• Home
 • »
 • News
 • »
 • career
 • »
 • BREAKING : 10 वी बोर्डाची वेबसाईट हॅक? राज्य सरकारने दिला महत्त्वपूर्ण आदेश

BREAKING : 10 वी बोर्डाची वेबसाईट हॅक? राज्य सरकारने दिला महत्त्वपूर्ण आदेश

शिक्षण विभागाकडून 10 वीची वेबसाईट हॅक झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

 • Share this:
  मुंबई, 16 जुलै : आज दहावीचा निकाल जाहीर (Maharashtra 10th result) झाला आहे. http: //result.mh-ssc.ac.in आणि mahahssc board.in या वेबसाईटवर वर निकाल जाहीर करण्यात येत होता. मात्र आता वेबसाईटचं क्रॅश (SSC website crash) झाल्याची माहिती समोर आल्यानंतर विद्यार्थ्यांना अडचणीचा सामना करावा लागला. दरम्यान नुकत्यात हाती आलेल्या माहितीनुसार, 10 वी बोर्डाची वेबसाइट हॅक झाली का? याबाबत तपास करण्यासाठी राज्य सरकारने चौकशी समिती नेमली आहे. वेबसाईट हॅक झाल्याचा संशय शिक्षण विभागाकडून व्यक्त केला जात आहेे. त्यासाठी यावर अधिक तपास करण्यासाठी राज्य सरकारने चौकशी समिती नेमली असून समिती आपला अहवाल 15 दिवसात देणार आहे. (10th Board Website Hacked? Important orders issued by the state government) हे ही वाचा-अखेर दहावीचा निकाल लागला; कधी लागणार बारावीचा निकाल; जाणून घ्या गेल्या 7 तासानंतर वेबसाईट पूर्वपदार येत आहे. आता 2 लाख मुलांचे मार्कशीट डाउनलोड झाले असून हळू हळू परिस्थिती सुधारत असल्याचं सांगितलं जात आहे. या वर्षीचा निकाल परीक्षेशिवाय विशेष मूल्यांकन पद्धतीनं लावण्यात आला आहे. त्यामुळे सर्व विद्यार्थी किती गुण मिळणार या चिंतेत आहेत. त्यात सर्व विभागीय मंडळातून नियमित विद्यार्थीनींचा निकाल 99.96% असून विद्यार्थ्यांचा निकाल 99.94 % आहे. म्हणजेच विद्यार्थीनींच्या निकालाची टक्केवारी विद्यार्थ्यांपेक्षा 0.02% ने जास्त आहे. त्यामुळे या वर्षीचा निकाल नेहमींपेक्षा चार टक्क्यांनी अधिक असल्याची माहिती देण्यात आली आहे. मात्र नेहमीप्रमाणेच यंदाही अनेक विद्यार्थ्यांना नव्वद टक्क्यांच्या वर गुण मिळाले आहेत. तर शेकडो विद्यार्थ्यांना 100% मिळाले आहेत अशी माहिती शालेय शिक्षण मंडळाकडून देण्यात आली आहे.
  Published by:Meenal Gangurde
  First published: