Home /News /career /

तीन इंजिनीअर तरुण ठरले 'सेहत साथी'; स्टार्टअपद्वारे आरोग्य क्षेत्रात उत्तम कामगिरी

तीन इंजिनीअर तरुण ठरले 'सेहत साथी'; स्टार्टअपद्वारे आरोग्य क्षेत्रात उत्तम कामगिरी

Medical concepts, safe support

Medical concepts, safe support

देशाची आरोग्य यंत्रणा कमजोर याची आपल्याला कल्पना होतीच; मात्र ती कोरोनाच्या काळात अधिक दृढ झाली. या पार्श्वभूमीवर आरोग्य यंत्रणा मजबूत करण्याच्या दृष्टीने तीन इंजिनीअर तरुणांनी 2017मध्ये सुरू केलेल्या मेडकॉर्डस् या स्टार्टअपचं वेगळेपण डोळ्यांत भरतं आणि अशा आणखी किती तरी उद्योगांची गरज अधोरेखित होते.

पुढे वाचा ...
कोटा, 18 मार्च : देशाची आरोग्य यंत्रणा कमजोर याची आपल्याला कल्पना होतीच; मात्र ती कोरोनाच्या काळात अधिक दृढ झाली. या पार्श्वभूमीवर आरोग्य यंत्रणा मजबूत करण्याच्या दृष्टीने तीन इंजिनीअर तरुणांनी 2017मध्ये सुरू केलेल्या मेडकॉर्डस् या स्टार्टअपचं वेगळेपण डोळ्यांत भरतं आणि अशा आणखी किती तरी उद्योगांची गरज अधोरेखित होते. श्रेयांस मेहता, निखिल बाहेती आणि सईदा धनावत (Shreyans Mehta, Nikhil Baheti, Saeda Dhanawat) अशी राजस्थानातल्या कोटा शहरातल्या त्या तीन इंजिनीअर तरुणांची नावं आहेत. ग्रामीण भागातल्या, तसंच छोट्या शहरांतल्या रुग्णांना चांगल्या आरोग्य सुविधा उपलब्ध करून देणं हे त्यांचं उद्दिष्ट आहे. हे स्टार्टअप ग्रामीण भागातल्या रुग्णांना डॉक्टर्सच्या व्यापक नेटवर्कशी (Doctors) जोडून देतं. तसंच, स्थानिक औषध विक्रेत्यांना (Local Pharmacist) डिजिटल माध्यमावर आणून त्यांच्या व्यापारवृद्धीला हातभार लावतं आहे. अशा दोन्ही बाजूंनी हे स्टार्टअप उत्तम काम करतं आहे. फायनान्शियल एक्स्प्रेसने त्यांच्या या उपक्रमाबद्दलचं वृत्त दिलं आहे. कंपनीचा सीईओ श्रेयांस मेहता याने या कंपनीची सुरुवात कशी झाली, याबद्दल सांगितलं, 'आम्ही तिघेही इंजिनीअर आहोत. मी डॉक्टर्सच्या परिवारातला आहे. तसंच, निखिल हा माझा मित्र हॉस्पिटलजवळ राहतो. त्यामुळे रुग्णांच्या समस्या आम्ही रोज बघायचो. त्यातून आम्ही तिघांनी एकत्र येऊन चर्चा केली आणि हा मार्ग दिसला. मे 2017मध्ये आम्ही राजस्थानातल्या कोटा शहरातून काम सुरू केलं. आरोग्य यंत्रणेतल्या कमतरता शोधण्यासाठी आम्ही राजस्थान, बिहार, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश अशा राज्यांतल्या 800हून अधिक ठिकाणी फिरलो. त्यानंतर आम्ही पुढचं कार्य सुरू केलं. आमच्या आयु (Ayu) या अॅपद्वारे रुग्णांसाठी डॉक्टर्सचं नेटवर्क उपलब्ध आहे. 