मुंबई, 1 नोव्हेंबर : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परिक्षा ही राज्यातील सर्वात कठीण परिक्षा मानली जाते. लाखो विद्यार्थी या परिक्षेला बसतात. मात्र, मोजकेच विद्यार्थ्यांना त्यात यश मिळते. या एमपीएससी परिक्षेसंदर्भातच मोठी बातमी समोर आली आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे उमेदवारी दिलेल्या 111 उमेदवारांना नियुक्ती पत्र देण्यास मुंबई उच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. आज यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये या उमेदवारांना उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते नियुक्तीपत्र दिलं जाणार होतं. मात्र, नियुक्ती पत्र देण्याविरोधात तातडीची याचिका दाखल केलेल्या तीन EWS उमेदवारांना उच्च न्यायालयाने दिलासा दिला आहे.
यानंतर सर्वसाधारण प्रवर्गातून उमेदवारी अर्ज भरलेल्या उमेदवारांना EWS प्रवर्गातून नियुक्तीपत्र देण्यास न्यायालयाने स्थगिती दिली आहे. मुख्य न्यायमूर्ती दिपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती अभय आहुजा यांच्या खंडपीठापुढे आज संध्याकाळी तातडीची सुनावणी झाली. त्यात ही स्थगिती देण्यात आली.
हेही वाचा - MPSC Recruitment: थेट अधिकारी होण्याची संधी सोडू नका; तब्बल 623 जागांसाठी अवघे दोन दिवस शिल्लक
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून 1143 जागा भरण्यात आल्या आहेत. मात्र, त्यापैकी 111 नियुक्त्यांवर हायकोर्टानी स्थगिती दिली आहे. सर्वसाधारण प्रवर्गातून उमेदवारी अर्ज भरलेल्या उमेदवारांना EWS प्रवर्गातून हायकोर्टाच्या स्थगितीमुळे आता 111 उमेदवारांना नियुक्तीपत्र देता येणार नाही.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Career, Exam, Mpsc examination, Mumbai high court