मराठी बातम्या /बातम्या /करिअर /

Career Advice: 'म्युझिओलॉजी' म्हणजे नक्की आहे तरी काय? ग्रॅज्युएशननंतर करिअरची मोठी संधी

Career Advice: 'म्युझिओलॉजी' म्हणजे नक्की आहे तरी काय? ग्रॅज्युएशननंतर करिअरची मोठी संधी

म्युझिओलॉजी (career in Museology) म्हणजे नक्की काय? आणि यामध्ये करिअर कसं करणार? याबद्दल माहिती देणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया.

म्युझिओलॉजी (career in Museology) म्हणजे नक्की काय? आणि यामध्ये करिअर कसं करणार? याबद्दल माहिती देणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया.

म्युझिओलॉजी (career in Museology) म्हणजे नक्की काय? आणि यामध्ये करिअर कसं करणार? याबद्दल माहिती देणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया.

  • Published by:  Atharva Mahankal

मुंबई, 09 सप्टेंबर: दहावी किंवा बारावीनंतर नक्की कोणत्या शाखेत पदवी घ्यावी हा प्रश्न अनेकांना पडला असतो. भारतात बहुतांश विद्यार्थी या प्रश्नावर तोडगा काढत इंजिनिअरिंग (Engineering courses) किंवा कॉमर्समधील कोर्सेस (Commerce courses) करतात. मात्र जगात अशा काही भन्नाट आणि निराळ्या ब्रॅंचेस आहेत ज्यात ग्रॅज्युएशन केल्यानंतर ज्ञानात तर भर पडतेच पण सोबतच भरघोस पैसेही मिळतात. अशीच एक ब्रांच म्हणजे म्युझिओलॉजी (Museology). आता तुम्ही म्हणाला याबद्दल कधीच ऐकलं नाही. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला म्युझिओलॉजी (career in Museology) म्हणजे नक्की काय? आणि यामध्ये करिअर कसं करणार? याबद्दल माहिती देणार आहोत. चला तर मग जाणून घेऊया.

संग्रहालय किंवा संग्रहालयाच्या योग्य कार्यासाठी व्यवस्थापन, आयोजन आणि प्रशिक्षण देण्याचं शास्त्र म्हणजे म्युझिओलॉजी. यामध्ये संग्रहालय आणि त्याच्याशी निगडित सर्व गोष्टींचं व्यवस्थापन ज्ञान देण्यात येतं.  आपल्या देशात अनेक संग्रहालयं आहेत, पण आता त्याचा विस्तार आणि व्याप्ती वाढली आहे. त्यामुळे या क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांची मागणी या भागात सतत वाढत आहे. भारतात सरकारी ते खाजगी पर्यंत 700 हून अधिक संग्रहालयं आहेत. यामध्ये मोठ्या प्रमाणावर म्युझिओलॉजिस्टला मागणी आहे.

म्युझिओलॉजिस्ट नेमके करतात तरी काय?

संग्रहालयात म्युझियोलॉजिस्ट क्युरेटर म्हणून काम करू शकतात, जिथे त्यांच्याकडे संग्रहालयातील कलाकृतींचे कॅटलॉगिंग आणि योग्यरित्या आयोजन करण्याची जबाबदारी असते.  तसंच संग्रहालयाच्या वस्तूंना वेगवेगळ्या विभागांमध्ये विभागण्याची आणि त्यांच्याबद्दल सविस्तर माहिती देण्याची जबाबदारी त्यांच्यावर असते.

हे वाचा - Exam Tips: विद्यार्थ्यांनो, स्पर्धा परीक्षांची तयारी करताय? मग 'ही' पुस्तकं नक्क

काय आहेत शिक्षणाच्या संधी

जर तुम्हाला इतिहास, संवर्धन विज्ञान आणि संग्रहालय संग्रहाच्या संवर्धनात रस असेल तरच हा अभ्यासक्रम करा. या क्षेत्रात शिक्षण सुरू करण्यासाठी किमान पात्रता 12 वी आहे. तुम्ही कोणत्याही विषयातून बारावी केली असली तरी तुम्ही म्युझियोलॉजीचा कोर्स करू शकता. म्युझियोलॉजी आणि पुरातत्व मध्ये कला पदवी, म्युझियोलॉजी मध्ये बीए, पुरातत्व मध्ये बीए, म्युझियोलॉजी आणि संवर्धन मध्ये पीजी डिप्लोमा, म्युझियोलॉजी आणि भारतीय कला इतिहासात पीजी डिप्लोमा, पुरातत्व आणि म्युझियोलॉजी मध्ये अॅडव्हान्स डिप्लोमा, म्युझियोलॉजी मध्ये एमए, पुरातत्व मध्ये एमए, म्युझियोलॉजी मध्ये एमफिल आणि म्युझियोलॉजी आणि पुरातत्त्व अभ्यासक्रमातील पुरातत्व पीएचडी हे कोर्सेस करू शकता.

करिअरच्या संधी

या क्षेत्रात नोकरीचे पर्याय वाढत आहेत. सध्या देशात अशी शेकडो संग्रहालये आहेत, जिथे तुम्ही काम करू शकता. केंद्राव्यतिरिक्त, यात राज्य, जिल्हास्तरीय, खाजगी आणि ट्रस्ट प्रकारच्या संग्रहालयांचा समावेश आहे. जर तुम्हाला सरकारी क्षेत्रात काम करायचे असेल तर तुम्हाला राष्ट्रीय संग्रहालय, मौद्रिक संग्रहालय, RBI, भारतीय संग्रहालय, सालारजंग संग्रहालय मध्ये नोकरी मिळू शकते. तसंच नोकरी दरम्यान यात भरघोस पगाराची नोकरी लागू शकते.

हे आहेत टॉप कॉलेजेस

राष्ट्रीय संग्रहालय संस्था, नवी दिल्ली (राष्ट्रीय संग्रहालय संस्था, नवी दिल्ली

गुरु गोविंद सिंह इंद्रप्रस्थ विद्यापीठ, दिल्ली

स्कूल ऑफ आर्काइव्हल स्टडीज, नवी दिल्ली

म्युझियोलॉजी आणि संवर्धन केंद्र, जयपूर

कलकत्ता विद्यापीठ

First published:

Tags: Career opportunities, Tips