मराठी बातम्या /बातम्या /करिअर /BYJU'S Young Genius: कला आणि बुद्धिमत्तेतले जीनिअस लिडियन नादस्वरम आणि मेघाली मलाबिका यांना भेटा येत्या शनिवारी

BYJU'S Young Genius: कला आणि बुद्धिमत्तेतले जीनिअस लिडियन नादस्वरम आणि मेघाली मलाबिका यांना भेटा येत्या शनिवारी

BYJU’S Young Genius च्या पहिल्या भागामध्ये पियानोवर जादूई बोटं फिरवणारा 15 वर्षांचा लिडियन नादस्वरम (Lydian Nadhaswaram)आणि अद्भुत स्मरणशक्तीचं वरदान लाभलेली 14 वर्षीय मेघाली मलाबिका (Meghali Malabika) या दोन मुलांच्या कौशल्याचं सादरीकरण होणार आहे.

BYJU’S Young Genius च्या पहिल्या भागामध्ये पियानोवर जादूई बोटं फिरवणारा 15 वर्षांचा लिडियन नादस्वरम (Lydian Nadhaswaram)आणि अद्भुत स्मरणशक्तीचं वरदान लाभलेली 14 वर्षीय मेघाली मलाबिका (Meghali Malabika) या दोन मुलांच्या कौशल्याचं सादरीकरण होणार आहे.

BYJU’S Young Genius च्या पहिल्या भागामध्ये पियानोवर जादूई बोटं फिरवणारा 15 वर्षांचा लिडियन नादस्वरम (Lydian Nadhaswaram)आणि अद्भुत स्मरणशक्तीचं वरदान लाभलेली 14 वर्षीय मेघाली मलाबिका (Meghali Malabika) या दोन मुलांच्या कौशल्याचं सादरीकरण होणार आहे.

पुढे वाचा ...

    नवी दिल्ली, 15 जानेवारी:  ‘बायजू’ज यंग जीनियस’च्या (BYJU’S Young Genius) पहिल्या भागामध्ये कला क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणारा 15 वर्षांचा लिडियन नादस्वरम (Lydian Nadhaswaram)आणि अद्भुत स्मरणशक्ती आणि उच्चतम IQ चं वरदान लाभलेली 14 वर्षीय मेघाली मलाबिका (Meghali Malabika) या दोन मुलांच्या अद्भुत कौशल्याचं सादरीकरण होणार आहे. प्रख्यात गायक शंकर महादेवन (Shankar Mahadevan) हे त्यांना मार्गदर्शन करत आहेत.

    लिडियन प्रति मिनिट 190 बीट्सच्या या वेगानं पियानो (Piyano) वाजवू शकतो. डोळ्यावर पट्टी बांधूनही तो लीलया पियानोवरून बोटं फिरवतो.  2019 मध्ये त्याला जगातील सर्वोत्कृष्ट पियानोवादक घोषित करण्यात आलं होतं. या विजयानंतर तो प्रसिद्ध ‘द एलेन डीजेनेरिस शो’मध्येदेखील (The Ellen DeGeneres Show) सहभागी झाला होता.

    ‘जगातील एका सर्वांत प्रतिष्ठित टॉक शोमध्ये सहभागी होण्याचं माझं स्वप्न यामुळं साकार झालं. माझे वडील मला नेहमी एकदिवस आपण या शोमध्ये येऊ’ असं सांगायचे. ते स्वप्न प्रत्यक्षात आलं, अशी भावना लिडियन यानं व्यक्त केली होती. नुकतचं त्यानं ‘अटकन चटकन’ या चित्रपटात काम केलं असून, तो सध्या मोहनलाल दिग्दर्शित ‘बॅरोज’ (Baroz)या थ्रीडी चित्रपटासाठी संगीतरचना तयार करत आहे.

