नवी दिल्ली, 27 जून : गेल्या दीड वर्षांपासून कोरोनानं (Corona virus) अक्षरशः थैमान घातलं आहे. यामुळे शाळा आणि कॉलेजेस (Schools and Colleges opening) तर बंद आहेत. त्यात दहावी आणि बारावी (10th and 11th exams) सोबतच अनेक महत्त्वाच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत. येत्या काही दिवसात म्हणजेच 5 जुलै ते 20 जुलैदरम्यान CA ची परीक्षा आहे. याच पार्श्वभूमीवर आता CA च्या विद्यार्थ्यांनी थेट पंप्रधान मोदींना (PM Narendra Modi) पत्र लिहून परीक्षेसंदर्भात मागणी केली आहे.
'मोदीजी, CA ची परीक्षा देणारे विद्यार्थी हे प्रामुख्यानं 18 ते 23या वयोगटातले आहेत. त्यात या सर्व विद्यार्थ्यांचं लसीकरणही झालेलं नाही. जर CA ची परीक्षा ठरलेल्या वेळेतच घेण्यात आली तर आम्हा सर्व विद्यार्थ्यांवर अन्याय होईल तसंच आमच्या कुटुंबांवरही अन्याय होईल. म्हणून CA ची परीक्षा पुढे ढकलण्यात यावी.' अशा मागणीचं पत्र विद्यार्थ्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना लिहिलं आहे.
हे वाचा - महिलांनो, भारतीय सैन्य दलात मोठी पदभरती; अप्लाय करण्यासाठी इथे करा क्लिक
'नीती आयोगाचे प्रमुख व्ही. के. पॉल यांच्या म्हणण्याप्रमाणे, जर कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला थांबवायचं असेल तर संपूर्ण लसीकरण आवश्यक आहे. मात्र CA च्या परीक्षेला बसणाऱ्या तब्बल तीन लाख विद्यार्थ्यांपैकी अनेकांना अजून लसीचा पहिला डोसही मिळालेला नाही. त्यामुळे ही परीक्षा पुढे ढकलावी' असंही या पत्रात म्हंटलं आहे.
परीक्षा रद्द करू नका पण..
'इतर परीक्षांप्रमाणे आम्ही तुम्हाला परीक्षा रद्द करा असं म्हणू इच्छित नाही मात्र आमची परीक्षा पुढे ढकलण्यात यावी इतकीच मागणी आहे. ज्यामुळे लसीकरणानंतर आम्हाला परीक्षा भयमुक्त होऊन देता यावी. देशातील सर्व विद्यार्थ्यांचं प्रेरणास्थान आणि आवडते पंतप्रधान मोदी आम्हा विद्यार्थ्यांची ही इच्छा नक्की पूर्ण करतील हीच अपेक्षा. असंही या पत्रात लिहिलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: PM Naredra Modi