मुंबई, 12 सप्टेंबर: कोरोनाकाळात अनेक कंपन्या आणि अनेक क्षेत्रं डबघाईस आलेत. मात्र IT सेक्टरला (IT jobs) इतर सेहतरांच्या तुलनेत मोठा नफा मिळाला. TCS, Infosys, Wipro यांसारखाय काही कंपन्यांना मोठा फायदा झाला. त्यामुळे आता या कंपन्यांनी येणाऱ्या वर्षात मोठी पदभरती (It sector recruitment) करण्याचं निश्चित केलं आहे. मात्र इथे नोकरी मिळवण्यासाठी तुमच्याकडे स्किल्स तसंच त्यानुसार शिक्षण असणं आवश्यक आहे. तुम्ही काही महत्त्वाचे कोर्सेस पूर्ण केले असणं आवश्यक आहे. असेच काही महत्त्वाचे कोर्सेस (Important IT courses) आणि ते करण्यासाठी काही महत्वाच्या वेबसाईट्स (Top Online education websites) आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया.
Salesforce.com certification
विक्रीपासून ते मार्केटिंगपर्यंत आणि ग्राहक सेवेपर्यंत कॉर्पोरेट सेटिंगमधील अनेक विभाग ग्राहक संबंध व्यवस्थापन (CRM) प्लॅटफॉर्मवर अवलंबून असतात म्हणूनच सेल्सफोर्स हा सर्वात लोकप्रिय पर्यायांपैकी एक आहे. जर तुम्ही Salesforce.com वरून एखादा कोर्स केला असेल तर तुम्हाला मुलाखत घेताना एक चांगला दर्जा दिला जाईल आणि तुमचा प्रभाव चांगला पडेल.
हे वाचा - Infosys Reskilling: इन्फोसिसनं देशातील विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन कोर्स केले जाहीर
Hubspot’s Certification
यामध्ये SEO, ब्लॉगिंग, ईमेल मार्केटिंग आणि सोशल मीडिया, डिजिटल मार्केटिंग या नसारखे कोर्सेस आहेत. या वेबसाईटवर मार्केटिंगसाठी विशेष कोर्सेस आहेत. हे कोर्सेस केल्यानंतर तुम्हाला चांगल्या पगाराचा जॉब मुहळू शकतो तसंच तुमचा Resume स्ट्रॉंग होऊ शकतो.
Google Certifications
digital marketing, data science किंवा software engineering यासंबंधीचे अनेक कोर्सेस यावर उपलब्ध आहेत. हे कोर्से सकल्यानंतर तुम्हाला गूगके कडून सर्टिफिकेट मिळू शकतं. हे सर्टिफिकेट तुम्हाला जॉब मिळवण्यासाठी कामात येऊ शकतं. .
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Career opportunities, Jobs, Online education