नवी दिल्ली, 27 ऑक्टोबर : खिळे आणि स्क्रू हे सामान्यांच्या आयुष्यातील वापराच्या वस्तू आहेत. भिंतीवर काहीही लावायचे झाल्यास यांचा वापर होतोच. मात्र, यात अनेक त्रासांचा सामनाही करावा लागतो. मात्र, इशिर वाधवा या दहावीच्या विद्यार्थ्याने आपल्या शाळेच्या प्रोजेक्टच्या माध्यमातून यावर तोडगा शोधला असून तो त्यांचा फॅमीली बिझनेसच बनला आहे.
इशिर हा मूळ भारताचा मात्र, सध्या दुबईत वास्तवात असलेला दहावीचा सोळा वर्षीय विद्यार्थी आहे. तो जेम्स अकॅडमीत शिकतो. त्याला शाळेसाठी एक प्रकल्प तयार करायचा होता. त्यात तो काहीतरी वेगळेपणा हवा होता. पण नेहमी उपयोगात असलेल्या वस्तूंचा वापर करायचा होता. शोधता शोधता त्याची नजर भिंतीवरील खिळ्यांवर आणि स्कू्रवरती गेली. त्याच्या डोक्यात ट्युब पेटली आणि यात काहीतरी करावे, असा विचार त्याने केला. त्याला अगदी सहजपणे स्कू आणि खिळे मारण्यासंबंधीच्या प्रश्नावर एक उत्तर सापडलं, असं खलिज टाइम्सच्या वृत्तात म्हटलं आहे.
हे वाचा-सांगलीच्या लेकाने घराशेजारी उभारलं आईचं मंदिर; नवरात्रौत्सवात असतो मोठा सोहळा
स्क्रू आणि खिळे हे अनेक वर्षांपासून वापरात आहेत. मात्र, भिंती खराब करणे, धुळीची समस्या, ड्रिलींगसंबधीत अपघात अशा काही समस्यांचा यात सामन्यांना सामना करावा लागत असल्याचे त्याच्या समोर होतो. याबाबत आपण आपला मोठा भाऊ अविकशी चर्चा केल्याचं त्यानी सांगितलं. इशिरचा भाऊ अविक हा अमेरिकेतील प्रूडू विद्यापीठात इंजिनिअरिंगचे शिक्षण घेत आहे. इशिर म्हणाला, ‘आम्ही दोघांनी मिळून काही अतिशय छान संकल्पना मांडल्या. खिळे, आणि स्क्रूबाबतच्या या संकल्पना भन्नाट होत्या. त्यातील एक आम्ही अंमलात आणली ती म्हणजे दोन स्टील टेप्स आणि मजबूत असे चुंबक एकत्र ठेवले की काम होतं. भिंतीवर चिकटलेल्या स्टील टेपला अल्फा टेप आणि वस्तूवर चिकटलेल्या टेपला बीटा टेप म्हणायच. भिंतीवरचं नियोडियम चुंबक वस्तूला पकडूनन ठेवेल. या प्रकल्पाला त्याने KLAPiT हे नाव दिले. दोन चुंबक एकमेकांना चिकटताना क्लॅप असा आवाज येतो म्हणून या उपकरणांच नाव क्लॅप इट असं ठेवण्यात आलं आहे. विशेष बाब म्हणजे इशिरचे वडिल सुमेश वाधवा यांना या उत्पादनातून मोठ्या व्यवसाय उभारता येऊ शकतो हे लक्षात आलं. त्यामुळे त्यांनी सध्याची गलेलठ्ठ पगाराची नोकरी सोडून या नव्या उपकरणाचा व्यवसाय करायचं ठरवलं आहे. इशिरच्या 10 वीच्या प्रकल्पातूनच त्यांना फॅमिली बिझनेस मिळाला आहे.