मुंबई, 6 एप्रिल: कोरोनामुळे गेल्या दोन वर्षांपासून सर्व शाळा आणि कॉलेजेस बंद होते. त्यामुळे विद्यार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीनं शिक्षण (Online Education) देण्यात येत होतं. गेल्या वर्षी बोर्डाच्या परीक्षाही (Board Exam Result) करण्यात आल्या होत्या. त्यानंतर बोर्डाच्या विद्यार्थ्यांचा निकाल विशेष मूल्यांकन पद्धतीनं लावण्यात आला होता. यंदा बोर्डाच्या परीक्षा ऑफलाईन पद्धतीनं (Offline Board Exams) घेण्यात आल्या आहेत. मात्र बोर्डाच्या परीक्षांचा निकाल नेहमीपेक्षा उशिरा (Board Result may declare late in MH) जाहीर होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
एप्रिल महिना सुरु आहे त्यामुळे देशभरातील अनेक राज्यांमध्ये दहावी आणि बारावीच्या बोर्डाच्या परीक्षा (Board Exams) सुरु आहेत. तर काही राज्यांमध्ये बोर्डाच्या परीक्षा होऊन गेल्या आहेत. आता मात्र विद्यार्थी निकालाची (Board exam Results 2022) प्रतीक्षा करत आहेत. महाराष्ट्रात शिक्षण ऑनलाईन झालं मात्र परीक्षा ऑफलाईन पद्धतीनं घेण्यात आल्यामुळे अनेक विद्यार्थी नाराजही होते. ऑफलाईन परीक्षा रद्द करण्यात याव्यात म्हणून काही विद्यार्थ्यांनी आंदोलनही केलं होतं. मात्र यानंतरही राज्यात बोर्डाच्या परीक्षा ऑफलाईन पद्धतीनं घेण्यात आल्यात.
मोठी बातमी! राज्यातील युनिव्हर्सिटी कॅम्पस पुन्हा गजबजणार; सर्व कॉलेजेस ऑफलाईन पद्धतीनं सुरु होणार
राज्यात बोर्डाच्या परीक्षा या दरवर्षीच्या तुलनेत उशिरा घेण्यात आल्यात. दहावी आणि बारावीच्या बोर्डाच्या परीक्षा या साधारतः नेहमीपेक्षा काही दिवस उशिरा सुरु झाल्या. त्यात CBSE टर्म दोन ही परीक्षा अजूनही घेण्यात आलेली नाही. त्यामुळे यंदा बोर्डाच्या ऑफलाईन परीक्षांचे निकाल हे उशिरा जाहीर होण्याची शक्यता आहे.
90% पेपर्स तपासून पूर्ण पण...
उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार 10 जून पूर्वी दहावीचा आणि 15 जूनपुर्वी बारावीचा निकाल लागणं अपेक्षित आहे. म्हणूनच राज्य महामंडळाच्या अध्यक्षांनी दहावी आणि बारावीचे पेपर तपासणीबाबत आढावा घेतला. या आढाव्यात औरंगाबाद विभाग वगळता सर्वंच मंडळाचे तब्बल 90% पेपर तपासून झाल्याचं सांगण्यात आलं आहे. त्यामुळे इतर मंडळांच्या तुलनेत औरंगाबाद विभाग हा मागे आहे असं मंडळांच्या अध्यक्षांचं म्हणणं आहे. म्हणूनच यंदा निकाल उशिरा (Reason behind late results of board exams) लागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
विद्यार्थ्यांनो, बोर्डाच्या निकालाचं अजिबात टेन्शन घेऊ नका; असे राहा Stress Free
औरंगाबाद विभाग हा पेपर तपासणी करण्यात सर्व विभागाच्या मागे आहे. त्यामुळे जे मुख्यध्यापक शिक्षांकडून पेपर मुदतीच्या आतमध्ये तपासून घेणार नाहीत अशा मुख्याध्यापकांवर आणि शाळांवर कठोर कारवाई करण्याचा इशारा बोर्डानं दिला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.