करू शकता. तसंच फेसबुक किंवा ट्विटरच्या मदतीनेही तुम्ही नोकरी शोधू (How to find jobs post Covid) शकता. तुम्ही आधी कुठे काम करत असाल, तर तिथल्या दुसऱ्या ठिकाणी गेलेल्या कर्मचाऱ्यांच्या मदतीने किंवा आपल्या मित्रांच्या मदतीनेही तुम्ही नोकरी शोधू शकता. - कोविड-19 नंतर भरती प्रक्रियेमध्ये काही बदल झाला आहे का? - सध्या प्रत्यक्ष मुलाखतीपेक्षा झूम किंवा तत्सम व्हिडिओ कॉलिंग अॅप्सच्या मदतीने मुलाखत घेण्याचा कल वाढला आहे. अर्थात, लॉकडाउन पूर्णपणे उघडल्यानंतर पुन्हा प्रत्यक्ष मुलाखती सुरू होतीलच. इतर गोष्टींमध्ये – जसं की भरती केलेल्या उमेदवारांची पार्श्वभूमी तपासणं, माहिती साठवून ठेवणं, अर्ज प्रक्रिया इत्यादींमध्ये इंटरनेटवरच्या टूल्सचा वापर करण्यात येत आहे. कोविडच्या काळात इंटरनेटचा वापर आश्चर्यकारकरीत्या वाढला आहे. त्यामुळे भरती, प्रशिक्षण, वर्कफ्लो मॉनिटरिंग आणि कामगिरीचं मूल्यांकन अशा बऱ्याच गोष्टींसाठी डिजिटल पर्यायांना प्राधान्य दिलं जात आहे. त्यामुळे इंटरनेट, डिजिटल गोष्टी कशा काम करतात याबाबत तुम्ही जेवढी जास्त माहिती घ्याल, तेवढी तुम्हाला नोकरी मिळण्याची शक्यता वाढेल. - मुलाखतीची तयारी कशी करावी? - मुलाखतीची तयारी करण्यासाठी (How to prepare for interview) सर्वांत महत्वाची गोष्ट म्हणजे, ज्या कंपनीमध्ये तुम्ही अर्ज करत आहात, त्या कंपनीचं काम काय आहे ते समजून घ्या. त्या कंपनीचं बिझनेस मॉडेल, पॉलिसीज याबाबत माहिती करून घ्या. इंटरनेटवर ही माहिती सहज उपलब्ध असते. तुमच्याकडे कोणती सॉफ्ट स्किल्स (Know your soft skills) आहेत आणि त्याचा कंपनीच्या व्यवसायाला काय फायदा होईल हे लक्षात घ्यावं. उदाहरण द्यायचं झाल्यास, तुमच्याकडे रिटेल सेल्सचा चांगला अनुभव असला, तर त्याचा त्यासंबंधी काम करणाऱ्या कंपनीमध्ये जास्त फायदा होईल. प्रॉपर्टी सेलिंग किंवा वेबसाइट सेवा विक्री करणाऱ्या कंपन्यांमध्ये त्याचा म्हणावा असा उपयोग होणार नाही. - सध्या कोणत्या नवीन प्रकारच्या नोकऱ्या उपलब्ध होऊ शकतात आणि करिअरचं स्वरूप कसं राहील? - सध्या सेल्स आणि मार्केटिंग क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात नोकऱ्या (Which sector has more jobs) उपलब्ध होतील. यासोबतच टेक्निकल भागामध्ये नोकऱ्यांची मोठी संधी उपलब्ध होणार आहे. त्यामुळे सॉफ्टवेअर कोडिंग किंवा मग सोशल मीडिया मार्केटिंग अशी स्किल्स वाढवण्याची या वेळी गरज आहे. यासंबंधी कित्येक कोर्सेस इंटरनेटवर उपलब्ध आहेत. - आर्टिफिशिअल इंटेलिजन्स, बिग डेटा आणि ऑटोमेशन यांमुळे काय बदल होईल? - सध्याच्या घडीला ज्या कंपन्या टेक्नॉलॉजीकडे पाठ फिरवतील किंवा मोठ्या प्रमाणात वापर करणार नाहीत त्या अधिक काळ टिकणं शक्य नाही. नोकरी शोधणाऱ्यांसाठीही हे लक्षात घेणं गरजेचे आहे. काही अपवाद वगळता जवळपास सर्वच क्षेत्रांतल्या तरुणांनी टेक्निकल स्किल्स डेव्हलप करून घेणं गरजेचं आहे. - आम्ही आमच्या वाचकांना हे सांगू शकतो का, की या क्षेत्रामध्ये रोजगाराच्या किती संधी आहेत आणि भविष्यात याची परिस्थिती कशी असेल? - रिअल इस्टेट व्यवसाय मोठ्या प्रमाणात पूर्वपदावर येत आहे. विशेषतः गृहनिर्माण आणि व्यावसायिक मालमत्तांची खरेदी-विक्री पुन्हा सुरू झाली आहे. अगदी अनारॉकसारख्या कंपन्याही नवीन उमेदवारांच्या शोधात आहेत. यामध्ये मालमत्ता विक्रीचा अनुभव असण्यासोबतच, ज्यांना रिअल इस्टेट मार्केटिंगची नवी टेक्निक्स माहिती आहेत अशा उमेदवारांना प्राधान्य दिलं जात आहे. - या रेसमध्ये टिकण्यासाठी उमेदवाराने काय करणं गरजेचं आहे? - अपस्किल. आपल्या कामाशी संबंधित नवनवी टेक्निक्स शिकून घेणं आणि स्वतःला अपडेट करत राहणं गरजेचं आहे. - तुमच्या कंपनीमध्ये भरती प्रक्रिया कशी आहे आणि नोकरीच्या शोधात असलेले तरुण-तरुणी तुमच्या कंपनीपर्यंत कसे पोहोचू शकतात? - अनारॉकच्या वेबसाइटवर करिअर सेक्शन आहे. त्या ठिकाणी जाऊन नोकरीसाठी अर्ज करता येईल. यासोबतचcareers@anarock.comया ई-मेल आयडीवर रेझ्युमे पाठवता येईल. अर्थात, आम्ही नीटनेटका रेझ्युमे आणि चांगलं कव्हरिंग लेटर असलेल्या अर्जांची अपेक्षा करतो. तसंच आम्ही नोकरीच्या नव्या संधींबाबत लिंक्डइनवर नियमितपणे अपडेट देत असतो.
  First published: