मुंबई, 8 फेब्रुवारी: दी इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया (ICAI) या संस्थेतर्फे घेण्यात आलेल्या चार्टर्ड अकाउंटंट्सच्या परीक्षेचा निकाल आज (आठ फेब्रुवारी) जाहीर करण्यात आला आहे. (ICAI CA Intermediate, Foundation Result 2020) फाउंडेशन, तसंच टरमीजिएट पातळीच्या जुन्या आणि नव्या अशा दोन्ही प्रकारच्या कोर्सच्या परीक्षांचे निकाल जाहीर झाले आहेत. ICAIच्या icai.org या वेबसाइटसह तीन अधिकृत वेबसाइट्सवर हे निकाल जाहीर झाले आहेत. caiexam.icai.org, caresults.icai.org, and icai.nic.in. या तीन संकेतस्थळांवर निकाल पाहू शकता. ICAIच्या अधिकृत ट्विटर हँडलवर ही माहिती देण्यात आली आहे. या परीक्षांमध्ये गुणानुक्रमे देशभरात पहिल्या आलेल्या 50 विद्यार्थ्यांची मेरिट लिस्टही वेबसाइटवर जाहीर करण्यात आली आहे.
नोव्हेंबर 2020मध्ये या परीक्षा घेण्यात आल्या होत्या.
कसा पाहायचा आणि डाउनलोड करायचा CA RESULT?
ज्या विद्यार्थ्यांना त्यांचे निकाल ई-मेलद्वारे हवे आहेत, त्या विद्यार्थ्यांनी ऑनलाइन नोंदणी करावी, असं आवाहनही ट्विटद्वारे करण्यात आलं आहे.
Results of the Chartered Accountants Intermediate Examination (Old course & New Course) and
Foundation Examination held in November 2020 declared
Same can be accessed at the following websiteshttps://t.co/344CfPdhymhttps://t.co/sxQNhLv0uqhttps://t.co/HS8oDSRLZn
— Institute of Chartered Accountants of India - ICAI (@theicai) February 8, 2021
इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार, रिझल्ट एसएमएसद्वारेही उपलब्ध होणार आहे. इंटरमीजिएट पातळीच्या जुन्या अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांनी ‘CAIPCOLD <space> roll number’ असं टाइप करून 57575 या क्रमांकावर तो एसएमएस पाठवावा. त्यांना त्यांचा रिझल्ट त्यांच्या फोनवर एसएमएसद्वारे प्राप्त होईल. इंटरमीजिएट पातळीच्या नव्या अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांनी ‘CAFND <space> roll number’ असा एसएमएस टाइप करून 57575 या क्रमांकावर पाठवल्यास त्यांना रिझल्ट मिळेल.
ICAIने सीए अंतिम परीक्षेचे निकालही याच महिन्याच्या सुरुवातीला जाहीर केले आहेत. कोणा उमेदवाराला रिझल्टबद्दल शंका असेल, तर शंकानिरसन आणि मदतीसाठी ते ई-मेल पाठवू शकतात, असं ICAIने म्हटलं आहे. फाउंडेशन पातळीच्या विद्यार्थ्यांनी foundation_examhelpline@icai.in या ई-मेलआयडीवर ई-मेल पाठवावा. अंतिम परीक्षेच्या विद्यार्थ्यांनी final_examhelpline@icai.in या ई-मेलवर आपल्या शंका विचाराव्यात, तर इंटरमीजिएट पातळीच्या विद्यार्थ्यांनी ntermediate_examhelpline@icai.in या ई-मेल आयडीवर ई-मेल पाठवून शंका विचाराव्यात, असं संस्थेनं म्हटलं आहे.
रिझल्ट पाहण्यासाठी वेबसाइट्स : icaiexam.icai.org, caresults.icai.org, and icai.nic.in.
हिंदुस्तान टाइम्सच्या बातमीनुसार, विद्यार्थी तीन अधिकृत वेबसाइट्सपैकी कोणत्याही एका वेबसाइटवर जाऊन आपला रिझल्ट पाहू शकतात. एखाद्या वेबसाइटवर जास्त ट्रॅफिक आल्यामुळे साइट डाउन झाली, तर दुसऱ्या वेबसाइटवर जाऊन पाहता येऊ शकेल.