• Home
 • »
 • News
 • »
 • career
 • »
 • कॅन्टोन्मेंट बोर्ड कामठी नागपूर इथे नोकरीची संधी; चौथी ते बारावी पास उमेदवारांसाठी जागा

कॅन्टोन्मेंट बोर्ड कामठी नागपूर इथे नोकरीची संधी; चौथी ते बारावी पास उमेदवारांसाठी जागा

अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 ऑगस्ट 2021 असणार आहे.

 • Share this:
  कामठी (नागपूर), 01ऑगस्ट: मिलिट्री कॅन्टोन्मेंट बोर्ड कामठी नागपूर इथे लवकरच चौथी ते बारावीपर्यंत शिक्षण असलेल्या उमेदवारांसाठी पदभरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. सहाय्यक शिक्षक, सफाई कर्मचारी, पुरुष वार्ड सेवक या पदांसाठी ही भरती असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी ऑनलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 ऑगस्ट 2021 असणार आहे. या पदांसाठी भरती सहाय्यक शिक्षक (Assistant Teacher) सफाई कर्मचारी (Sweeper) पुरुष वार्ड सेवक (Male Ward Servant) Success Story: कधीकाळी रिक्षा चालवणारा विद्यार्थी IES परीक्षेत आला दुसरा शैक्षणिक पात्रता सहाय्यक शिक्षक (Assistant Teacher) - बारावी उत्तीर्ण आणि शिक्षण क्षेत्राशी निगडित परीक्षा पास असणं आवश्यक. सफाई कर्मचारी (Sweeper) - चौथी पास आवश्यक. पुरुष वार्ड सेवक (Male Ward Servant) - दहावी पास असणं आवश्यक. अर्ज करण्याची शेवटची तारीख - 31 ऑगस्ट 2021 सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी https://jobmaharashtra.com/wp-content/uploads/2021/07/Cantonment-Board-Kamptee-Bharti-2021.pdf या वेबसाईटवर जाऊ शकता. या पदभरतीसाठी https://www.canttboardrecruit.org/ या वेबसाईटवर जाऊन ऑनलाईन अप्लाय करू शकता.
  Published by:Atharva Mahankal
  First published: