मराठी बातम्या /बातम्या /करिअर /

Breaking: सार्वजनिक आरोग्य विभाग भरती परीक्षेसंदर्भात मोठी बातमी; 'या' उमेदवारांसाठी पुन्हा होणार परीक्षा

Breaking: सार्वजनिक आरोग्य विभाग भरती परीक्षेसंदर्भात मोठी बातमी; 'या' उमेदवारांसाठी पुन्हा होणार परीक्षा

परीक्षेत काही उमेदवारांना चुकीच्या प्रश्नपत्रिका देण्यात आल्या होत्या. त्यामुळे घोळ झाला होता. मात्र आता यावर तोडगा काढण्यात आला आहे.

परीक्षेत काही उमेदवारांना चुकीच्या प्रश्नपत्रिका देण्यात आल्या होत्या. त्यामुळे घोळ झाला होता. मात्र आता यावर तोडगा काढण्यात आला आहे.

परीक्षेत काही उमेदवारांना चुकीच्या प्रश्नपत्रिका देण्यात आल्या होत्या. त्यामुळे घोळ झाला होता. मात्र आता यावर तोडगा काढण्यात आला आहे.

  • Published by:  Atharva Mahankal

मुंबई, 24 नोव्हेंबर: गेल्या काही महिन्यांपासून सार्वजनिक आरोग्य विभागात होणाऱ्या भरतीबाबत (Maharashtra health department recruitment 2021) अनेक घोळ सुरु होते. कधी कॉलेजचा आणि सेंटर्सचा घोळ तर कधी उमेदवारांच्या हॉल तिकिट्सचा घोळ. कोणत्या ना कोणत्या कारणामुळे ही परीक्षा पुढे ढकलण्यात येत होती. मात्र ही परीक्षा अखेर पार पडली. दुष्कळात तेरावा महिना म्हणत याही परीक्षेत काही उमेदवारांना चुकीच्या प्रश्नपत्रिका देण्यात आल्या होत्या. त्यामुळे घोळ झाला होता. मात्र आता यावर तोडगा (reexam of students for maharashtra health department job) काढण्यात आला आहे.

सार्वजनिक आरोग्य विभाग अंतर्गत गट-क (Maharashtra health department Exam group C) संवर्गातील पदे भरण्यासाठीचे मे.न्यास कम्युनिकेशन प्रा.लि. यांचेमार्फत दिनांक 24 ऑक्टोबर रोजी लेखी परिक्षा घेण्यात आली. या परिक्षेदरम्यान काही उमेदवारांना चुकीचे प्रश्‍नपत्रिका देण्यात आल्याचं निर्दशनास आलं होतं. त्यामुळे मे.न्यास कम्युनिकेशन यांनी उमेदवारांनी दिलेला परिक्षेचा संवर्ग आणि प्रश्‍नपत्रिका क्रमांकानुसार चुकीची प्रश्‍नपत्रिका प्राप्त झालेल्या उमेदवारांची यादी सादर करण्याचं कळवण्यात आलं होतं. त्यानुसार आता हे यादी प्राप्त झाली असून अशा उमेदवारांची परीक्षा परत घेण्यात येणार आहे. शासनानं परिपत्रक काढून याबाबत निवेदन सादर केलं आहे.

ज्या उमेदवारांना चुकीची प्रश्नपत्रिका देण्यात आली होती त्याच उमेदवारांची पुन्हा परीक्षा होणार आहे. एकूण 589 उमेदवारांची होणार गट क ची परीक्षा पुन्हा होणार आहे. आरोग्य संचालिका डॉ अर्चना पाटील यांनी याबद्दलची माहिती माहिती दिली आहे.

या तारखेला होणार परीक्षा

ज्या उमेदवारांना चुकीची प्रश्नपत्रिका देण्यात आली होती त्याच उमेदवारांची पुन्हा परीक्षा दिनांक 28 नोव्हेंबर 2021 ला पुणे, लातूर, अकोला आणि नाशिक या जिल्ह्यांमध्ये घेण्यात येणार आहे अशी माहिती देण्यात आली आहे.

असं मिळणार प्रवेशपत्र

ज्या उमेदवारांना चुकीची प्रश्नपत्रिका मिळाली होती अशा विद्यार्थ्यांची यादी तयार करण्यात आली आहे.तसंच त्यांचे नोंदणीकृत ईमेल आय.डी. आणि व्हॉटस-अप मोबाईलवर प्रवेश पत्र पाठवून देण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे अशी माहिती आरोग्य संचालिका डॉ अर्चना पाटील यांनी दिली आहे.

First published:

Tags: Career, Maharashtra News, महाराष्ट्र