• Home
  • »
  • News
  • »
  • career
  • »
  • BMC Recruitment: बृहन्मुंबई महानगरपालिका इथे 1 लाख 25 हजार रुपये पगाराची नोकरी; 'या' पदांसाठी करा अर्ज

BMC Recruitment: बृहन्मुंबई महानगरपालिका इथे 1 लाख 25 हजार रुपये पगाराची नोकरी; 'या' पदांसाठी करा अर्ज

पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 नोव्हेंबर 2021 असणार आहे.

  • Share this:
    मुंबई, 28 ऑक्टोबर: बृहन्मुंबई महानगरपालिका (Brihanmumbai Municipal Corporation) इथे लवकरच काही पदांसाठी नोकरीची संधी उपलब्ध होणार आहे. यासाठीची अधिसूचना (Brihan Mumbai Mahanagarpalika (MCGM) Recruitment 2021) जारी करण्यात आली आहे. कनिष्ठ सल्लागार भूलतज्ञ या पदांसाठी ही भरती (BMC Recruitment 2021) असणार आहे. पात्र उमेदवारांनी यासाठी दिलेल्या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीनं अर्ज करायचे आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 नोव्हेंबर 2021 असणार आहे. या पदांसाठी भरती कनिष्ठ सल्लागार भूलतज्ञ (Junior Consultants Anesthetist) - एकूण जागा 04 शैक्षणिक पात्रता आणि अनुभव कनिष्ठ सल्लागार भूलतज्ञ (Junior Consultants Anesthetist) - या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी MD, DNB, FCPS किंवा मेडिकल क्षेत्राशी निगडित पदव्युत्तर डिग्री घेतली असणं आवश्यक आहे. तसंच उमेदवारांना तीन वर्षांचा अनुभव असणंही आवश्यक आहे. वयोमर्यादा या पदभरतीसाठी उमेदवाराचं वय हे 45 वर्षांपेक्षा कमी असणं आवश्यक आहे. इतका मिळणार पगार डिग्री किंवा पदव्युत्तर उमेदवारांसाठी - 1.25 लाख रुपये प्रतिमहिना डिप्लोमा उमेदवारांसाठी - 1 लाख रुपये प्रतिमहिना Mumbai Recruitment: आरोग्य विभाग मुंबई इथे 25,000 रुपये कमवण्याची संधी काही महत्त्वाच्या सूचना ही नियुक्ती निव्वळ कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर आहे आणि नियमित नाही. आवश्यक नसल्यास अपॉइंटमेंट कधीही बंद केली जाईल. रिक्त पदे आणि आवश्यकतांनुसार नियुक्त्या केल्या जातील. त्याशिवाय निवड यादी रद्द करण्याचे अधिकार महापालिका आयुक्तांना आहेत जे उमेदवार आधीच BMC मध्ये कार्यरत आहेत अशा उमेदवारांनी त्यांच्या वरिष्ठांकडून “No Objection Certificate” सादर करणं आवश्यक आहे/ उमेदवारांना मराठी भाषेचं ज्ञान असणं आवश्यक आहे. अर्ज करण्यासाठीचा पत्ता डिस्पॅच विभाग, तळमजला, लोकमान्य टिळक म्युनिसिपल मेडिकल कॉलेज बिल्डिंग, सायन, मुंबई 400022 अर्ज करण्याची शेवटची तारीख - 26 नोव्हेंबर 2021
    JOB TITLE BMC Recruitment 2021
    या पदांसाठी भरती कनिष्ठ सल्लागार भूलतज्ञ (Junior Consultants Anesthetist) - एकूण जागा 04
    शैक्षणिक पात्रता उमेदवारांनी MD, DNB, FCPS किंवा मेडिकल क्षेत्राशी निगडित पदव्युत्तर डिग्री घेतली असणं आवश्यक
    इतका मिळणार पगार डिग्री किंवा पदव्युत्तर उमेदवारांसाठी - 1.25 लाख रुपये प्रतिमहिना डिप्लोमा उमेदवारांसाठी - 1 लाख रुपये प्रतिमहिना
    काही महत्त्वाच्या सूचना ही नियुक्ती निव्वळ कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर आहे आणि नियमित नाही. आवश्यक नसल्यास अपॉइंटमेंट कधीही बंद केली जाईल. रिक्त पदे आणि आवश्यकतांनुसार नियुक्त्या केल्या जातील. त्याशिवाय निवड यादी रद्द करण्याचे अधिकार महापालिका आयुक्तांना आहेत जे उमेदवार आधीच BMC मध्ये कार्यरत आहेत अशा उमेदवारांनी त्यांच्या वरिष्ठांकडून “No Objection Certificate” सादर करणं आवश्यक आहे/ उमेदवारांना मराठी भाषेचं ज्ञान असणं आवश्यक आहे.
    सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा. या पदभरतीसाठी ऑनलाईन अप्लाय करण्यासाठी https://portal.mcgm.gov.in/ या लिंकवर क्लिक करा महाराष्ट्रातील आणि संपूर्ण देशातील काही महत्त्वाच्या नोकरीच्या संधी बघण्यासाठी इथे क्लिक करा.
    Published by:Atharva Mahankal
    First published: