मुंबई, 13 जुलै : मुंबईतल्या कंपनीने एका कँडिडेटला CEO पदाची ऑफर दिली होती. त्या कँडिडेटकडे चांगला अनुभव होता आणि क्वालिफिकेशनही होतं. पण त्याने केलेल्या एका चुकीमुळे त्याच्या CEO बनण्याच्या स्वप्नावर पाणी फेरलं गेलं.टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या एका बातमीनुसार, एक कँडिडेट CEO पदाच्या इंटर्व्ह्यूसाठी ऑफिसला चालला होता. त्याचवेळी जोरदार पाऊस सुरू झाला. भररस्त्यात पाणी साचल्यामुळे ट्रॅफिक जामही झालं. या सगळ्याला ड्रायव्हर जबाबदार नव्हता. तरीही या कँडिडेटने ड्रायव्हरशी भांडण सुरू केलं.
ऑफिसला पोहोचल्यानंतर ड्रायव्हरने या कँडिडेटची तक्रार केली. मॅनेजमेंटने त्याची तक्रार गांभिर्याने घेतली. एवढ्या छोट्याछोट्या गोष्टींवरून जो माणूस भांडणं करतो तो कंपनी कशी चालवू शकतो, असा विचार मॅनेजमेंटने केला आणि त्याची नोकरी रद्द केली.
या भरती प्रक्रियेत महत्त्वाची भूमिका निभावणाऱ्या हंट पार्टनर्स या कंपनीचे सुरेश रैना म्हणाले, CEO पदाच्या व्यक्तीवर महत्त्वाची जबाबदारी असते. तो कंपनीसमोर येणाऱ्या आव्हानांना कसा सामोरा जातो त्यावर कंपनीचं यश अवलंबून असतं. त्या व्यक्तीकडे नेतृत्वगुण असणंही आवश्यक असतं.
कंपनीमध्ये कुणाचीही भरती करताना हल्ली त्याचं पूर्ण प्रोफाइल पाहिलं जातं. नेतृत्वगुणांसोबतच त्याची लाइफस्टाइल आणि फिटनेस सारख्या गोष्टीही लक्षात घेतल्या जातात. त्यामुळे नोकरी मिळवताना या सगळ्या गोष्टींबद्दल खबरदारी घेणं महत्त्वाचं आहे, असंही त्यांनी सांगितलं.
=================================================================================================
VIDEO : धावत्या रेल्वेत चढू नका, पाहा या महिलेसोबत काय घडलं!