5000 हून अधिक स्पेशालिस्ट डॉक्टर्सचं एक नेटवर्क उभारण्यात आलं आहे. त्याद्वारे 13हून अधिक राज्यांतल्या 30 लाखांहून अधिक कुटुंबांपर्यंत आम्ही पोहोचलो आहोत. ज्यांच्याकडे स्मार्टफोन नाही त्यांना टेलिमेडिसीनद्वारे फोनवरून सल्ला घेता येऊ शकतो. सेहत साथी अॅपवर 25 हजारांहून अधिक मेडिकल स्टोअर्स जोडलेली आहेत. त्यावरून एका क्लिकवर औषधं मागवता येतात. मेडिकल स्टोअर्सनाही व्यापारवृद्धीसाठी याचा उपयोग होतो,' असं श्रेयांसने सांगितलं. 'डॉक्टर म्हणून प्रॅक्टिस करताना माझ्या वडिलांना येत असलेल्या अनुभवांचा मला उपयोग झाला. त्यामुळे समस्या कळत गेल्या. ग्रामीण भागातल्या रुग्णांच्या रेकॉर्डचं डिजिटायझेशन सुरू केलं आणि ग्रामीण भागात टेलिकन्सल्टेशन (Teleconsultaion) सुविधाही सुरू केली. त्या वेळी छोट्या शहरांत स्मार्टफोन वापरणाऱ्यांची संख्या कमी होती; मात्र नंतरच्या काळात त्यात वाढ होत गेली आणि आमचं काम सोपं झालं. आयु या अॅपबरोबरच आम्ही वेब व्हर्जनही उपलब्ध आहे,' असंही तो म्हणाला. वॉटरब्रिज, इन्फोएज, असटार्क, राजस्थान व्हेंचर कॅपिटल फंड आदींच्या माध्यमातून आतापर्यंत 40 लाखांचा निधी यासाठी गोळा करण्यात आला आहे. येत्या तीन वर्षांत पाच कोटीहून अधिक लोकांपर्यंत पोहोचण्याच्या दृष्टीने निधी उभारण्याचं त्यांचं नियोजन सुरू आहे. गरजू रुग्णांपर्यंत जास्तीत जास्त चाळीस मिनिटांत डॉक्टर्स आणि औषधांची सेवा पोहोचवली जाणं, हे आपलं वैशिष्ट्य असल्याचं श्रेयांसने सांगितलं. एवढी वेगवान सेवा अन्य कोणाचीही नसल्याचंही त्याने अभिमानाने नमूद केलं. रोज पाच हजार लोक आपल्या या व्यासपीठाशी जोडले जात असल्याचंही त्याने सांगितलं. 'आय अॅप अँड्रॉइड युझर्ससाठी मोफत आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यासाठी आठवड्याचं प्राथमिक शुल्क केवळ 99 ते 120 रुपये आहे. एका क्लिकवर रुग्ण डॉक्टरांपर्यंत पोहोचू शकतात. आयु कार्डद्वारे वार्षिक सदस्यत्व देण्याची योजना आहे. तसंच, आरोग्य विम्यासह आरोग्याशी संबंधित अन्य गोष्टींची माहिती ब्लॉग आणि व्हिडिओद्वारे दिली जाते,' अशी माहिती श्रेयांसने दिली. (हे वाचा: मार्च एण्डिंग आलं... ऑफिसमध्ये जाणारे नोकरदार नसाल तरी पाहाच हा मजेदार VIDEO ) सेहत साथी अॅप (Sehat Sathi App) आतापर्यंत 8 लाख 68 हजार जणांनी डाउनलोड केलं आहे. या अॅपवर मेडिकल स्टोअर्सना आपली नोंदणी करून औषधविक्री करता येते. त्यांच्यासोबत रेव्हेन्यू शेअरिंगचं मॉडेल उभारण्यात आलं आहे. या माध्यमातून डिलिव्हरी एजंट्सनाही रोजगार मिळतो. राजस्थान सरकारने आयु आणि सेहत साथी अॅपसोबत भागीदारी केली आहे. भिलवाडामध्ये कोरोनाचा प्रसार फारसा न होण्यामध्ये 'मेडकॉर्डस्'चं कार्य महत्त्वाचं होतं. अधिकारीही आयु अॅपच्या मदतीने रुग्णांना मदत करतात. फार्मको, तत्वन ई-क्लिनिक, वोनड्रॅक्स, पोर्टिया मेडिकल, लायब्रेट, डॉक्सअॅप अशी अनेक स्टार्टअप्स या क्षेत्रात कार्यरत आहेत, अशी माहितीही श्रेयांसने दिली.
First published:

Tags: Business News, Career, Rajsthan

पुढील बातम्या