मराठी बातम्या /बातम्या /करिअर /

मि. परफेक्शनिस्ट आमिर खानची लेक इरा खानला हवेत इंटर्न्स; काय आहे काम आणि किती पगार पाहा

मि. परफेक्शनिस्ट आमिर खानची लेक इरा खानला हवेत इंटर्न्स; काय आहे काम आणि किती पगार पाहा

आमिर खानची (Aamir khan) मुलगी इरा खानसोबत (Ira khan) काम करण्यास तुम्ही इच्छुक आहात का?

आमिर खानची (Aamir khan) मुलगी इरा खानसोबत (Ira khan) काम करण्यास तुम्ही इच्छुक आहात का?

आमिर खानची (Aamir khan) मुलगी इरा खानसोबत (Ira khan) काम करण्यास तुम्ही इच्छुक आहात का?

    मुंबई, 21 मार्च :  मि.परफेक्शनिस्ट आमिर खानची (Aamir khan) मुलगी इरा खान (Ira khan) नेहमीच चर्चेत असते. आजही ती एका खास कारणासाठी चर्चेत आली आहे. इरा खानने मानसिक आजारी असलेल्या लोकांची मदत करण्यासाठी एक मार्ग काढला आहे. आणि यांतर्गत ती 25 जणांची इंटर्न म्हणून नेमणूक करणार आहे. त्यासाठी ती त्यांना आकर्षक असं वेतनसुद्धा देणार आहे. नुकताच इरा खानने आपल्या इन्स्टाग्रामवर एक पोस्ट करत याबद्दल माहिती दिली होती. त्यात तिनं या नोकरीबद्दल पूर्ण माहिती दिली होती. हा जॉब कधी सुरु होणार, कोणते लोक यासाठी इंटरव्यूव्ह देऊ शकतात. अशी सगळी माहिती तिनं आपल्या पोस्ट मध्ये लिहिली. या पोस्टमध्ये इरानं म्हटलं आहे, तिला 25 उमेदवारांची गरज आहे. जे लोक मनोरुग्नांशी बोलू शकतात. या कामात ज्यांना रुची आहे. असे लोक मला हवे आहेत. ही एका महिन्याची इंटरर्नशिप असणार आहे. यासाठी उमेदवारांना 5 हजार रुपये देण्यात येतील. त्याचबरोबर हे उमेदवार वेगवेगळ्या भाषेचे, वेगवेगळ्या प्रांताचे असावेत. कारण हे लोक जर वेगवेगळ्या भाषेचे असतील. तर त्यांना विविध भाषिक रुग्णांना सहकार्य करण्यास सोपं जाईल. यामध्ये उमेदवारांना त्या मनोरुग्णांना फोन करून, त्यांच्याशी संवाद साधावा लागणार आहे. तसेच इमेलद्वारे त्यांच्या संपर्कात रहाव लागणार आहे. कमीत कमी यासाठी 8 तास द्यावे लागतील. हे वाचा: आता मी फाटलेलेच कपडे घालणार’; Ripped jeans वादावर कट्टपाची मुलगी संतापली मनोरुग्ण असणाऱ्या लोकांना यातून बाहेर काढण्यासाठी, इरानं खूप चांगलं पाऊल उचललं आहे. सर्वच माध्यमातून इराचं मोठं कौतुक होत आहे. याआधी इरानं आपण स्वतः डिप्रेशनला बळी पडल्याचं सांगितलं होतं. त्याचबरोबर 4 वर्ष तिनं यासाठी औषधोपचार घेतल्याचंही सांगितलं होतं. त्यामुळे तिनं अशा लोकांसाठी पुढाकार घ्यायचा निर्णय घेतला आहे. गेली वर्षभर देशभरात कोरोनासदृश्य परिस्थिती आहे. याकाळात लॉकडाऊनमुळे अनेकांना विविध अडचणीचा सामना करावा लागला आहे. त्यामुळे लोक मानसिकरित्या नकरात्मक झाले आहेत. मानसिकरीत्या दुबळे झाले आहेत. यामुळे त्यांची मदत करण्याच्या हेतूनं इरानं हे पाऊल उचललं आहे. हे वाचा - करीनाचा मुलगा झाला एक महिन्याचा; सैफच्या बहिणीनं शेअर केला PHOTO इरा ही आमिर खान आणि तिची पहिली पत्नी रीना दत्ता यांची मुलगी आहे. इराही जरी अजून चित्रपटांपासून दूर असली तरीसुद्धा ती एखाद्या अभिनेत्री इतकीच चर्चेत असते.
    Published by:Aiman Desai
    First published:

    Tags: Aamir khan, Job, Mental health

    पुढील बातम्या