Home /News /career /

मुंबई महानगरपालिकेत MBBS डॉक्टर्सना नोकरीची संधी; या पत्त्यावर पाठवा अर्ज

मुंबई महानगरपालिकेत MBBS डॉक्टर्सना नोकरीची संधी; या पत्त्यावर पाठवा अर्ज

उमेदवारांना ऑफलाईन अर्ज पाठवावे लागणार आहेत.

    मुंबई, 04 जुलै: बृहन्मुंबई महानगरपालिकेत (BMC) लवकरच पदभरती होणार आहे. यासाठीची अधिसूचनाही जारी करण्यात आली आहे. हाऊसमन (मेडिसिन) या पदासाठी ही पदभरती असणार आहे. त्यामुळे MBBS चं शिक्षण पूर्ण केलेलय उमेदवारांसाठी ही नोकरीची सुवर्णसंधी आहे. अर्ज करण्यासाठी उमेदवारांना ऑफलाईन अर्ज पाठवावे लागणार आहेत. या पदासाठी भरती हाऊसमन (Houseman) (Medicine) - एकूण जागा 09 शैक्षणिक पात्रता या पदासाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी MBBS चं शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. तसंच अनुभव असलेल्या उमेदवारांना प्राधान्य देण्यात येणार आहे. हे वाचा - NAL Recruitment 2021: नॅशनल एरोस्पेस लॅबोरेटरीजमध्ये विविध पदांसाठी भरती वयोमर्यादा या पदासाठी अर्ज करू इच्छिणारे उमेदवार हे वयवर्षे 18 ते 33 या वयोगटातील असणं आवश्यक आहे. मागासवर्गीय उमेदवारांसाठी 05 वर्षांची सूट देण्यात आली आहे. अर्ज पाठवण्याचा पत्ता वैद्यकीय अधीक्षक कार्यालय, कस्तुरबा हॉस्पिटल, साने गुरुजी मार्ग, मुंबई- 11 अर्ज करण्याची तारीख - 05 जुलै ते 16 जुलै 2021 सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी आणि नोटिफिकेशन डाउनलोड करण्यासाठी इथे क्लिक करा.
    Published by:Atharva Mahankal
    First published:

    Tags: BMC, Career opportunities, Jobs, Mumbai

    पुढील बातम्या