    “मी स्वत:च्याच रचनांवर काम करत असून, चित्रपटात नेमकं काय घडत आहे हे मला जाणून घ्यायचे होते. कलाकारांनी दर्शवलेल्या भावना, संगीतात कशा आणायच्या यासाठी मला हा प्रोजेक्ट करणं खूप महत्वाचं ठरलं. यामुळं माझ्या ज्ञानात अधिक भर पडली,’ असं लिडियन यानं सांगितलं.

    लिडियनचे वडील म्हणाले, ‘अनेक प्रकल्पांना आम्ही नकार दिला कारण त्याच्या वाढीच्या वयात कोणतीही धावपळ, ताण असू नये असं आम्हाला वाटतं. एकदा ‘बॅरोज’ संपल्यावर तो पुढच्या प्रकल्पाबद्दल विचार करू शकेल. त्यानं प्रकल्पांमागं धावावं, अशी माझी मुळीच इच्छा नाही.’

    ‘माझी मुलगीही एक संगीतकार आहे. जेव्हा ते चुका करतात तेव्हा मी फक्त सकारात्मकतेवर लक्ष केंद्रित करतो. त्यामुळं  मुलांवर ताण येत नाही,’ असंही लिडियनच्या वडीलांनी सांगितलं.

    या शोमध्ये सहभागी होणारी मेघाली मालाबिका (Meghali Malabika) हिच्या नावावर चार विक्रम (Records) असून, इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये (India Book of Records) या चारही विक्रमांची नोंद आहे. ‘गूगल गर्ल ऑफ इंडिया’ (Google Girl Of India)अशीही तिची ओळख आहे.

    मेघाली म्हणाली, ‘मला गुगल गर्ल’ होण्यासाठी माझ्या वडिलांनी मदत केली, त्याबद्दल मी कृतज्ञ आहे. भूगोला व्यतिरिक्त, मला व्हायोलिनच्या एकेरी स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकायचे आहे. मला संगीतात  काहीतरी बक्षीस मिळवायचं आहे. लॉकडाउनच्या कालावधीचा तिनं कसा उपयोग केला हे देखील तिनं सांगितलं. ती म्हणाली, ‘मी कादंबर्‍या विकत घेऊन वाचल्या तर काही ऑनलाईन वाचल्या. मी नेहमी  असेच करते. मला कादंबऱ्या वाचायची खूप आवड आहे. नंतर, माझे ऑनलाइन वर्ग सुरू झाले, त्यामुळं बराचसा वेळ मी अभ्यासात घालवला. उर्वरित वेळेत, मी व्हायोलिन वाजविले आणि पोट्रेट काढली.’

    ती पुढे म्हणाली, ‘मला अंतराळ वैज्ञानिक व्हायचे आहे. मला स्वत: च्या डोळ्यांनी अंतराळविश्व  पाहायचं आहे.’

    मेघालीच्या वडिलांनी सांगितलं की, ‘फिफा वर्ल्ड कप 2010 दरम्यान शकीरा स्टेडियममध्ये नाचत होती. त्यावेळी मेघाली फक्त चार वर्षांची होती आणि तिला नृत्य करायला खूप आवडत होतं म्हणून तिने मला सांगितलं की, ‘मला शकीराला भेटायचे आहे’. मी म्हणालो की, ती भारताची नाही, तर कोलंबियाची आहे. ते ऐकून तिने मला ‘कोलंबिया कोठे आहे’ असे प्रश्न विचारण्यास सुरवात केली, म्हणून मी ते तिला नकाशावर दाखविले. नंतर, काही महिन्यांत जगाच्या नकाशावर तिनं जे काही पाहिले होतं ते सगळं तिला जसंच्या तसं आठवत असल्याचं आमच्या लक्षात आलं.’

    ‘बायजू’ज यंग जीनियसचा पहिला भाग 16 जानेवारी रोजी प्रसारित होईल. प्रत्येक भाग प्रत्येक शनिवारी नेटवर्क 18 च्या 18 वाहिन्यांवरून प्रसारित केला जाईल आणि रविवारी पुन्हा ते भाग प्रसारित केले जातील.

    First published:
    top videos